Indian Science Congress : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) इंडियन सायन्स काँग्रेस रद्द

जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये १०९ वी इंडियन सायन्स काँग्रेस होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ‘ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावर सायन्स काँग्रेस होणार होती. मात्र लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये सायन्स काँग्रेस होणार नाही, नवीन स्थळ-दिनांक याबाबतचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनने संकेतस्थळावर दिली आहे.

Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
Seven lakh farmers deprived of loan waiver
सात लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज
State Bribery Prevention Department bribery
राज्यात भ्रष्टाचाराचे ७१३ गुन्हे! नाशिकमध्ये सर्वाधिक तर मुंबईत सर्वात कमी गुन्हे! २०१४ पासून गुन्ह्यांत घट
Bombil , Saranga, low visibility , fish price ,
कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ
states fund raise loksatta news
कर्ज उभारणीसाठी राज्यांकडून तिमाहीत चढाओढीने बोली शक्य, उसनवारी ४.७३ लाख कोटींवर जाण्याचा, दरही महागण्याचा अंदाज

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

देशातील सर्वांत मोठी विज्ञान परिषद म्हणून इंडियन सायन्स काँग्रेसची ओळख आहे. १९१४ पासून या परिषदेचे आयोजन करण्यात येते. देशभरातील वैज्ञानिकांना त्यांचे संशोधन मांडता यावे, विज्ञानाच्या क्षेत्रातील घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश त्यामागे असतो. इंडियन सायन्स काँग्रेस परिषदेला केंद्र सरकारकडून दर वर्षी आर्थिक अनुदान दिले जाते. परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येते. देशभरातील वैज्ञानिक संस्थांसह देश-परदेशातील वैज्ञानिक, नोबेलप्राप्त शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विज्ञानशिक्षक, सर्वसामान्य नागरिक या विज्ञान संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होतात.

दरम्यान, केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सप्टेंबरमध्ये नोटीस प्रसिद्ध करून केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करत इंडियन सायन्स काँग्रेसशी असलेले संबंध संपुष्टात आणणार असल्याचे सांगितले. तसेच या निर्णयामागची कारणेही दिली. इंडियन सायन्स काँग्रेसचे काही पदाधिकारी कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा सरकार किंवा संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेची पूर्वपरवानगी न घेता एकतर्फी निर्णय घेतात. कोणत्याही पूर्वपरवानगीविना सायन्स काँग्रेस जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये स्थलांतरित करण्यात आली. त्या शिवाय आर्थिक अनियमिततेबाबतचे आरोप विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. त्यामुळे इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या कार्यकारी सचिवांनी कोणत्याही कार्यक्रमासाठी सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय सरकारी तिजोरीतून खर्च करू नये. तसेच सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने इंडियन सायन्स काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे सरकारकडून सांगण्यात आले.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) भारताच्या जीडीपीचे पहिले आगाऊ अंदाज जाहीर

केंद्र सरकारने शुक्रवारी भारताच्या जीडीपीचा पहिला आगाऊ अंदाज(FAEs) जाहीर केला असून भारताचा जीडीपी चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) ७.३ टक्क्यांनी वाढेल. तसेच गेल्या आर्थिक वर्षा २०२२-२३ मधील ७.२ टक्के वाढीपेक्षा किंचित वेग पकडेल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील आर्थिक आणि सामाजिक विकास तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील भारतातील मॅक्रोइकॉनॉमिक्स आणि आर्थिक विकास आणि बँकिंग, आंतरराष्ट्रीय संस्था, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

भारताच्या जीडीपीचे पहिले आगाऊ अंदाज दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी सादर केले जातात. त्या आर्थिक वर्षातील वाढीचे ते फक्त पहिले अंदाज असतात. फेब्रुवारीच्या अखेरीस सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) दुसरे आगाऊ अंदाज आणि मे अखेरीस तात्पुरते अंदाज जाहीर केले जातात.

जीडीपी म्हणजे नेमकं काय?

‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) अर्थात जीडीपी हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे एक मापक आहे. एखाद्या देशाचा जीडीपी म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत होय. जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना करायची असते तेव्हा जीडीपीचा वापर केला जातो. तसेच देशांतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादन किती वाढले, हे मोजण्यासाठीही जीडीपीच्या दराचा वापर होतो. एखाद्या राष्ट्राचा जीडीपी हा त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पादन (Production), राष्ट्रीय उत्पन्न (Income) किंवा राष्ट्रीय खर्च (Expenditure) यावरून ठरवता येतो. जीडीपी काढण्याकरिता पुढील सूत्राचा वापर केला जातो :

GDP = उपभोग खर्च + गुंतवणूक खर्च+ सरकारी खर्च+(निर्यात- आयात)

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader