UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याजवळ असलेली ‘न्यूक्लियर ब्रिफकेस’ काय आहे?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकताच चीनचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यादरम्यान, पुतीन यांच्याजवळ असलेल्या एका बॅगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही बॅग साधी बॅग नसून ‘न्यूक्लियर ब्रिफकेस’ची चर्चा रंगू लागली आहे.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
NHSRCL is working on Mumbai Ahmedabad bullet train project
बुलेट ट्रेनचा २१० मीटर लांबीचा पूल उभारला
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
upsc exam preparation tips,
यूपीएससीची तयारी : सीसॅट पेपर
pune Municipal Corporation plans to open Pimpri flyover by March
पिंपरी : डेअरी फार्म येथील उड्डाणपूल मार्चअखेर खुला?

परीक्षेसाठी महत्त्वाचा का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘न्यूक्लियर ब्रिफकेस’ नेमकी काय आहे? ती कसे काम करते? या ब्रिफकेसची निर्मिती का करण्यात आली?
याआधी न्यूक्लियर ब्रिफेकसचा वापर झालेला आहे का? आणि अन्य देशांकडे अशा प्रकारची ब्रिफकेस आहे का? या मुद्द्यांचा अभ्यास करणे गरजेचं आहे.

तुमच्या माहितीसाठी :

पुतीन यांच्यासोबत नेहमी दोन नौदलाचे अधिकारी असतात. या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाच्या हातात एक ब्रिफकेस असते. याच ब्रिफकेसला ‘न्यूक्लियर ब्रिफकेस’ म्हटले जाते. रशियन या ब्रिफकेसला ‘चेगेट’ म्हणतात. रशियातील एका डोंगराच्या नावावरून या ब्रिफकेसला चेगेट हे नाव देण्यात आलेले आहे. एखाद्या देशावर अणूहल्ला करायचा असेल तर याच चेगेटच्या माध्यमातून रशियन लष्कराला संदेश दिला जातो. म्हणजेच अण्वस्त्र हल्ल्याचा आदेश देण्यासाठी या ब्रिफकेसचा वापर होतो. हा संपूर्ण संवाद ‘काझबेक’ नावाच्या इलेक्ट्रॉनिक कमांड अँड कंट्रोल नेटवर्क प्रणालीच्या माध्यमातून केला जातो. काझबेक या प्रणालीला ‘कावकाझ’ नावाची आणखी एक प्रणाली संदेशवनास मदत करते.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख

२) आरआरटीएसच्या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरआरटीएसच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. पहिल्या टप्प्यात ही रेल्वे दिल्ली ते मेरठ धावणार असून तिचा वेग १८० किलोमीटर प्रतितास एवढा असेल. सेमी हाय स्पीडने धावणारी ही भारतातील पहिली रेल्वे आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील आर्थिक आणि सामाजिक विकास-शाश्वत विकास, गरिबी, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील योजना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील पायाभूत सुविधा; ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरआरटीएस प्रकल्प काय आहे? नमो भारत रेल्वेची निर्मिती का करण्यात आली ? या रेल्वेने दिल्लीला खरंच फायदा होईल का? हे जाणून घेणे गरेजंच आहे.

तुमच्या माहितीसाठी :

आरआरटीएस म्हणजे रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम होय. शहरांमधील आंतरवाहतूक व्यवस्था सुधारणे, व्यापक प्रमाणावर वाहतुकीचे जाळे निर्माण करणे हे आरआरटीएसचं उद्दिष्ट आहे. मुख्यत्वे एनसीआरमध्ये सर्वांना परवडेल अशी, जलद आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उभारण्याचे आणि शहराचा विकास करण्याचे काम आरआरटीएसद्वारे केले जात आहे. एनसीआरमध्ये जलद आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याबाबतचा अभ्यास भारतीय रेल्वेने १९९८-९९ मध्ये केला. त्याअंतर्गत रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमअंतर्गत कोणते विभाग एकमेकांना जोडण्यात येऊ शकतात, हे निश्चित करण्यात येणार होते. याचेच पुढचे पाऊल म्हणजे, २००६ पर्यंत दिल्ली मेट्रो मार्गांचा विस्तार गुडगाव, नोएडा आणि गाझियाबाद या एनसीआर मधील शहरांपर्यत करण्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले.

