UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) ओडिशातील काळा वाघ

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी ओडिशातील काळ्या वाघांविषयी अधिकृतपणे माहिती दिली. ते म्हणाले ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्प हा एकमेव आहे, ज्या ठिकाणी एकूण १६ पैकी दहा वाघ काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ आहेत. या व्याघ्रप्रकल्पाला त्याच्या आनुवांशिक रचनेमुळे एक वेगळे ‘कन्झर्वेशन क्लस्टर’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भारतातील या एकमेव व्याघ्रप्रकल्पातील या काळ्या वाघांविषयीची उत्कंठा आणखी वाढली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

१९९३ साली एका आदिवासी तरुणाने स्वसंरक्षणासाठी एका ‘मेलेनिस्टिक’ वाघिणीला ठार मारल्याची नोंद आहे. त्यानंतर २००७ पर्यंत हे वाघ अधिकृतपणे या व्याघ्रप्रकल्पात सापडले नाहीत. २१ जुलै १९९३ रोजी पोदागड गावातील सालकू या लहान मुलाने स्वसंरक्षणार्थ या वाघिणीला बाण मारून ठार केले होते. यानंतर २००७ मध्ये अधिकृतपणे या व्याघ्रप्रकल्पात ‘मेलेनिस्टिक’ वाघ आढळला. त्यावेळी कॅमेरा ट्रॅपमध्ये तीन काळ्या वाघांचे छायाचित्र कैद झाले. त्यानंतर वाघांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले. मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य सजीवांच्या त्वचेचा, केसांचा रंग ठरवण्यास कारणीभूत असते. ‘मेलॅनिन’चाच एक प्रकार म्हणजे ‘युमेलॅनीन’. प्राण्यांमध्ये ‘युमेलॅनीन’ हे रंगद्रव्य त्यांच्या काळ्या रंगाच्या त्वचेसाठी कारणीभूत ठरते. ‘इनब्रीडिंग’ म्हणजेच जवळच्या नात्यातील प्राण्यापासून होणारी प्रजोत्पत्ती. ह्या साऱ्या गोष्टींचा परिणाम म्हणून दाट काळ्या रंगाचे पट्टे असलेल्या या वाघांची निर्मिती झाली आहे. कातडीचा रंग त्वचेतील ‘मेलॅनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास, कातडी काळी किंवा गडद रंगाची होते. मात्र, या रंगबदलामुळे वाघाच्या वर्तणुकीत किंवा स्वभावात काहीच फरक पडत नाही.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) खाद्यतेल आयातीविषयी केंद्र सरकारचे धोरण

केंद्र सरकारने नुकतेच परिपत्रक काढून मार्च २०२४ पर्यंत सवलतीच्या दरात खाद्यतेल आयातीचे धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयातशुल्क ५.५ टक्के, तर रिफाइंड खाद्यतेल आयातीवरील शुल्क १३.७ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

देशाला एका खाद्यतेल वर्षांत म्हणजे नोव्हेंबर ते ऑक्टोबर दरम्यान सुमारे २६० ते २७० लाख टन खाद्यतेलाची गरज असते. त्यांपैकी सुमारे १०० लाख टन देशात तयार होते, तर सरासरी १४० ते १६० लाख टन तेलाची आयात केली जाते. एकूण खाद्यतेलात सुमारे ३३.४ टक्के पामतेल, २३.६ टक्के सोयाबीन तेल, मोहरी तेल १५.६ टक्के, सूर्यफूल तेल ८.२ टक्के, सरकी तेल ५.३ टक्के, भुईमूग तेल ४.७ टक्के, अन्य तेलाचा ९.१ टक्के समावेश असतो. २०२७-२८ पर्यंत २८० ते २९० लाख टनांपर्यंत देशाची गरज वाढण्याची शक्यता आहे. पण, देशात तूप, बटरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. तो वापरही वाढतच चालला आहे. मागील वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या खाद्यतेल वर्षांत देशात सुमारे १.३८ लाख कोटी रुपये किमतीच्या १६५ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती. तर त्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या वर्षात १.५७ लाख कोटींचे १४०.३ लाख टन खाद्यतेल आयात झाले होते. तसेच नोव्हेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ या खाद्यतेल वर्षांत १.१७ लाख कोटींचे खाद्यतेल आयात झाले होते.

मागील वर्षी १७.३९ टक्के वाढीसह १६५ लाख टन इतकी उच्चांकी आयात झाली होती. मागील वर्षी रिफाइंड पामतेलाच्या आयातीत २५ टक्क्यांनी वाढ झाली होती. मागील खाद्यतेल वर्षांत पहिल्या तिमाहीत ४७.४६ लाख टन, दुसऱ्या तिमाहीत ३२.५५ लाख टन, तिसऱ्या तिमाहीत ४१.२० लाख टन आणि चौथ्या तिमाहीत ४३.४३ लाख इतकी आयात झाली होती. मोठय़ा प्रमाणात खाद्यतेल आयात झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

३) चीन अनुचाचणीच्या तयारीत

चीन नव्याने अणूचाचणी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘न्यू यॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा आणि राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवरील परीणाम या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

चीनने १९६४ साली शिनजियांग प्रांतातील लोप नूर या अणूचाचणी केंद्रावर पहिली अणूचाचणी केली होती. आताही शिनजियांग येथील लोप नूर अणूचाचणी केंद्रावर अनुचाचणीसाठी हालचाली केल्या जात आहेत, असे न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तात सांगण्यात आले आहे. लूप नूर या अणूचाचणी केंद्राच्या परिसरात विमानांना उतरण्याची सोय आहे. या ठिकाणाचेही नुतनीकरण करण्यात आले आहे. अण्वस्त्र चाचणीसाठी डोंगराच्या बाजूला खोदकाम आणि बांधकाम करण्यात येत आहे. तसेच या भागात नवे रस्ते, वीज, इलेक्ट्रिक सबस्टेशन उभारले जात असल्याचंही न्यू यॉर्क टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

लोपनूरमध्ये चीनकडून अनुचाचणीचा प्रयत्न? ( फोटो सौजन्य – विकिपीडिया)

चीनकडून अणूचाचणी केली जात असेल तर भारतासाठी चिंतेचा विषय आहे. शस्त्रांच्या बाबतीत चीन देश हा भारतापेक्षा वरचढ ठरतो. अशा स्थितीत चीनने अणूचाचणी केल्यास प्रादेशिक सुरक्षेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे भारताने १९९८ साली पोखरण येथील अणूचाचणीनंतर अणूचाचणीवर स्थगिती आणण्याची भूमिका घेतली होती.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.