UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे दररोज घडणाऱ्या घटनांचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘ऑपरेशन अजय’ची घोषणा

बातमीत का आहे?

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधल्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्याची भारत सरकारने ऑपरेशन अजयची घोषणा केली आहे. याच अंतर्गत शुक्रवारी (१३ ऑक्टोबर ) २१२ भारतीयांना घेऊन पहिलं विमान बेन गुरियन विमानतळावरुन दिल्ली विमानतळावर पोहचलं. यावेळी दिल्ली विमातळावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी इस्रायलहून आलेल्या भारतीयांचं स्वागत केलं. त्यामुळे ऑपरेशन अजय नेमकं का आहे? तसेच इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या किती भारतीय राहतात? या संदर्भातील माहिती असणे आवश्यक आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडमोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये भारतीय वंशाचे अंदाजे ८५ हचार ज्यू नागरीक आहेत. जवळपास ५० ते ६० च्या दशकात या लोकांचे भारतातून इस्रायलमध्ये स्थलांतर झाले. यापैकी बहुसंख्य नागरीक हे महाराष्ट्रातील (बेने इस्रायली), केरळ (कोचीनी ज्यू) आणि कोलकाता (बगदादी ज्यू) मधील आहेत. अलिकडच्या काह वर्षांत, मिझोराम आणि मणिपूर (Bnei Menache) मधील काही भारतीय ज्यू लोकही इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले आहेत. याबरोबरच इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय नागरिक आहेत. यामध्ये हिरे व्यापारी, आयटी कर्मचारी आणि विद्यार्थी आहेत.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख

हेही वाचा – यूपीएससी सूत्र : सनातन धर्मावरून नेमका वाद काय? परंपरा काय? मोदी काय म्हणाले अन् बरंच काही…

२) गर्भपातावरून सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद

बातमीत का आहे?

सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने बुधवारी विवाहित महिलेला तिची २६ आठवड्यांनंतर गर्भपात करण्याची परवानगी देण्याचा ९ ऑक्टोबर रोजीचा आदेश मागे घेण्यासंदर्भात स्वतंत्र निर्णय दिला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन एका न्यायाधीशांमध्ये मतभेद झाल्याचं बघायला मिळालं. यापैकी एका न्यायाधीशाने गर्भपाताला परवानगी देण्याबाबत नाराजी व्यक्त केली, तर दुसऱ्या न्यायाधीशांनी महिलेच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे असे मत व्यक्त केले.

या सुनावणीदरम्यान, गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबवा असे कोणते न्यायालय म्हणेल असा प्रश्न न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी विचारला. तसेच गर्भपात करण्याचा आग्रह धरणाऱ्या महिलेच्या निर्णयाचा कोर्टाने आदर केला पाहिजे, असं मत न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी व्यक्त केलं. दोन न्यायाधीशांमधील मतभेद लक्षात घेता, ही याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतात गर्भपातासंदर्भात काय कायदे आहेत? या कायद्याचे महत्त्व काय? यासंदर्भात माहिती असणे गरजेचं आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील शासन-संविधान, सार्वजनिक धोरण, मूलभूत हक्क तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ आणि पेपर ४ च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

देशातील कोणतीही महिला मग ती विवाहित असेल किंवा अविवाहित असेल, २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करू शकते. सप्टेंबर २०२२ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने अविवाहित आणि अविवाहित महिलांना २४ आठवड्यांपर्यंत सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार दिला होता.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :

३) युवकासांठी ‘माय भारत’

बातमीत का आहे?

गेल्या महिन्यात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांप्रमाणे तरुणही निर्णायक मतदार असल्याने केंद्र सरकारने आता युवाशक्तीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तरुणांच्या विकासासाठी केंद्राची युवा डिजिटल शाखा उघडली जाणार असून तिचे ‘माय भारत’ ( मेरा युवा भारत ) असे नामकरण करण्यात आले आहे. या डिजिटल संस्थेच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या संस्थेचे लोकार्पण सरदार पटेल यांच्या जयंतीला म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही संस्था? यामुद्द्यांचा अभ्यास करणे गरजेचं आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषयी यूपीएससी पूर्व परीक्षेतील आर्थिक आणि सामाजिक विकास-शाश्वत विकास, तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शिक्षण, मानवी संसाधने या घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी

पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, ‘मेरा भारत’ या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट तरुणांच्या विकासासाठी अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे असून देशात १५ ते १९ या वयोगटातील सुमारे ४० कोटी तरुणांना ‘मेरा भारत’ या संस्थेचा लाभ होणार आहे. तसेच युवकांना शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी ही संस्था माध्यम काम करेल. तसेच सरकारच्या वेगवेगळय़ा योजनांची माहिती इथे मिळू शकेल आणि कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांना सहभागीही होता येईल.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :

  • तरुणांच्या विकासासाठी केंद्राची डिजिटल शाखा; ‘मेरा भारत’ संस्थेचे ३१ ऑक्टोबर रोजी लोकार्पण

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.