UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) वन संशोधन संस्थेची बैठक

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे २६ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान वन संशोधन संस्था (FRI), डेहराडून येथे युनायटेड नेशन्स फोरम ऑन फॉरेस्ट्स (UNFF) चा भाग म्हणून कंट्री-लेड इनिशिएटिव्ह (CLI) या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक जंगलातील आग आणि वन प्रमाणीकरण या विषयावर आधारित होता.

bmc s Divisional Office formed Forest Rights Committee
गोराईमधील आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती, येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी समिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग

परीक्षेसाठी महत्त्वाचा का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे २६ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान डेहराडून येथे कंट्री-लेड इनिशिएटिव्ह (CLI) या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जंगलातील आग आणि वन प्रमाणीकरण या विषयावर आधारित होता. या कार्यक्रमात ४० हून अधिक देश आणि २० आंतरराष्ट्रीय संस्थांमधून एकूण ८० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. शाश्वत वन व्यवस्थापनाकडे नेणारे वन अग्नी व्यवस्थापन आणि वन प्रमाणपत्र यासाठी अंमलबजावणीयोग्य फ्रेमवर्क करणे हा बैठकीचा महत्त्वाचा उद्देश होता. तसेच मे २०२४ मध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित UNFF च्या १९ व्या सत्राच्या चर्चेसाठी शिफारशींवरही या बैठकीत चर्चा झाली.

तुम्हाला माहिती आहे का?

गेल्या काही वर्षांपासून जंगलातील वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच ही आग धुमसत राहण्याचा प्रमाणही वाढले आहे. याचा थेट परिणाम जैवविविधता, परिसंस्था, मानवी जीवन, उपजीविकेची साधने आणि राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांवरही विपरीत परिणाम होतो आहे.

जगाचा विचार केला, तर या आगींचा सर्वाधिक परिणाम रशिया, कॅनडा, अमेरिका, फिनलंड, नॉर्वे, चीन आणि जपानमधील डोंगर-उतार व्यापणाऱ्या जंगलांवर झाला आहे. तसेच, जैवविविधतेचा खजिना असणारी ॲमेझॉनसारखी उष्णकटिबंधीय जंगले, आग्नेय आशिया व भारतातील पर्जन्यवनांनाही वणव्यांच्या वाढत्या संकटास सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, जगातील सर्वात मोठा वणवा कुठे पेटला? वणवा किती प्रकारचा असतो? भारतात वणव्यामुळे जंगलहानी किती होते? तसेच मध्य प्रदेशने रुळवलेले आणि छत्तीसगडमध्येही लागू असलेले वणवा नियंत्रण मॉडेल काय आहे? यासंदर्भातील माहिती असणेही आवश्यक आहे.

आकडेवारी काय सांगते? :

भारतीय वनसर्वेक्षण अहवालानुसार नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान भारतात दोन लाख २३ हजार ३३३ वणवे लागले होते, तर नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत वणव्यांची संख्या जरा कमी, म्हणजे दोन लाख १२ हजार २४९ होती. देशभरात २९ ऑगस्ट २०२२ आणि २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत १४ हजार ६८९ वणव्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. २००२ ते २०२२ या २० वर्षांच्या कालावधीत वणव्यामुळे भारताने ३.९३ लाख हेक्टर आर्द्र प्राथमिक जंगल गमावले.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) जेरुसलेममधील ”भारतीय धर्मशाळा”

१२ व्या शतकात जेरुसलेममध्ये भारताने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते. या प्राचीन शहरात तपकिरी रंगाची एक दुमजली इमारत उभी आहे; ज्यावर “भारतीय धर्मशाळा, स्थापना- इसवी सन १२ वे शतक, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार” असा फलक दिसून येतो.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससीच्या पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला आणि संस्कृती, इतिहास या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

काबूल, मुलतान ते पंजाब असा प्रवास करणारे सुफी संत बाबा फरीद यांनी जेरुसलेमच्या या धर्मशाळेत ४० दिवस ध्यानधारणा केली असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी ध्यान करून बाबा फरीद पुन्हा पंजाबला परतले. त्यानंतर पुढे अनेक वर्षे मक्केला जाणारे भारतीय मुस्लीम जेरुसलेमला भेट देत असत आणि याच धर्मशाळेत प्रार्थनेसाठी येत असत. काळाच्या ओघात हे ठिकाण पवित्र जागा आणि भारतीय प्रवाशांसाठी धर्मशाळा म्हणून विकसित होत गेली. त्याआधी ते लॉज म्हणून ओळखले जात होते.

ही भारतीय धर्मशाळा, ज्या रस्त्यावर आहे, त्या रस्त्याला ‘झवियत-अल-हुनुद’, असे अरबी भाषेत नाव देण्यात आले आहे; ज्याचा अर्थ ‘इंडियन कॉर्नर’ होतो, असं सांगितलं जातं. ऑक्टोबर २०२१ साली परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-जेरुसलेमच्या ८०० वर्षांच्या जुन्या संबंधावर प्रकाश टाकणाऱ्या या इमारतीच्या नव्या फलकाचे अनावरण केले होते. याशिवाय सुफी संत बाबा फरीद नेमके कोण होते? आणि स्वतंत्र भारताशी लॉजचा संबंध कसा आला? या विषयीची माहिती असणेही गरजेचं आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

३) सियाचिनमध्ये तैनात अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू

सियाचिन या हिमाच्छादित क्षेत्रात कर्तव्य बजावताना बुलढाण्यातील अक्षय गवते या २२ वर्षांच्या अग्निवीराचे हृदयविकाराने निधन झाले. जगातील सर्वांत उंच युद्धभूमीवर अतिशय प्रतिकूल वातावरण, कठीण परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीने आजवर अनेक अधिकारी-जवानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अग्निपथ योजनेतील जलद प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात सीमेवरील आव्हाने, हा विषय ऐरणीवर आला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहिसाठी :

अग्निपथ या नव्या योजनेअंतर्गत भरती झालेले अक्षय गवते हे सैन्यदलात दूरध्वनी यंत्रचालक (टेलिफोन ऑपरेटर) म्हणून कार्यरत होते. प्रशिक्षणानंतर अक्षय यांची पहिलीच नियुक्ती थेट सियाचिनमध्ये झाली होती. अग्निवीरांसाठी चार वर्षांचा सेवाकाळ निश्चित आहे. लष्करी सेवेची वर्षपूर्ती होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. प्रशिक्षणानंतर अक्षय यांची नियुक्ती लष्कराच्या लेहस्थित १४ कोअरमध्ये झाली होती. हा कोअर फायर ॲण्ड फ्युरी या टोपण नावाने ओळखला जातो. या कोअरअंतर्गत सियाचिन ब्रिगेड काम करते.

अग्निपथ योजना काय आहे?

भारतीय लष्करात जास्तीत जास्त तरुणांनी सामील व्हावे म्हणून केंद्र सरकारने वर्ष २०२२ मध्ये अग्निपथ योजना (Agneepath Scheme) जाहीर केली होती. या योजनेची घोषणा जून महिन्यात करण्यात आली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाते. तरुणांना या योजनेंतर्गत लष्कारात ४ वर्षे सेवा देता येते. तसेच मासिक वेतनाव्यतिरिक्त लष्करात चार वर्षे सेवा दिल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी म्हणून ११.७१ लाख रुपये देण्यात येते.

ज्यावेळी केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली, त्यानंतर या योजनेला देशभरातून तीव्र विरोध करण्यात आला. अनेक राज्यामधील तरुण अग्निपथ योजनेला विरोध करत रत्यावर उतरले. यूपी, बिहारसारख्या राज्यांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. तर काही ठिकाणी लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दगडफेक करत रेल्वे डब्यांना आग लावल्याच्याही घटना घडल्या. याशिवाय काही राज्यांमध्ये या योजनेच्या विरोधात ठरावही संमत करण्यात आला. यापैकीच एक राज्य म्हणजे पंजाब होते.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader