UPSC Key In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश

स्वित्झर्लंडमधील हवा गुणवत्ता तपासणाऱ्या ‘आयक्युएयर’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार बांगलादेश आणि पाकिस्तानपाठोपाठ भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट २०२३’ च्या निष्कर्षांनुसार १३४ देशांच्या यादीत भारत प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

shivaji nagar mumbai pollution
मुंबई : शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
health issues due to pollution in sangli news in marathi
सांगलीत ‘दत्त इंडिया’कडून जल, वायू प्रदूषण; आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार
MIDC has initiated efforts to rebuild the 3 6 km channel carrying effluents in Belapur
ठाणे वाशी खाडी लवकरच प्रदूषणमुक्त, रासायनिक सांडपाण्यासाठी नव्या वाहिनीचा प्रस्ताव
air pollution mumbai Constructions
बोरिवली, भायखळ्यातील बांधकामे निर्बंधमुक्त, गोवंडी शिवाजीनगर निरीक्षणाखाली; वायू प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर नजर
Mumbais air quality is poor According to Sameer app
शिवाजीनगर घुसमटलेलेच
Health , Mumbai Municipal Corporation ,
प्रदूषण काळात व्यायाम टाळावा, मुंबई महापालिकेचा नागरिकांसाठी आरोग्य सल्ला
bmc has taken strict steps on constructions due air quality
वायुप्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत बांधकामावरील निर्बंध कायम, भायखळा परिसराच्या पाहणीअंती भूषण गगराणी यांची स्पष्टोक्ती

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट २०२३’ च्या निष्कर्षांनुसार १३४ देशांच्या यादीत भारत प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ५० शहरांमध्ये एकट्या भारतातील ४२ शहरांचा समावेश आहे. जगभरातील प्रदूषणाची माहिती गोळा करण्यासाठी १३४ देशांमधील सात हजार ८१२ ठिकाणी तब्बल ३० हजार हवा गुणवत्ता मापक स्थानके उभारण्यात आली होती. तर हवेचा दर्जा तपासण्यासाठी पीएम २.५ म्हणजेच अतिसूक्ष्म धुळीच्या कणांचे प्रमाण हे मापक म्हणून वापरण्यात आले होते. त्यानुसार भारतात प्रत्येक क्युबिक मीटर क्षेत्रात ५४.४ मायक्रोग्रॅम पीएम २.५ चे केंद्रीकरण झाल्याचे निदर्शनास आले. बांगलादेशमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ७९.९ मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर, तर त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये हे प्रमाण ७३.७ मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर इतके आढळून आले.

२०२२ मध्ये भारत सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर होता. २०२२ या वर्षात भारतात पीएम २.५ म्हणजेच अतिसूक्ष्म धुळींच्या कणांचे प्रमाण ५३.३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवले गेले. तर आता २०२३ च्या यादीत भारत आठव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. प्रदूषणाच्या बाबतीत १३४ देशांपैकी तिसरा क्रमांक हे चित्र अतिशय वाईट आहे. २०२३ मध्ये पीएम २.५ म्हणजेच अतिसुक्ष्म धुळींच्या कणांचे प्रमाण ५४.४ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके नोंदवण्यात आले.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) ब्लड कॅन्सरवरील ‘कार-टी सेल ट्रीटमेंट’ उपचार प्रणाली

अमेरिकेत संशोधन झालेली कायमेरिक अँटिजेन रिसेप्टर टी-सेल (कार-टी) उपचारपद्धती कर्करोगावर प्रभावी मानले जाते. भारतातील एका जैवतंत्रज्ञान कंपनीने तिचे स्वदेशी रूप विकसित केले आहे. कार-टी ही उपचारपद्धती प्रामुख्याने रक्ताच्या कर्करोगावर उपचारासाठी वापरली जाते.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधनांशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या या घटकाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या मााहितीसाठी :

कार-टी उपचारांमध्ये एखाद्या व्यक्तीचे रक्त घेऊन त्यातील रोगप्रतिकारक घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी पेशी वेगळ्या केल्या जातात. प्रयोगशाळेत या पेशींमध्ये जनुकीय सुधारणा केल्या जातात. यात त्या पेशींमध्ये निष्क्रिय विषाणू सोडला जातो. त्यातून त्या पेशींच्या आवरणावर कार हे विशेष प्रकारचे रिसेप्टर तयार होतात. जनुकीय सुधारणा केलेल्या अशा कार-टी पेशी पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडल्यात जातात. कर्करोगाच्या पेशींकडे या पेशी आकृष्ट होतात. नंतर या पेशी कर्करोगाच्या पेशींना मारून टाकतात.

भारतात अशा नवीन उपचार पद्धतींना फारशी मागणी सुरुवातीला दिसून येत नाही. कारण रुग्णांना खर्चिक आरोग्य व्यवस्था परवडणे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो. देशातील १ लाख जणांपैकी सुमारे १५ जणांना रक्ताचा कर्करोग होतो. त्यातील निम्म्या जणांना उपचारानंतर दोन वर्षांत पुन्हा या कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला. मात्र, त्यांपैकी केवळ १५ जणांना केमोथेरपीसह इतर उपचार पुन्हा घेणे शक्य होते. त्यामुळे कार-टी उपचारांची देशात गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…

Story img Loader