ISRO Launched Pushpak Vehicle : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) ‘पुष्पक’ लाँच व्हेईकलची यशस्वी चाचणी
इस्रोने ‘पुष्पक’ या रीयूजेबल लाँच व्हेईकलची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. हे ऐतिहासिक यश असल्याचं इस्रोने म्हटलं आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अंतराळ तंत्रज्ञान, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
रीयूजेबल लाँच व्हेईकल (RLV) म्हणजे काय?
इस्रोजवळील विविध लाँच व्हेईकल कोणती?
तुमच्या माहितीसाठी :
‘पुष्पक’चाचणी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे असणाऱ्या एअरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये सकाळी ७ वाजून १० मि. च्या सुमारास करण्यात आली. रीयूजेबल, म्हणजेच पुन्हा वापर करता येणारे लाँच व्हेईकल होय. अशा व्हेईकलमुळे अंतराळ मोहिमांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
लाँच व्हेईकलमध्ये असणारी यंत्रे, अत्यंत महागडे असतात. आतापर्यंत एकदा प्रक्षेपित केलेलं यान पुढे अंतराळातच सोडून द्यावं लागत होतं. मात्र, आता या चाचणीनंतर हे यान पृथ्वीवर पुन्हा आणता येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी दोन वेळा अशा रॉकेटचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं आहे. आरएलव्हीची पहिली चाचणी २३ मे २०१६ रोजी श्रीहरीकोटा येथे पार पडली होती. यानंतर काळानुसार त्यामध्ये भरपूर बदल करण्यात आले. आजच्या चाचणीमध्ये पुष्पक विमान पूर्णपणे स्वयंचलितपणे रनवेवर लँड झालं. याचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे अंतराळातील उपग्रहाला नंतर इंधन भरण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी परत आणण्यातही ते मदत करणार आहे.
पॅराशूट, लँडिंग गिअर ब्रेक आणि नोज व्हील स्टिअरिंग सिस्टीम या सर्व यंत्रणा ऑटोमॅटिकली कार्यान्वित झाल्या आणि हे विमान लँड झालं आहे.
हेही वाचा – यूपीएससी सूत्र : जीएसटीची सात वर्ष अन् नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, वाचा सविस्तर…
२) श्रीनगरला मिळालेला ‘वर्ल्ड क्राफ्ट सिटी’चा दर्जा
अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला ‘वर्ल्ड क्राफ्ट सिटी’ म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती आणि सामान्य अध्ययन पेपर २ मधील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी आणि मंच, त्यांची रचना, आदेश, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणजे काय?
‘वर्ल्ड क्राफ्ट सिटी’चा दर्जा कोणत्या संस्थेकडून दिला जातो?
तुमच्या माहिसाठी :
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला ‘वर्ल्ड क्राफ्ट सिटी’ म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता वर्ल्ड क्राफ्ट परिषदेद्वारे दिली जाते. अशा प्रकारची मान्यता मिळालेलं श्रीनगर हे भारतातलं चौथं शहर आहे. यापूर्वी जयपूर, मल्लापूरम आणि म्हैसूर या शहरांना ‘वर्ल्ड क्राफ्ट सिटी’ म्हणून मान्यता मिळाली आहे. वर्ल्ड क्राफ्ट परिषदही एक गैर-सरकारी संस्था आहे. ही संस्था जगभरातील हस्तकलेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने कार्य करते.
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…