UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) ब्रिटनमध्ये निटाझीन ड्रग्जचा वाढलेला वापर

nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
food and drug interactions
Food And Drug Interactions : औषधे घेण्यापूर्वी किंवा औषधे घेतल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत? वाचा, आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ माहिती…
yavatmal Adv Pranav Vivek Deshmukh graduated from London School of Economics
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
two arrested with banned drugs at kalyan bail bazaar
कल्याणमध्ये बैलबाजारात प्रतिबंधित औषधांसह दोन जण अटकेत
Reaction from the education sector on UGC NEP implementation proposal pune news
आधी निधी द्या, मग स्वतंत्रपणे मूल्यमापन करा; यूजीसीच्या ‘एनईपी’ अंमलबजावणी प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रातून प्रतिक्रिया
Loksatta anvyarth Canadian Prime Minister Justin Trudeau resigns India Canada Relations
अन्वयार्थ: अखेर ट्रुडो जाणार!

ब्रिटनमध्ये फेंटॅनीलपेक्षाही अधिक शक्तिशाली असलेल्या निटाझीन ड्रग्जची चर्चा होत आहे. या ड्रग्जमुळे अनेकांचा मृत्यू झाला असून एकाने तर त्वचेला छित्र पडल्याची माहिती आहे. या ड्रग्जच्या वाढत्या प्रभावामुळे ब्रिटनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने भारतात हा ड्रग्ज आढळतो का? आणि भारतात अमली पदार्थांसंदर्भात कोणते कायदे अस्तित्वात आहेत. यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

सर्वांत आधी १९५० साली स्वित्झर्लंडच्या सीबा फार्मासुटीकल्स नावाच्या औषधनिर्माण कंपनीने निटाझीन नावाचे औषध तयार केले होते. मात्र हे औषध प्रत्यक्ष बाजारात कधी आलेच नाहीच. हे औषध अतिशय शक्तिशाली होते. तसेच त्याची सवय लगण्याचीही शक्यता होती. हे एका प्रकारचे ओपिऑइड औषध होते. त्यामुळे ते प्रत्यक्ष विक्रीला बाजारात कधी आलेच नाही. ओपिऑइड हे औषध मेंदूतील म्यू-ओपिऑइड रिसेप्टर्स या भागावर प्रभाव टाकतात. मेंदूतील हे रिसेप्टर्स एकदा सक्रिय झाल्यानंतर शरीरात होणारा त्रास, वेदना नाहीशा होता. ओपिऑइड औषधांचे अधिक सेवन केल्यास आनंदी वाटते. तसेच ओपिऑइड्सचे सेवन केल्यास तंद्री येते. हेरॉईन, मॉर्फीन, फेंटॅनील यासारख्या ड्रग्जमुळे मेंदूतील म्यू-ओपिऑइड रिसेप्टर्सना चालना मिळते. निटाझीन हा ड्रग्ज फेंटॅनील प्रमाणेच काम करतो. हा ड्रग्ज हेरॉईनपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि म्हणूनच त्याला ड्रग्जच्या अ श्रेणीत टाकलेले आहे.

भारतातील अंमली पदार्थ विरोधी कायदा?

र्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रापिस सब्सटंन्स अॅक्ट म्हणजेच NDPS Act 1985 आणि NDPS Act 1988 हे दोन कायदे सध्या भारतात लागू आहेत. या कायद्यांनुसार, अंमली पदार्थ बनवणे, जवळ बाळगणे, खरेदी-विक्री करणे, त्यांचा व्यापार, आयात निर्यात करणे हा गुन्हा आहे. केवळ वैद्यकीय आणि शास्त्रीय कारणासाठी अंमली पदार्थांचा वापर करण्यास भारतात परवानगी आहे. या नियमांचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना या कायद्याने दिलेला आहे. तपासयंत्रणा आरोपी अथवा संशयिताविरोधात शोधमोहीम, जप्ती आणि अटक करु शकतात.

ड्रग्ज नियंत्रणांतर्गत ३ श्रेणींमधल्या ड्रग्जचा उल्लेख कायद्यामध्ये आहे. यात एलएसडी, मॅथसारखे सायकोट्रॉपिक पदार्थ, चरस, गांजा अफीमसारखे नार्कोटिक्स पदार्थ आणि मादक पदार्थांचे केमिकलमिश्रित पदार्थ यांचा समावेश आहे. या प्रकरणात जर आरोप सिद्ध झाले तर किमान १० वर्षांची शिक्षा होऊ शकते तसंच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेतही अमली पदार्थांवर प्रतिबंध करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. राज्यघटनेतील भाग चार मधील अनुच्छेद ३६ ते ५१ अंतर्गत राज्य धोरणांच्या मार्गदर्शक काही तत्वांमध्ये यासंदर्भात उल्लेख आहे. यातील अनुच्छेद ४७ नुसार, देशातील लोकांचे पोषणमान व राहणीमान उंचावणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्रार्थमिक कर्तव्यांपैकी एक असल्याचे मानेल आणि विशेषतः मादक पेय आणि आरोग्यास हानिकारक असणार्‍या अमली पदार्थांच्या सेवनावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाला पसंती

मागील दोन दशकांत परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. २०२१ पासून १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांना पसंती दिली. त्यातही सर्वाधिक विद्यार्थी उत्तर अमेरिकेतील कॅनडाला पसंती देत आहेत.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भारतीय समाज या विषयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात का जात आहेत? त्यामागची नेमकी कारणं काय? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

२०२३ मध्ये भारतातील ३,१९,१३० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी उत्तर अमेरिकेतील कॅनडामध्ये गेले आहेत. पूर्वी अमेरिका, युरोपीय राष्ट्रे, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ अधिक होता. मात्र आता विद्यार्थ्यांचा ओघ कॅनडाकडे वाढला आहे. पूर्वी कॅनडामधील शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वाधिक चिनी विद्यार्थी प्रवेश घेत असत. मात्र २०१८ मध्ये कॅनडातील चिनी विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली.

२०१५ मध्ये ४८,७६५ भारतीय विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत होते. तर २०१९ मध्ये ही संख्या चौपटीने वाढून २,१९,८५५ झाली. यंदाच्या वर्षी कॅनडात शिक्षण घेणारे सर्वाधिक परदेशी विद्यार्थी भारतीय आहेत. २०१८ पासून गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ८६ टक्क्यांनी वाढली आहे. मागील काही वर्षांपासून कॅनडाच्या विकासदरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे शैक्षणिक धोरण कॅनडा सरकारकडून राबवले जात आहेत. तसेच भारतातील तीव्र स्पर्धा आणि मर्यादित संधी हे देखील आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader