UPSC Key : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) सलखन जीवाश्म उद्यान

उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने २०२६ पर्यंत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सलखन जीवाश्म उद्यानाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री डॉ नीलकंठ तिवारी आणि यूपी इको-टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डाचे अतिरिक्त संचालक प्रखर मिश्रा यांनी उद्यानाला अलीकडेच भेट दिली.

Government discloses data on missing women in nagpur
धक्कादायक… ८ महिन्यांत नागपुरातून १३०० हून अधिक महिला बेपत्ता; प्रेमप्रकरण, अनैतिक संबंधांतून पलायन…
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Residents on the master list will have to pay a lower rate for more area MHADA Vice Presidents decision
‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांना ज्यादा क्षेत्रफळासाठी कमी दर मोजावा लागणार! म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
elephant census
UPSC Key : यूपीएससी सूत्र : भारतातील हत्ती गणना होणारा विलंब अन् नामिबियामध्ये ७०० प्राण्यांच्या कत्तलीचे आदेश, वाचा सविस्तर…
There is no anti encroachment team action of the Municipal Corporation against the welcome boards of CIDCO Chairman
सिडको अध्यक्षांच्या स्वागत फलकांनी बेलापूर विद्रूप; महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गप्प
prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा
eco friendly development in navi mumbai city green building projects in navi mumbai
 नवी मुंबईत पर्यावरणप्रिय हरित बांधकांना चालना; ‘सीआयआय-आयजीबीसी’च्या ३० व्या केंद्राचे कार्यान्वयन
hindenburg questions sebi chief madhabi buch s silence amid congress claims
सेबी अध्यक्षांवर नव्याने आरोप;प्रतिसादशून्य मौनावरही ‘हिंडेनबर्ग’कडून प्रश्न

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

सलखन जीवाश्म उद्यान कुठे आहे?
या उद्यानाची वैशिष्ठे काय?

तुमच्या माहितीसाठी :

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणानुसार (GSI), सलखन जीवाश्म उद्यानामध्ये खडकांवर एकाग्र वलयांच्या रूपात उत्तम प्रकारे विकसित झालेले स्ट्रोमॅटोलाइट्स आढळतात. हे उद्यान विंध्य खोऱ्यात स्थित आहे, जे एक महत्त्वाचे आंतरखंडीय खोरे आहे. येथे प्रोटेरोझोइक कालखंडातील गाळाचे खडक आढळतात, ज्यांचे वय अंदाजे १७०० ते ९०० दशलक्ष वर्षांदरम्यानचे आहे.

या प्राचीन खडकांमध्ये स्ट्रोमॅटोलाइट्स व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे जीवाश्म किंवा जीवाच्या शरीराचे अवशेष आढळत नाहीत. GSI ने स्पष्ट केले आहे की, स्ट्रोमॅटोलाइट्स ही सायनोबॅक्टेरियाद्वारे तयार केलेली जैविक रचना आहे, ज्यांना निळे शैवाल देखील म्हणतात, जी समुद्राच्या तळावर वाढतात आणि पातळ थरांमध्ये संरक्षित असतात.

सलखन जीवाश्म उद्यानात सापडलेली जीवाश्मं हे एकपेशीय वनस्पती आणि स्ट्रोमेटोलाइट प्रकारातील आहेत. कैमूर वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या कैमूर रेंजमध्ये सुमारे २५ हेक्टर क्षेत्रात हे उद्यान पसरले आहे, हे उद्यान राज्य वन विभागाच्या अखत्यारीत येते. या उद्यानात आढळणारी जीवाश्मं इतर जीवाश्मांपेक्षा वेगळी आहेत आणि भूगर्भशास्त्रज्ञांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्पत्तीबद्दल महत्त्वपूर्ण माहितीचा उलगडा त्यांच्या अभ्यासातून होऊ शकतो.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :

सलखन जीवाश्म उद्यान लिहिणार जीवसृष्टीचा नवा इतिहास; या उद्यानाचे महत्त्व काय?

२) नॉर्दर्न बाल्ड आयबिसच्या स्थलांतरासाठी पक्षी संवर्धकांचे प्रयत्न

नॉर्दर्न बाल्ड आयबिसच्या हा त्याच्या विशिष्ट काळ्या-आणि-हिरव्या पिसाऱ्यासाठी, टक्कल असलेले लाल डोके आणि लांब वक्र चोचीसाठी ओळखला जातो. मात्र, यूरोप आणि अमेरिकेत प्राणीसंग्रहालयात वाढलेल्या आणि तिथेच जन्मलेल्या या पक्ष्यांना हिवाळ्यात कुठे स्थलांतर करावे हे सहज कळत नाही. त्यामुळे थंडीत गारठून त्यांचा मृत्यू होतो. यामुळे पक्षी संवर्धकांनी यातून बोध घेत धोरणात्मक पाऊल उचलले आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

वाल्ड्रॅपटेमचे शास्त्रज्ञ ‘फॉस्टर पालक’ म्हणून तरुण नॉर्दर्न बाल्ड आयबिस या पक्षाला लांब स्थलांतराच्या मार्गावर नेण्यासाठी अल्ट्रालाइट विमानाचा वापर करतात. प्रवासाची तयारी करण्यासाठी एका दिवसाची पिल्ले त्यांच्या जन्माच्या वातावरणातून बाहेर काढली जातात आणि त्यांच्या मानवी फॉस्टर पालकांकडे सोपवली जातात. हे मानवी पालक त्या एका दिवसाच्या पक्ष्यांशी आपले विश्वासाचे नातं तयार करतात.

१९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘फ्लाय अवे होम’ या चित्रपटात नायक पायलट अनाथ गुसना स्थलांतरित पक्ष्यांना मार्ग दाखवण्यासाठी एक लहान विमान चालवतो. याच चित्रपटातून प्रेरणा घेऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

सुरुवातीला या पक्ष्यांना बव्हेरिया ते मध्य इटलीमधील टस्कनीपर्यंत उडण्यास शिकवले गेले. मध्य युरोपमधील जंगली वाल्ड्रॅप्सने ऐतिहासिकदृष्ट्या उड्डाण केलेला हा मार्ग होता. २०११ साली या प्रयोगातील पहिले स्वतंत्र स्थलांतर झाले आणि त्यानंतर अनेक पक्षांनी सुमारे ५५० किमी अंतर पार केले. परंतु हवामान बदलाच्या परिणामांमुळे हे पक्षी आता हंगामाच्या उत्तरार्धात उडू लागले आहेत.
यामुळे ते थंड, अधिक धोकादायक हवामानात आल्प्स पार करू शकतात आणि हवेच्या उबदार प्रवाहांच्या मदतीशिवाय वरच्या दिशेने उडू शकतात आणि त्यामुळे उडणाऱ्या पक्ष्यांना ऊर्जा वाचवण्यास मदत होते. म्हणूनच वाल्ड्रॅपटेमने गेल्या वर्षी बव्हेरिया ते दक्षिण स्पेनमधील अंडालुसियापर्यंतचा एक नवीन मार्ग सुरू केला. या वर्षीचा मार्ग अंदाजे २,८०० किमी आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३०० किमी लांब आहे. फ्रिट्झने या महिन्याच्या सुरुवातीला अप्पर बाव्हेरियामधील पॅटरझेल येथील एअरफील्डवरून ३६ पक्ष्यांच्या थव्यासह प्रस्थान केले. ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा प्रवास पूर्ण होईल.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना धोका आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी आदर्श पर्यावरणीय परिस्थिती आणि निवासस्थान शोधण्यासाठी लांबचा प्रवास करणाऱ्या पक्ष्यांना खाद्य, प्रजनन आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी, हवामानातील बदलामुळे विशिष्ट आव्हानांना तोंड द्यावे लागते आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे स्थलांतरणाची पद्धत, मार्ग आणि वेळ दोन्ही बदलत आहे. त्यामुळे अन्न आणि निवासस्थानाच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे आणि प्रजातींमधील परस्परसंवादात व्यत्यय येत आहे.

काही पक्ष्यांच्या प्रजातींनी पूर्णपणे स्थलांतर न करण्याचे किंवा ते आक्रमक प्रजाती ठरतील अशा ठिकाणी स्थलांतरित होण्याचे निवडले आहे, ज्यामुळे इतरांना धोका निर्माण होतो. त्यामुळे नॉर्दर्न बाल्ड आयबिसचे संवर्धन लक्षणीय आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

नामशेष होत चाललेले पक्षी, हरवलेले स्थलांतराचे मार्ग आणि विमानातून मार्गदर्शन; संवर्धनतज्ज्ञ नेमके काय करत आहेत?

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा..