Heatwaves In India : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) कोव्हिशील्ड लसीचे दुष्परिणाम

कोव्हिशिल्ड लशीचे क्वचित प्रसंगी मानवी शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने प्रथमच ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे. गेल्या चार वर्षांत अ‍ॅस्ट्राझेनेकाने पहिल्यांदाच अशी कबुली दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.

arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mumbai heat loksatta news
मुंबई : उकाड्यात वाढ
Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट
Mumbais maximum temperature rise with Santacruz recording 35 Celsius
मुंबईकर घामाघूम
Air in Borivali , Byculla Air , Navinagar , Shivajinagar,
बोरिवली आणि भायखळ्यातील हवा सुधारली, निर्बंध उठवण्याची शक्यता, नेव्हीनगर आणि शिवाजीनगरवर लक्ष
climate turmeric impact loksatta
हवामान प्रकोपाचा हळदीला फटका; जाणून घ्या, देशभरात लागवड किती घटली, उत्पादनात किती घट येणार
decrease in Mumbai s minimum temperature maximum temperature
सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधनांशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

  • कोव्हिशील्ड लस नेमकी काय आहे?
  • थ्रोब्मोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया हा आजार नेमका काय? त्याचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो.

तुमच्या माहितीसाठी :

कोव्हिशिल्ड लशीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात. या सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकते, अशी माहिती अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील न्यायालयात दिली आहे. हे दुष्परिणाम क्वचितच आढळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

TSS मध्ये विविध प्रकारची लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे, छातीत अथवा हाता-पायांमध्ये वेदना होणे, इंजेक्शन दिलेल्या ठिकाणाच्या आजूबाजूला त्वचेवर लाल ठिपके येणे किंवा जखमा होणे, डोकेदुखी, शरीराच्या काही भागांमध्ये बधीरपणा येणे इत्यादी लक्षणे आहेत. TSS म्हणजे थोडक्यात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात आणि त्यातून ही लक्षणे दिसून येतात.

रक्त गोठण्यामुळे धमन्या आणि शिरांमधील रक्तप्रवाह रोखला जाऊ शकतो. रक्ताच्या गुठळ्या नेमक्या कोणत्या भागात आहेत, यावर या समस्येची तीव्रता अवलंबून असते. या समस्येमुळे हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक व श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात,

महत्त्वाचे म्हणजे मे २०२१ मध्ये लस घेतल्यानंतर थ्रोम्बोइम्बोलिकची समस्या २६ लोकांमध्ये आढळून आल्याचे भारत सरकारने सांगितले होते. १६ जानेवारी २०२१ पासून भारतात लसीकरणास सुरुवात झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत जितक्या लशी दिल्या गेल्या आहेत; त्यामध्ये थ्रोम्बोइम्बोलिकची समस्या निर्माण झाल्याची घटना अत्यंत दुर्मीळ आहे. लस घेतलेल्या एक दशलक्ष व्यक्तींपैकी 0.00006 टक्के लोकांना ही समस्या निर्माण झाली आहे.

लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांविषयीची माहिती गोळा करणाऱ्या सरकारी समितीने अशी माहिती दिली आहे की, कोव्हिशिल्डमुळे TTS झाल्याची किमान ३६ प्रकरणे नोंद झाली आहेत. या समितीने गेल्या वर्षी जूनमध्ये दिलेल्या शेवटच्या अहवालानुसार या ३६ पैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी प्रश्न :

  1. mRNA तंत्रज्ञान नेमके काय आहे? करोनावरील लसींच्या विकासासाठी mRNA तंत्रज्ञान कसे महत्त्वाचे होते?

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) भारतातील उष्णतेची लाट

आतापर्यंत एप्रिल महिना कमालीचा उष्ण राहिला आहे. देशातील अनेक भागांत उष्णतेचा कहर झाल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या २६ दिवसांमध्ये देशातील बहुतांश भागांत पारा ४५ अंशाच्या पुढे गेल्याचे भारतातील हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील पर्यावरणीय पारिस्थितिकी, जैव-विविधता आणि हवामान बदल तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

  • उष्णतेची लाट म्हणजे काय?
  • अन-निनो म्हणजे काय?
  • कोअर हीटवेव्ह झोन म्हणजे काय?

तुमच्या माहितीसाठी :

मध्य, उत्तर आणि द्वीपकल्पीय भारत म्हणजेच गुजरात व पश्चिम बंगालमध्ये पसरलेला भाग हा कोअर हीटवेव्ह झोन (CHZ) आहे. या भागात दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात मार्च ते जून आणि कधी कधी जुलैमध्येही उष्णतेच्या लाटेची शक्यता असते.

राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्रातील विदर्भ, गंगेच्या पश्चिम बंगालचा काही भाग, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशचा काही भाग व तेलंगणा हे सर्वाधिक उष्णप्रवण राज्ये किंवा प्रदेश आहेत.

उन्हाचा तडाखा वाढतोय म्हणून उष्णतेची लाट घोषित केली जात नाही. तर, जेव्हा सामान्य भागातील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि डोंगरी भागातील व किनारपट्टीच्या प्रदेशातील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविण्यात येते, तेव्हा IMD उष्णतेची लाट घोषित करते.

तापमान सामान्यतेपेक्षा सहा अंश सेल्सिअस वा त्यापेक्षा जास्त असल्यास तीव्र उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. भारतात उष्णतेच्या लाटेचा कालावधी हा मार्च ते जून असतो. विशेष म्हणजे यावेळी मार्च महिन्यातच ही लाट घोषित करण्यात आली आणि एप्रिल महिन्यापर्यंत तापमानात मोठी वाढ झाली.

एप्रिल महिन्यातील तापमान बघता, IMD ने पुढील महिन्यात देशाच्या मोठ्या भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे २०२४ हे वर्ष एल निनोमुळे अधिक उष्ण आहे. एल निनो ही हवमानाशी संबंधित एक घटना आहे.

मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा अधिक असते, तेव्हा अशी परिस्थिती उदभवते. त्यामुळे अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता निर्माण होते. २०२३ च्या मध्यात एल निनोची सुरुवात झाली आणि आता २०२४ मध्ये तापमान गेल्या वर्षीपेक्षाही उष्ण असणार आहे.

मुख्य परीक्षेसाठी प्रश्न :

  1. उष्णतेची लाट घोषित करताना हवामान विभागाद्वारे कोणते निकष विचारात घेतले जातात?
  2. उष्पणतेच्या लाटेमुळे होणाऱ्या परिणामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारद्वारे कोणती पावले उचलली जाऊ शकतात?

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लीक करा….

Story img Loader