UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) सह्याद्री व्याघ्रप्रकल्प

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ नाही. पण येथे वाघाचे अस्तित्व राहिले आहे. ते कायमस्वरुपी असावे यासाठी आता राज्याच्या वनखात्याने पावले उचलली आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाने त्यावर शिक्कामोर्तब केले असून लवकरच या व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना व्याघ्रदर्शन होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आठ वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सोडण्याची परवानगी वनखात्याने मागितल्यानंतर नुकतेच प्राधीकरणाने ही परवानगी दिली आहे. या प्रकल्पासाठी प्राधीकरणाकडून १०.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील पर्यावरण आणि जैवविविधतात या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

विदर्भातील पाच व्याघ्रप्रकल्पांच्या तुलनेत या व्याघ्रप्रकल्पासमोर नैसर्गिक आव्हानांसोबतच व्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ सामावून घेण्याची क्षमता असतानाही येथे वाघ स्थिरावू शकले नाहीत. कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्यांचा समावेश सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आहे. या व्याघ्रप्रकल्पात वाघ स्थिरावण्याऐवजी येतात आणि जातात. साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत याठिकाणी वाघांच्या हालचाली दिसून येतात. नैसर्गिक संरचना आणि अपुरे मनुष्यबळ हेदेखील वाघ न स्थिरावण्यामागील एक कारण आहे.

महत्त्वाचे म्हणजे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात येणारे वाघ हे विदर्भातील म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. या दोन्ही प्रदेशातील भौगोलिक रचनेत (लँडस्केप) मोठी तफावत आहे. विदर्भातील लँडस्केप सपाट आहे आणि सह्याद्रीचा परिसर डोंगराळ म्हणजेच उंचसखल आहे. त्यामुळे सपाट प्रदेशातील वाघ या डोंगराळ प्रदेशात किती स्थिरावतील, याबाबत शंका आहे. याठिकाणी बंदीपूर, पेरियार, बद्रा याठिकाणचे वाघ स्थिरावण्याची शक्यता अधिक आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) पेंच व्याघ्रप्रकल्पात हत्ती कॅम्प

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प दुर्लक्षित असताना, पेंच व्याघ्रप्रकल्पात मात्र कर्नाटकातून हत्ती आणून नव्याने हत्ती कॅम्प तयार केला जात आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. वनखात्याच्या या भूमिकेवर वन्यजीवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचा का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील पर्यावरण आणि जैवविविधता या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा प्रकल्प नेमका काय आहे? यामागचा उद्देश आणि कारणे कोणती? या प्रकल्पाची एकूण किंमत किती? यासंदर्भातील माहिती असणेही गरजेचं आहे.

तुमच्या माहितीसाठी :

पेंच व्याघ्रप्रकल्पात बचाव कार्य आणि गस्तीसाठी कर्नाटकातून चार हत्ती आणले जात आहेत. हा प्रकल्प जवळजवळ पूर्णत्वास आला आहे. या चार हत्तींबरोबर माहूत आणि चाराकटरही येणार आहेत. मानव-वन्यप्राणी संघर्ष यासारखी गंभीर समस्या हाताळण्यासाठी या व्याघ्रप्रकल्पात स्वतंत्र हत्ती कॅम्प तयार केला जात आहे. जिथे वाहनांना प्रवेश नाही, अशा ठिकाणी गस्त घालण्यास हत्ती उपयुक्त ठरतात, असे खात्याचे म्हणणे आहे. त्यासाठीच येथे हत्ती आणण्याचा घाट घातला जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात ‘अवनी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘टी-१’ वाघिणीला जेरबंद करण्याच्या कारवाईदरम्यान प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. मध्य प्रदेशातील हत्तींवर महाराष्ट्राला अवलंबून राहावे लागले, तर ताडोबातील एकट्या अप्रशिक्षित हत्तीने एका महिलेला पायदळी तुडवले होते. त्यामुळे बचाव कार्य आणि गस्तीसाठी पेंच व्याघ्रप्रकल्पात हत्ती कॅम्प असावा, अशी कल्पना तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी मांडली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी कर्नाटकला पत्र लिहिले होते. पण, करोनामुळे हा प्रस्ताव रखडला होता. दरम्यान, आता कर्नाटकातून हत्ती आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

३) चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ला उतरती कळा

चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ या मोहिमेची तिसरी दोन दिवसीय परिषद १८ ऑक्टोबररोजी (मंगळवारी) रोजी पार पडली. या परिषदेत फारच थोड्या देशांचे राष्ट्रप्रमुख परिषदेसाठी बीजिंगला उपस्थित होते. विशेष म्हणजे सुरुवातीला प्रचंड गाजावाजा झालेल्या या प्रकल्पाकडे आता बहुतांश देश संशयाने बघू लागले आहेत.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध व विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा भारतावर होणारा परिणाम या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला टक्कर देण्यासाठी १० वर्षांपूर्वी चीनने ‘बीआरआय’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. जगभरात बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा बीआरआय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मोहिमेला चीनमध्ये ‘वन बेल्ट वन रोड’ या नावाने संबोधले जाते. २०१३ साली जिनपिंग यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये मध्यवर्ती संकल्पना म्हणून ही मोहीम सुरू झाली. जगभरातील अविकसित आणि अर्धविकसित देशांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये व्यापक गुंतवणूक हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

आतापर्यंत १५० पेक्षा जास्त देश किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी ‘बीआरआय’अंतर्गत गुंतवणूक करण्यात आली आहे. अर्थात, पायाभूत सुविधांच्या विकासामधून चिनी कंपन्यांच्या नफ्याचा एक उद्देश असला, तरी जगाच्या नेतृत्वाचा अक्ष अमेरिकेकडून आपल्याकडे वळविण्याचा चीनचा छुपा उद्देश लपून राहिलेला नाही. आपली शक्ती वाढवत जागतिक घडामोडींमध्ये नेतृत्वाची भूमिका कशी मिळविता येईल, यासाठी चिनी नेतृत्वाची ही खटपट मानली जाते. एका अर्थी, अमेरिकेच्या ‘मार्शल प्लॅन’शी या मोहिमेची तुलना करता येईल. बीआरआयमध्ये ऑगस्ट २०२३ पर्यंत १५५ देशांनी नोंदणी केली होती. बीआरआयमध्ये सहभागी असलेल्या देशांची एकत्रित लोकसंख्या ही तब्बल ७५ टक्के असून सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा निम्मा वाटा आहे.

बीआरआय मोहिमेअंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधून चीन बांधत असलेल्या ‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’ या महामार्गाला भारताचा विरोध आहे. त्यामुळे २०१७ आणि २०१९नंतर आता बीजिंग परिषदेवरही भारताने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बीआरआय ही मोहीम प्रस्थापित आंतरराष्ट्रीय धोरणांना बांधील असावी, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन व्हावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात पारदर्शकता असावी, अशी भारताची अपेक्षा आहे. मात्र चीनची धोरणे याला विपरीत असल्यामुळे भारत या मोहिमेपासून दूर राहणे पसंत करीत आहे.

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.