Russia Foodgrain Diplomacy : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) रशियाची ‘अन्नधान्य डिप्लोमसी’

रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकेसह युरोपीय देशांनी लादलेल्या निर्बंधांनंतरही रशियाचा जागतिक अन्नधान्य बाजारातील वाटा कायम राहिला आहे.

arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
Soyabean Purchase Objective Failed farmers in trouble
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?
Russia paying students in cash to have babies
मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात विद्यार्थ्यांना का दिले जात आहेत पैसे? नेमका हा प्रकार काय?
Seven lakh farmers deprived of loan waiver
सात लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
farmers budget loksatta
येत्या अर्थसंकल्पात हव्यात या १० गोष्टी…
farmers dap fertilizer subsidy
विश्लेषण : खत अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का?

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा भारताच्या हितसंबंधांवर परिणाम या घटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

रशियाच्या आक्रमक धोरणाला प्रतिबंध घालण्यासाठी अमेरिकेसह युरोपियन युनियनने रशियावर व्यापारी निर्बंध लादले आहेत. तरीही रशियाच्या अन्नधान्य व्यापारात वाढ होताना दिसत आहे. रशिया आपल्या देशात उत्पादित होत असलेल्या अन्नधान्याचा परराष्ट्र धोरणात सोईस्कर वापर करीत आहे. त्याला रशियाचा अन्नधान्य राजनय (डिप्लोमसी) असेही म्हटले जात आहे.

स्टॉटिस्टिका या संकेतस्थळावरील माहितीनुसार २०२२-२३मध्ये रशियातून एकूण ५२० लाख टन अन्नधान्याची निर्यात झाली होती. सन २०२३-२४मध्ये ६२८ लाख टन अन्नधान्याची निर्यात झाली आहे. सन २०२३-२४ मधील अन्नधान्याच्या निर्यातीचे मूल्य ४३.५ अब्ज डॉलर होते, ज्याचा रशियाच्या एकूण निर्यात मूल्यातील वाटा १० टक्के होता. युरोपियन युनियनमधील पोलंडला रशियातून सर्वाधिक निर्यात झाली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि शेती संघटनेच्या (एफएओ) अहवालानुसार, जगात दर वर्षी ७,८५० लाख टन गव्हाचे उत्पादन होते. त्यापैकी जागतिक बाजारात दर वर्षी सरासरी २१६० लाख टन गव्हाची खरेदी-विक्री होते. त्यात रशियाचा वाटा ५२० लाख टनांचा म्हणजे जवळपास २० टक्के इतका आहे. युरोपियन युनियन, इंडोनेशिया, चीन, इजिप्त, तुर्की, अल्जेरिया, मोरोक्को, फिलिपिन्स, बांगलादेश, ब्राझील हे प्रमुख गव्हाचे आयातदार देश आहेत. गहू, तांदूळ वगळता अन्य अन्नधान्याचे जागतिक उत्पादन २०२३-२४मध्ये सुमारे २८,४१० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यांपैकी जागतिक बाजारात ४,८४० लाख टन अन्नधान्यांची खरेदी-विक्री होते. त्यात रशियाचा वाटा सुमारे ६०० लाख टनांचा आहे.

या संदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) भारताच्या कृषी निर्यातीत झालेली घट

केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये देशाच्या कृषी निर्यातीत ८.८ टक्क्यांनी घट होऊन ती ४३.७ अब्ज डॉलरवर आली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधने, कृषी गरिबी आणि भूक यांच्याशी संबंधित सामाजिक, कृषी आणि सेवा क्षेत्राच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे या घटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये देशाच्या कृषी निर्यातीत ८.८ टक्क्यांनी घट होऊन ती ४३.७ अब्ज डॉलरवर आली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताची कृषी निर्यात ४७.९ अब्ज डॉलरवर गेली होती. ‘अपेडा’ या केंद्रीय व्यापार खात्याच्या कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणामार्फत देशातून विविध ७१९ प्रकारचा शेतमाल आणि शेती आधारित प्रक्रियाकृत उत्पादनांची निर्यात होते. ती निर्यातही २०२३-२४ या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या ११ महिन्यांत २२.४ अब्ज डॉलरची निर्यात झाली. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या ११ महिन्यांत २४ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. म्हणजे ‘अपेडा’च्या कृषी निर्यातीतही ६.८५ टक्क्यांनी घट झाली आहे.

कृषी निर्यातीत घट झाल्यानंतर केंद्रीय वाणिज्य विभागातर्फे बासमती तांदूळ, अल्कोहोलयुक्त पेये, मध, आंबे, केळी आदी परदेशांतून मागणी असलेल्या २० प्रमुख शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील तीन महिन्यांत एक कार्य योजना तयार केली जाणार आहे. त्यासाठी (अपेडा), राज्य सरकार आणि निर्यातीसंबंधी विविध घटकांशी चर्चा सुरू आहे. जागतिक कृषी निर्यातीत भारताचा वाटा जेमतेम २.५ टक्के आहे, तो चार ते पाच टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…

Story img Loader