UPSC Key : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) ‘आयएनएस अरिघात’

भारताची अणुशक्तीवर चालणारी दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) ‘आयएनएस अरिघात’ नुकतीच नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
India Nuclear powered Ballistic Missile Submarine SSBN INS Arighat
‘आयएनएस अरिघात’चा चीनला धसका का?
fath 360 missile iran
इराणने रशियाला दिले महाविध्वंसक क्षेपणास्त्र, अमेरिका-युक्रेनच्या चिंतेत वाढ; ‘Fath-360’ क्षेपणास्त्र किती घातक?
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : “शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळून मी…”, राज ठाकरेंनी सांगितला २४ वर्षांपूर्वीचा किस्सा
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर ३ मधील सुरक्षा या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

‘आयएनएस अरिघात’ काय आहे?
सामरिक महत्त्व काय?

तुमच्या माहितीसाठी :

अरिहंत वर्गातील आयएनएस अरिघात ही दुसरी पाणबुडी आहे. काही वर्षांपूर्वी आयएनएस अरिहंत नौदलात समाविष्ट झाली होती. जमीन, हवेतून अण्वस्त्र डागण्याची क्षमता देशाने आधीच प्राप्त केली आहे. या पाणबुड्यांनी पाण्याखालून अण्वस्त्र हल्ल्याचे सामर्थ्य दिले.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आयएनएस अरिघात आयएनएस अरिहंतपेक्षा अधिक प्रगत आहे. स्वदेशी के – १५ क्षेपणास्त्राने सुसज्ज ही पाणबुडी ७५० किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्यावर मारा करू शकते. अधिक काळ पाण्याखाली राहू शकते. या माध्यमातून प्रतिहल्ला चढविण्यासाठी दुसरा प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता राखणारे जगात बोटावर मोजण्याइतपत देश असून त्यात भारताचाही समावेश आहे. ही पाणबुडी देशाची आण्विक त्रिसूत्री अधिक बळकट करेल. आण्विक प्रतिबंधन क्षमता वाढवून देशाच्या सुरक्षेत निर्णायक भूमिका निभावेल, याकडे खुद्द संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले आहे.

हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या हालचाली वाढत आहेत. आयएनएस अरिघात कार्यान्वित झाल्यामुळे भारतीय सशस्त्र दलांच्या एकात्मिक युद्ध विभागात (थिएटर कमांड) महत्त्वाची भर पडली. हिंद-प्रशांत प्रदेशात आपले हितसंबंध सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुड्या या टापूत असतील.

चीन आपली उपस्थिती विस्तारत असताना त्याच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी भारत मजबूत स्थितीत आल्याचे माजी नौदल अधिकारी सांगतात. सागरी क्षमता वाढविली जात आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय नौदलाने हिंद महासागर क्षेत्रात एकाच वेळी ११ पाणबुड्या तैनात करून चीनला एक प्रकारे स्पष्ट संदेश दिला होता. इतकी मोठी तैनात तीन दशकांत पहिल्यांदा करण्यात आली. चिनी आव्हानांना शह देण्यासाठी नौदलाने सामर्थ्याचे दर्शन घडवले.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

‘आयएनएस अरिघात’चा चीनला धसका का?

२) रशियाच्या अण्वस्त्र धोरणातील बदल

‘अण्वस्त्रांचा वापर कोणत्या परिस्थितीत करू शकतो’ हे निश्चित करणाऱ्या सैद्धान्तिक धोरणात बदल करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा परिणाम या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

पुतिन यांना धोरण का बदलायचे आहे?
धोरणात नेमके कोणते बदल होऊ शकतात?
बदलत्या धोरणाचा जागतिक शांततेवर कसा परिणाम होऊ शकतो?

तुमच्या माहितीसाठी :

सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या चर्चेदरम्यान ‘युक्रेनच्या डोक्यावर अण्वस्त्राची नळी लावली पाहिजे, असे तुम्हाला वाटते का,’ असा थेट प्रश्न कारागानोव्ह यांनी पुतिन यांना विचारला होता. त्यावर ‘विजयासाठी अण्वस्त्राचा वापर करण्याची गरज वाटत नाही. मात्र अण्वस्त्र धोरण हा प्रवाही दस्तावेज असल्यामुळे त्यात बदल केला जाऊ शकतो,’ असे उत्तर पुतिन यांनी दिले होते.

संरक्षणतज्ज्ञ निकोलाय सोकोव्ह यांच्या मते पुतिन यांचे हे विधान म्हणजे अमेरिकेसह पाश्चात्य राष्ट्रांना आपल्या अण्वस्त्र सज्जतेची आठवण करून देण्याची एक खेळी असू शकेल. मात्र या बदलांची रशिया जाहीर वाच्यता करणार नाही, असा सोकोव्ह यांचा अंदाज आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या पाश्चिमात्य राष्ट्रांची बाजू घेणे टाळणाऱ्या भारत, चीन, ब्राझील यांसह अन्य विकसनशील देशांना धोरण बदलावे लागू शकेल. त्यामुळेच केवळ धोरण बदलल्याचे सांगून नेमका बदल मात्र गुप्त ठेवला जाईल. जेणेकरून पाश्चात्य राष्ट्रांना इशाराही दिला जाईल आणि अन्य राष्ट्रांना भयगंड होणार नाही. एका अर्थी पुतिन आपल्या नव्या धोरणाची ‘झाकली मूठ’ ठेवतील, असे सोकोव्ह मानत आहेत.

रशियाबरोबर अणुयुद्धाच्या शक्यतेनेच आतापर्यंत अमेरिका आणि युरोपातील युक्रेनच्या मित्रराष्ट्रांना प्रत्यक्ष युद्धात उतरण्यापासून रोखून धरले आहे. मात्र युद्ध अधिक काळ लांबल्याने आतापर्यंत कधीच झाली नव्हती, एवढी लष्करी मदत युक्रेनला देण्यात येत आहे. अत्याधुनिक रणगाडे, एफ-१६ लढावू विमाने, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या भात्यात जमा झाली आहेत.

या मदतीच्या जोरावर युक्रेनने प्रथमच रशियाची सीमा ओलांडून त्यांचा काही भाग जिंकून घेतला आहे. पुतिन यांच्या ‘लाल रेषे’ची खिल्ली उडवित झेलेन्स्की यांनी अमेरिकेकडे आणखी मदत मागितली आहे. हा मदतीचा ओघ आटविण्यासाठी पुतिन यांनी अण्वस्त्र धोरणात बदलाची धमकी दिल्याचे मानले जात असले तरी त्यांनी युरोपच्या उंबरठ्यावर, बेलारूसमध्ये धोरणात्मक अण्वस्त्रे तैनात केली असून यावर्षीच अणुयुद्धाचा सरावही केला आहे. त्यामुळे पुतिन यांची ही पोकळ धमकी आहे, असे मानून गाफील राहून चालणार नसल्याचे संरक्षणतज्ज्ञ सांगत आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा..