UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससीसाठी महत्त्वाचे’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे दररोज घडणाऱ्या घटनांचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण इस्रायल-पॅलेस्टाइन वादाविषयी जाणून घेऊया.

पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर या दोन्ही देशांत युद्ध सुरू झाले आहे. इस्रायलने युद्धाची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात २,२६९ पॅलेस्टिनींचा; तर हमासच्या हल्ल्यात १३०० इस्रायलींचा मृत्यू झाला आहे.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
munabam beach kearala controversy
मुनंबम वक्फ जमिनीचा वाद काय? ख्रिश्चन आणि हिंदू रहिवाशांचा याला विरोध का?
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषया यूपीएससी पूर्व परीक्षेतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित आणि विकसनशील देशांमधील धोरणे आणि त्याचा भारताच्या हितसंबंधांवरील परिणाम तसेच परदेशस्त भारतीय या घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

नेमकं काय घडलं?

पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे दोन्ही देशांत युद्ध सुरू झाले आहे. हमासने केलेला हा हल्ला इस्रायलवरील गेल्या पाच दशकांतील सर्वात भीषण हल्ला आहे. यावेळी नियोजित पद्धतीने अडीच ते पाच हजार छोटी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. एवढच नाही तर जमीन, समुद्रमार्गे हमासचे सैनिक इस्रायलमध्ये शिरले. इस्रायलमध्ये असंख्य लोकांना मारण्यात आले, त्यांचे अपहरण करण्यात आले.

हमास ही संघटना नेमकी काय आहे?

‘हरकत अल-मुकावामा उल इस्मानिया’ म्हणजेच ‘हमास’ची स्थापना १९८७ साली गाझा पट्टीत झाली. मुस्लीम ब्रदरहुडची राजकीय शाखा म्हणून पुढे आलेला हा गट. ‘हमास’चा अर्थ इस्लामिक प्रतिकार चळवळ. अरबी भाषेत त्याचा अर्थ ‘उत्साह’ असा होतो. या गटाचे सुमारे ३६५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या गाझा पट्टीवर राजकीय नियंत्रण आहे. सुमारे २३ लाख लोकसंख्या असलेल्या या भागाची इस्रायलने आधीपासून पुरती कोंडी केली आहे. हमासला अथवा त्याच्या लष्करी विभागाला इस्रायल, अमेरिका, युरोपीय महासंघ, कॅनडा, इजिप्त आणि जपान आदींनी दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.

याशिवाय हमास या संघटनेचे उद्दिष्ट काय आहे? हमासला निधी कसा प्राप्त होतो? पॅलेस्टिनी लोकांचा हमास कडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? हमासने इस्रायलला आव्हान का दिले आहे? इस्रायलविषयी भारताचा राजकीय दृष्टिकोन काय आहे? पॅलेस्टाईनबाबत भारताचा राजकीय दृष्टिकोन काय आहे? इस्रायलमध्ये होणाऱ्या हिंसाचाराची तुलना योम किप्पूर युद्धाशी का केली जाते? याविषयांचा अभ्यास करणेही गरजेचं आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये आतापर्यंत किती वेळा संघर्ष झालाय? :

गेली अनेक दशके दोन्ही देशात चाललेल्या युद्धात आजवर हजारो नागरिक मारले गेले आहेत. कित्येकजण तेव्हापासून युद्धाच्या सावटाखाली जगत आहेत. रॉकेट किंवा बॉम्ब आपल्यावर कधीही आदळू शकतो, अशी भीती येथील नागरिकांना सतत सतावत असते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये आतापर्यंत कितीवेळा संघर्ष पेटला? दोन शतकांमध्ये विखुरलेल्या काही मुख्य घटनांची केलेली ही उजळणी :

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

हल्ल्यानंतर इस्रायल व मित्रराष्ट्रांची प्रतिक्रिया काय?

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी हा हल्ला नसून युद्ध आहे, असे जाहीर करत पुढील प्रसंगांची जणू नांदीच दिली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने लष्कराची जमवाजमव सुरू केली असून राखीव सैनिकांना सेवेत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायली वायूदलाने पॅलेस्टाईनवर जोरदार हल्ला चढवले असून लवकरच जमिनीवरील कारवाईदेखील सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने हमासच्या हल्ल्याचा निषेध केला असून इस्रायलला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेप्रमाणेच युरोपातील अनेक देशही इस्रायलला साथ देण्याची शक्यता आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक्स’ समाजमाध्यावर इस्रायलच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आहे. मात्र या सर्व प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. महत्त्वाचे आहे, ते इस्रायलच्या आसपास असलेली अरब राष्ट्रे कोणती भूमिका घेतात हे अद्याप कोणत्याही अरब राष्ट्राने हमासच्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी इस्रायलचा शेजारी लेबनॉनमधील दहशतवादी गट ‘हिजबुल्ला’ आणि इस्रायलमध्ये सातत्याने संघर्ष घडत असतो.

लेबनॉनमधील हमासचा नेता ओसामा हमदान याने अन्य अरब राष्ट्रांना थेट इशाराच दिला आहे. ‘इस्रायलच्या संरक्षणात्मक मागण्या पूर्ण करून परिसरात शांतता नांदू शकत नाही, हे अरब राष्ट्रांनी समजून घ्यावे,’ असे हमदान याचे म्हणणे आहे. त्यामुळे नेतान्याहू यांनी पॅलेस्टाईनवर सर्व ताकदीनिशी हल्ला चढवल्यानंतर त्यांना लेबनॉन सीमेवर लगेचच दुसरी फळी उभारावी लागेल, यात शंका नाही. मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे तो अलिकडेच इस्रायलशी शांतता करार केलेली किंवा करार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली अरब राष्ट्रे काय करणार याचा. सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त यांच्या सीमा इस्रायलला भिडल्या आहेत. या देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली, तर आखातामध्ये दीर्घकालीन आणि रक्तरंजित युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाची भूमिकाही महत्त्वाची असेल. किंबहुना इस्रायल-सौदी करारात खोडा घालण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी बोलून दाखविली आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

इस्रायल-हमास संघर्षाचे परिणाम :

इस्रायल-हमासदरम्यान सुरू झालेल्या संघर्षानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या दराने उसळी मारली. ब्रेंट क्रूड दर सोमवारी ८७.८३ डॉलर प्रतिपिंपावर स्थिरावण्यापूर्वी प्रति पिंप ५ टक्क्यांनी वधारून ८९ डॉलर प्रतिपिंपावरपर्यंत वधारले. गेल्या आठवड्यातील घसरणीचा कल उलटून, पुन्हा वरच्या दिशेने झेपावले आहे. भारतातील सरकारी तेल वितरण कंपन्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

भारत-इस्रायल संबंध कसे? :

भारताने १७ सप्टेंबर १९५० रोजी इस्रायलया अधिकृतरित्या मान्यता दिल्याची घोषणा केली. त्यानंतर लवकरच इस्रायलने मुंबईत इमिग्रेशन कार्यालयाची स्थापना केली. हे नंतर व्यापार कार्यालयात आणि नंतर वाणिज्य दूतावासात रूपांतरित झाले. १९५०-१९९२ पर्यंत दोन्ही देशांत काही असे मजबूत संबंध नव्हते. हळूहळू त्यात उत्क्रांती होत गेली. संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यावर १९९२ मध्ये दूतावास उघडण्यात आले आणि तेव्हापासूनच दोन्ही देशांच्या संबंधात सकारात्मकता दिसण्यास सुरुवात झाली. १९९२ मध्ये संबंध सुधारल्यापासून संरक्षण आणि कृषी हे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय प्रतिबद्धतेचे दोन मुख्य स्तंभ बनले.

भारत-इस्रायल व्यापार :

भारत हा इस्रायलचा आशियातील तिसरा आणि जागतिक स्तरावर सातवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये इस्रायलला भारतीय व्यापारी मालाची निर्यात ७.८९ अब्ज डॉलर एवढी होती आणि इस्रायलची भारताला निर्यात २.१३ अब्ज डॉलर होती.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

इतर महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.