याबरोबरच मेट्रो, भारतीय रेल्वे आणि आरआरटीएसमधील फरक काय आहे? आरआरटीएस प्रकल्पामागील उद्देश कोणता? तसेच ‘आरआरटीएस’अंतर्गत कोणते टप्पे विकसित करण्यात येतील? यासंदर्भात माहिती घेणे ही महत्त्वाचे आहे.

यासंदर्भातील इतर लेख :

३) गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

स्बबळावर अवकाशात भारतीय अंतराळवीरांना नेण्याच्या इस्रोच्या गगनयान मोहीमेने शनिवारी एक पाऊल पुढे टाकले आहे. अंतराळवीर ज्या अवकाश यानातून अंतराळात जाणार आहेत, त्या यानाच्या आपातका लीन सुटकेची चाचणी (crew escape system) इस्रोने यशस्वी केली. यामुळे भविष्यात प्रत्यक्ष अतंराळवीर अवकाशात पाठवतांना उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाणानंतर काही मिनिटात तांत्रित बिघाड झाला तर प्रक्षेपकावर-रॉकेटच्या अग्रभागावर असेलल्या अवकाशान यानातील अंतराळवीरांना पुन्हा सुखरुप जमिनीवर आणणे हे शक्य होणार आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील आयटी, स्पेस, कॉम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो-टेक्नॉलॉजी या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

अवकाश यान हे रॉकेटच्या अग्रभागावर – टोकावर असते. जर उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाण झाल्यावर रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर रॉकेटचा लगेचच स्फोट होण्याची शक्यता असते. कारण रॉकेटमध्ये कित्येक हजार टन असं अत्यंत ज्वलनशील इंधन असते. अशा वेळी अकाशयानातील अंतराळवीरांची सुरक्षा महत्त्वाची ठरते. तेव्हा हे अवकाश यान लगेचच मुख्य रॉकेटपासून वेगळं होत दूर जात सुखरूप पृथ्वीवर परतणार असं नियोजन असते. सुरुवातीच्या तांत्रिक बिघाडानंतर आपातकालीन सुटकेचे चाचणी यशस्वी झाल्याने आता गगनयान मोहिमेचा पुढचा टप्पा आणखी लवकर पार पडेल अशी आशा आहे.

गगणयान मोहिमेविषयी

आत्तापर्यंत भारतासह विविध देशाच्या अंतराळवीरांनी अवकाश वारी केलेली आहे. असं असलं तरी फक्त रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वतःच्या रॉकेटच्या – प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाशात अंतराळवीरांना पाठवले आहे. आता चौथा देश म्हणून भारत या पंक्तित जाण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच स्बबळावर देशाच्या नागरीकाला अवकाशात पाठवणार आहे. या मोहिमेला ‘गगनयान’ हे नाव देण्यात आलं आहे.

गगनयान मोहिमेसाठी अवकाशात जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले GSLV Mk3 हे प्रक्षेपक – रॉकेट सज्ज आहे. तसेच अवकाशात जाणाऱ्या संभाव्य अंतराळवीरांचे प्रशिक्षण हे रशियात अंतिम टप्प्यात पोहचलं आहे. गगनयान मोहिमेसाठी रशियाचे जरी तांत्रिक सहाय्या घेतलं जात असलं तरी भारतातील ५०० पेक्षा जास्त लहान, मोठ्या उद्योगांचा या मोहिमेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागलेला आहे, सहभाग आहे हे विशेष. गगनयान मोहिमेसाठी आवश्यक स्पेस सूट हे रशियाकडून दिलं जाणार आहे.

दरम्यान, ही गगनयान मोहीम महत्त्वाची का आहे? यासंदर्भातील चाचण्या कशाप्रकारे केल्या जातात? व्योमनॉट्स कोण आहेत? आणि
भारतीय अंतराळ केंद्रकधीपर्यंत उभारलं जाईल, यासंदर्भातील माहिती असणेही महत्त्वाचे आहे.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :

Gaganyaan Mission : इस्त्रोची ‘गगनयान’ मोहिम वेळापत्रकानुसारच, २०२३ च्या अखेरपर्यंत भारताच्या अंतराळवीराची अवकाश वारी

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader