UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) हत्तींच्या सुरक्षेसाठी ‘गजराज यंत्रणा’
रेल्वे अपघातामुळे हत्तींचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी भारतीय रेल्वेकडून गजराज यंत्रणा बसवली जाणार आहे. या यंत्रणेत कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील सरकारची कार्यकारी आणि न्यायपालिका मंत्रालये आणि विभागांची रचना, संघटना आणि कार्यप्रणाली या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही यंत्रणा नेमकी काय आहे? ती कशा प्रकारे काम करते? या यंत्रणेची गरज का पडली? आतापर्यंत किती हत्तींचे मृत्यू झाले? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
रेल्वे मंत्रालयाने आसाम पश्चिम बंगाल, ओडिशा, केरळ, झारखंड, छत्तीसगड आणि तामिळनाडूच्या काही भागातील एकूण ७०० किमीचा जंगलातून जाणाऱ्या लोहमार्गांवर ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून १८१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
ही यंत्रणा कशी काम करते?
एआय आणि ऑप्टिकल फायबर केबलचा वापर करून संगणक प्रणाली लोहमार्गांवरील दोनशे मीटरच्या अंतरातील संशयास्पद हालचाल शोधते. हत्तीने लोहमार्गावर पाऊल ठेवताच कंपने तयार होतात. ही कंपने सेन्सरपर्यंत पोहोचतात. त्यातून ऑप्टिकल केबल फायबरच्या ऑप्टिकल सिग्नलमध्ये बदल होतात. त्यातून पुढे लोहमार्गावर धोका असल्याचा संदेश मिळतो. ऑप्टिकल फायबर केबलच्या पाच मीटरपर्यंतच्या अंतरातील हालचाल यंत्रणा टिपते. सिग्नलमधून पुढे लोहमार्गावर सुरू असलेली हालचाल कळण्यासोबत लोहमार्गावर हत्ती आहे की दुसरा प्राणी अथवा मानव याचीही कल्पना मिळते. संगणकीय प्रणालीमुळे प्राण्यांची हालचालच नव्हे, तर किती प्राणी त्या ठिकाणी आहेत, हेही कळते. ही यंत्रणा रेल्वेचा चालक, नियंत्रण कक्ष आणि स्थानक प्रमुखाला याबाबत इशारा देते.
डिसेंबर २०२२ मध्ये नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेकडून (NFR ) Intrusion Detection System बसवण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत रेल्वे नियंत्रण कक्षाला ९ हजारांच्यावर सुचना मिळाल्या. महत्त्वाचे म्हणजे काय कालावधीत एकाही हत्तीचा रेल्वेच्या अपघातात मृत्यू झालेला नाही.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- विश्लेषण: ‘एआय’चा वापर चक्क हत्तींच्या सुरक्षिततेसाठी? काय आहे भारतीय रेल्वेची योजना?
- UPSC-MPSC : १९९२ साली भारतात ‘प्रोजेक्ट एलिफंट’ का सुरू करण्यात आला? त्याची वैशिष्ट्ये कोणती?
२) वेनेझुएला-गयाना वाद
दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला आणि गयाना या दोन शेजारी देशांतील जुना सीमावाद आता नव्याने उफाळून आला आहे. या दोन्ही देशांत संघर्ष वाढल्यास याचा भारतासह जगावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित व विकसनशील राष्ट्रांच्या धोरणाचा भारताच्या हितसंबंधांवरील परिणाम या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा वाद नेमका काय आहे? आणि त्याचा भारतासह जगावर काय परिणाम होईल? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘एसेक्विबो’ नदीजवळ असलेला एक लाख ६० हजार चौरस किलोमीटर (६२ हजार चौरस मैल) भाग सीमावर्ती आहे. हा प्रदेश विरळ लोकसंख्येचा असून इथे मोठ्या प्रमाणात जंगल आहे. हा भाग आपला असल्याचा दावा व्हेनेझुएलाने केला आहे. तर ‘एसेक्विबो’ प्रदेश गयानाच्या एकूण भूभागाच्या सुमारे दोन तृतीयांश आहे. गयाना ब्रिटिश वसाहत असताना १८९९ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाद्वारे त्याची सीमा निश्चित झाली होती. मात्र, व्हेनेझुएलाने हा निर्णय अमान्य करत ‘एसेक्विबो’ आपला भूभाग असल्याचा दावा केला आहे. या दोन देशांतील ताज्या संघर्षाचे तात्कालिक कारण म्हणजे गयानाचा दावा असलेला ‘एसेक्विबो’ प्रदेश व्हेनेझुएलाचा आहे की नाही यावर व्हेनेझुएलात गेल्या रविवारी सार्वमत घेतले गेले. अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारने हे सार्वमत घेतले. यावरून गयाना अस्वस्थ झाला आहे.
तुमच्या माहितीसाठी :
‘एसेक्विबो’ मध्ये २०१५ साली नैसर्गिक तेल-वायूचे साठे सापडले होते. तेव्हापासून गयानाला सुमारे एक अब्ज डॉलर वार्षिक सरकारी महसूल मिळू लागला आहे. तर व्हेनेझुएला मात्र आता गयानाच्या मागे पडू लागला आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाने हा जुना वाद नव्याने उकरून काढला आहे. ‘एसेक्विबो’ हे व्हेनेझुएलाचे नवीन राज्य म्हणून समाविष्ट करण्यासाठीच्या या सार्वमताद्वारे अध्यक्ष मादुरो यांनी व्यापक जनसमर्थन मिळवले. मादुरो यांनी या भागात नव्याने तेल आणि खाण उत्खनन करण्याची ग्वाही दिली. यामागे राजकीय गणित आहे. कारण २०२४ मध्ये व्हेनेझुएलामध्ये अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी आपली राजकीय ताकद दाखवून जनमत आपल्याकडे झुकवण्याचा मादुरो यांचा प्रयत्न आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
३) गुजरातच्या गरब्याला अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जा
यूनेस्कोने (UNESCO) ने अमृर्त सांस्कृतिक वारसा यादीत गरबा या नृत्य प्रकाराचा समावेश केला आहे. त्यामुळे गरब्याला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती आणि सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या संघटना, त्यांची रचना आणि कार्ये या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे गरबा हा नृत्य प्रकार नेमका काय आहे? आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जा म्हणजे काय? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
५ ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत बोत्सवाना येथे झालेल्या अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या जतनासाठी आंतर-सरकारी समितीच्या १८व्या बैठकीदरम्यान, युनेस्कोने गुजरातच्या गरब्याचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केला आहे. या यादीत समाविष्ट होणारा गुजरातचा गरबा हा भारतातील १५ वा घटक आहे. या समितीने गरबाचा उल्लेख “स्त्री शक्तीच्या उपासनेला समर्पित असलेले आणि नवरात्रीनिमित्त सादर केले जाणारे भक्तिपूर्ण नृत्य”, असा केला आहे. गरबा हा नृत्यप्रकार परंपरा आणि भक्तीच्या मुळांमध्ये खोलवर रुजलेला आहे. यामध्ये जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांचा समावेश असून विविध समुदायांना एकत्र आणणारी समृद्ध परंपरा म्हणून ती सातत्याने वाढत आहे.
युनेस्कोच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, ”गरबा हा एक सर्वसमावेशक नृत्य प्रकार आहे. यामध्ये नर्तकांपासून ते संगीतकार आणि विविध सामाजिक गटांचा समावेश असतो. त्यामुळे सामाजिक समानता वाढण्यास मदत होते.”
या यादीत गुजरातच्या गरब्याशिवाय भारतातील इतर १४ घटक ( यामध्ये नृत्य, नाट्य आणि विविध संस्कृतीचा समावेश होतो. ) आहे. यामध्ये वैदिक मंत्रोच्चारण, रामलीला, केरळमधील कुटियाट्टम आणि मुडियेट्टु नाट्य, उत्तरांखंडमधील राममन नाट्य, राजस्थानमधील कालबेलिया लोकगीत आणि नृत्य, छऊ नृत्य, लद्दाखमधील बौद्ध जप, मणिपूरमधील संकीर्तन ढोलवादन आणि नृत्य, पंजाबमधील जंडियाला गुरु ( पितळ आणि ताब्यांचे भांडे बनवण्याची कला), योगा, नवरोज, कुंभमेळा आणि कोलकात्यातील दुर्गापुजेचा समावेश आहे.
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.