UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) हुंडा न देऊ शकल्याने केरळमध्ये डॉक्टर मुलीची आत्महत्या

मुलाच्या कुटुंबियांनी मागणी केलेल्या हुंड्याची पूर्तता न करता आल्यामुळे केरळमधील एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चार दिवसांपूर्वी घडली. या पार्श्वभूमीवर देशातील हुंडाबंदी कायद्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. हा विषय यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

Prataprao Jadhav
बुलढाण्यातील ‘केस गळती’ची मोदी सरकारकडून दखल; दिल्ली, चेन्नईतील डॉक्टरांची पथकं येणार, ICMR कडून संशोधन सुरू, केंद्रीय मंत्र्याची माहिती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Cardiac Arrest
Cardiac Arrest : तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू! कर्नाटकनंतर गुजरातमध्येही समोर आला धक्कादायक प्रकार
high court order railway administration
गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू, पालकांना चार लाख रुपये नुकसाभरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
Baba Siddiqui murder, dominance, Mumbai Police Crime Branch, charge sheet,
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा
neet ug exam supreme court
शिफारशींची नीट अंमलबजावणी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती
Mamata Banerjee
Mamata Banerjee : घुसखोरीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचे BSFकडे बोट; केंद्र सरकारवरही केले गंभीर आरोप

तुमच्या माहितीसाठी :

लग्नासाठी एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाकडून तसेच कुटुंबाशी संबंधित एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या कुटुंबाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला कोणतीही संपत्ती तसेच मौल्यवान वस्तू देण्यास तसेच ती स्वीकारण्यास सहमती दर्शवने, याला हुंडा असे म्हणतात. भारतात गेल्या सहा दशकापासून हुंड्याच्या देवाण घेवाणीवर बंदी घालण्यात आली आहे. हुंडाबंदी कायदा १९६१ द्वारे यासंदर्भात कारवाई करण्यात येते. या कायद्यानुसार, हुंडा घेण्यात तसेच देण्यात एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास तिला पाच वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तसेच १५ हजार रुपये किंवा हुंड्यात मागितलेली रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल ती आर्थिक दंडाच्या स्वरुपात भरावी लागते. दुससरीकडे हुंड्यासाठी एखाद्या महिलेचा छळ केला जात असेल तर तो भारतीय दंड संहितेतील (IPC) कलम ४९८ अ नुसार गुन्हा ठरतो.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार गेल्या वर्षी भारतात हुंडाबंदी कायद्यांतर्गत तब्बल १३ हजार ४७९ प्रकरणे नोंदवली गेली. २०२२ सालात हुंडाबळींची संख्या तब्बल ६४५० होतीच. २०२१ साली भारतात हुंडाबंदी कायद्याअंतर्गत एकूण १३ हजार ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० सालाच्या तुलनेत दाखल गुन्ह्यांचे हे प्रमाण २५ टक्क्यांनी अधिक आहे. २०२१ साली हुंड्यामुळे एकूण ६५८९ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण २०२० सालाच्या तुलनेत ३.८५ टक्क्यांनी कमी आहे.

हेही वाचा – यूपीएससी सूत्र : कलम ३७० बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, जाणून घ्या निकालपत्रातील महत्त्वाचे मुद्दे!

२) भारत-इटली संबंध

काही दिवसांपूर्वीच इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी आपल्या ऑफिशिअल एक्स अकाउंटवर पंतप्रधान मोदींबरोबरीचा सेल्फी पोस्ट केला होता, हा सेल्फी दुबईतील COP28 बैठकीच्या वेळी टिपलेला होता, “COP28 मधील चांगले मित्र”… शीर्षकाखाली मेलोनीने या पोस्टला #मेलोडी असे देखील जोडले, #Melodi हा हॅशटॅग मेलोनी आणि मोदी या दोन नेत्यांच्या नावांनी तयार झालेला आहे. दरम्यान, या पोस्ट नंतर आता भारत आणि इटली यांच्यातील संबंधांबाबत आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

भारत आणि इटली यांच्यातील संबंध किमान २ दोन हजार वर्षांपासूनचा आहे. इटालियन बंदर शहरे ही जागतिक मसाला मार्गावरील (स्पाईस रूट) महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. १३ व्या शतकात व्हेनेशियन व्यापारी मार्को पोलोने भारतात प्रवास केला. रवींद्रनाथ टागोर यांनी मे-जून १९२६ मध्ये इटलीला भेट दिली होती, ही भेट रोम विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक कार्लो फॉर्मिची यांनी आयोजित केली होती. तर लंडनमधील गोलमेज परिषदेतून परतताना महात्मा गांधींनी डिसेंबर १९३१ मध्ये रोमला भेट दिली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजेच १९४७ ते २०१२ पर्यंत भारत आणि इटली यांच्यातील संबंध बऱ्यापैकी चांगले होते. मात्र, २०११-१२ मधील ऑगस्टा वेस्टलॅण्ड आणि इटालियन मरीन प्रकरणामुळे दोन्ही देशातील संबंधांना धक्का बसला. पुढे २०१८ पासून सुरू झाले. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्हॅटिकन येथे २ ते ५ सप्टेंबर २०१६ या कालावधीत मदर तेरेसा यांच्या सन्मान सोहळ्यासाठी अधिकृत शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्यावेळेस त्यांनी त्यांचे इटालियन समकक्ष पाओलो जेंटिलोनी यांची भेट घेतली आणि दोन्ही बाजूंनी राजनैतिक संबंधांचे ७० वे वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला.

२०१८ मध्ये हा उत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे साजरा करण्यात आला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २०१९ च्या डिसेंबर मध्ये रोमला भेट दिली आणि तत्कालीन पंतप्रधान ज्युसेप्पे कांट यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कांट यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी भारत आणि इटली दरम्यान व्हर्च्युअल समिटचे एकत्र अध्यक्षपद भूषवले. यावेळी २०२०-२०२५ कृती आराखडा स्वीकारण्यात आला, ज्याने देशांमधील वर्धित भागीदारीसाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये स्वीकारली.

G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदींनी २०२१ च्या ऑक्टोबर मध्ये इटलीला पहिला अधिकृत दौरा केला होता. शिखर परिषदेबरोबर त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मारियो द्राघी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. पंतप्रधान मेलोनी यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर २ आणि ३ मार्च २०२३ रोजी भारताला भेट दिली. पाच वर्षांच्या कालावधीनंतर इटलीतील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी भारताला दिलेली ही पहिलीच भेट होती. भेटीदरम्यान, मेलोनी आणि मोदींनी हरित अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा, संरक्षण सह-उत्पादन आणि ब्लू इकॉनॉमीला चालना देण्यावर चर्चा केली.

२०२१-२२ साली भारत- इटली दरम्यान ३.२२९ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार करण्यात आला होता, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ५०% पेक्षा अधिक होता. इटली हा युरोपिअन युनियनमधील भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. ६०० हून अधिक मोठ्या इटालियन कंपन्या भारतात सक्रिय आहेत, ज्यात विविध क्षेत्रांचा समावेश आहे. फियाट आणि पियाजिओ ते अलीकडच्या फेरेरो रोशे, किंडरजॉय, टिक टॅक इत्यादी इटालियन ब्रॅण्ड्स भारतात घरोघरी माहीत आहेत. सामरिकदृष्ट्या इटलीला भारताबरोबर संरक्षण क्षेत्रात भागीदारी करायची आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader