Hydrogen Powered Ferry In India : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) भारतातील बिबट्याच्या सद्यःस्थितीबाबतचा अहवाल

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने भारतातील बिबट्याच्या सद्यःस्थितीबाबतचा अहवाल बुधवारी जाहीर केला असून त्यानुसार २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या कालावधीत बिबट्यांच्या संख्येत १.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

nagpur leopard latest news in marathi
Video : मादी बिबट्याने हरविलेले पिल्लू अलगद तोंडात धरून…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?
Environment Department approves billboards near coastal road
सागरी किनारा मार्गाजवळच्या जाहिरात फलकांना पर्यावरण विभागाची मंजुरी
Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट
air pollution mumbai Constructions
बोरिवली, भायखळ्यातील बांधकामे निर्बंधमुक्त, गोवंडी शिवाजीनगर निरीक्षणाखाली; वायू प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर नजर
vehicle caught fire Bhusawal, gas set repair Bhusawal,
जळगाव : भुसावळमध्ये गॅस संच दुरुस्तीवेळी मोटारीचा पेट
aviation turbine fuel price
गॅस सिलिंडर स्वस्त, विमान इंधन दरात १.५ टक्के कपात

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्वी परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या विषयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी:

२०१८च्या सर्वेक्षणानुसार भारतात १२ हजार ८५२ बिबटे आढळले होते. २०२२च्या सर्वेक्षणात ही संख्या वाढून १३ हजार ८७४ इतकी झाली. २०१८ व २०२२मध्ये अनुक्रमे मध्य प्रदेशात ३४२१ व ३९०७, महाराष्ट्रात १६९० व १९८५, कर्नाटकात १७८३ व १८७९ तर तामिळनाडूत ८६८ व आता १०७० इतके बिबटे आहेत. २०१८ आणि २०२२ मध्ये संपूर्ण भारतात केलेल्या सर्वेक्षणाचा विचार केल्यास १.०८ टक्क्यांनी वार्षिक वाढ झाली आहे. शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या पठारी भागात दरवर्षी बिबट्याच्या संख्येत ३.४ टक्क्यांनी घट दिसून आली. २०१८ मध्ये याठिकाणी १२५३ तर २०२२ मध्ये ११०९ बिबटे आढळले. तर आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर, श्रीशैलम तसेच मध्य प्रदेशातील पन्ना व सातपुडा व्याघ्रप्रकल्पांत बिबट्यांची संख्या सर्वाधिक आढळून आली.

व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचे असतानाच संरक्षित क्षेत्राबाहेरील संवर्धनातील अंतर दूर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. संघर्षाच्या वाढत्या घटना बिबट्या आणि मानव अशा दोघांसाठी आव्हाने निर्माण करतात. संरक्षित क्षेत्राबाहेर बिबट्यांचे अस्तित्व तितकेच महत्त्वाचे असल्याने, अधिवास संरक्षण वाढवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारी संस्था, संवर्धन संस्था आणि स्थानिक समुदाय यांचा समावेश असलेले सहयोगी प्रयत्न आवश्यक आहेत, असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) हायड्रोजन इंधनावर चालणारी देशातील पहिली बोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच भारतातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बोटीचे उदघाटन केले. ही बोट कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL)ने तयार केली असून यासाठी एकूण १८ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. लवकरच ही बोट अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर करण्यात येईल.

परीक्षेसाठी महत्तवाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पर्यावरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही बोट नेमकी कशी आहे? या बोटीचे वैशिष्ट्ये काय? आणि ही बोट तयार करताना कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

हायड्रोजन इंधनावर चालणारी ही बोट २४ मीटर लांब असून यात एका वेळी ५० प्रवासी प्रवास करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे ही बोट तयार करण्यासाठी मेट्रोच्या डब्यांप्रमाणेच फायबरग्लास प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. तसेच या बोटीत इंधनासाठी पारंपरिक बॅटरी वापर न करता, हायड्रोजन सिलेंडरचा वापर करण्यात आला आहे. एका बोटीत एकूण पाच सिलेंडर बसवण्यात आले असून यात प्रत्येकी ४० किलोग्राम हायड्रोजन साठवता येते. याशिवाय या बोटीवर तीन किलोवॅटची सौर ऊर्जा प्रणालीदेखील बसवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बोट पूर्णत: पर्यावरणपूरक असून याद्वारे शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल.

महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ‘हरित नौका’ उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार अशाप्रकारच्या बोटींचा वापर अंतर्देशीय वाहतुकीसाठी देशातील इतर भागातही केला जाऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन योजनेलाही चालना मिळू शकते.

‘हरित नौका’ उपक्रमाची घोषणा केंद्र सरकारने जानेवारी २०२४ मध्ये केली होती. या उपक्रमांतर्गत पुढच्या दशकभरात अंतर्देशीय वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण बोटींपैकी ५० टक्के बोटींमध्ये प्रदूषण विरहित इंधनाचा वापर करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. तसेच २०४५ पर्यंत १०० टक्के बोटींमध्ये प्रदूषण विरहित इंधनाचा वापर करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख:

यूपीएससी सूत्र अंतर्गत इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Story img Loader