UPSC Key In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१) भारतीय न्याय संहितेतील तरतुदींना ट्रकचालकांचा विरोध
भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील ‘हिट अँड रन’ अपघात-विषयक तरतुदींना देशभरातील ट्रकचालक आणि बसचालकांकडून विरोध करण्यात येत आहे. याविरोधात विविध राज्यांमध्ये आंदोलन सुरू आहे. त्याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हा कायद्यातील तरतुदी नेमका काय आहेत? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सार्वजनिक धोरण आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील सरकारची कार्यकारी आणि न्यायपालिका मंत्रालये आणि विभागांची रचना, संघटना आणि कार्यप्रणाली या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता (आयपीसी) कायद्यात बदल करून ‘भारतीय न्याय संहिता’ आणली आहे. नव्या कायद्यानुसार आता ‘हिट अँड रन’ प्रकरणातील शिक्षेचा कालावधी वाढवला आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या चालकाला आयपीसीच्या कलम ३०४ ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू ) नुसार केवळ दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती आणि त्याला जामीनही मिळत होता. मात्र, नव्या कायद्यानुसार अपघात झाल्यानंतर वाहनचालक पोलीस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला १० वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाखांचा दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जे वाहनचालक अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जातात वा पोलिसांना अपघाताची माहिती देतात त्यांना शिक्षेतून थोडाफार दिलासा मिळणार आहे. याबरोबरच अपघातग्रस्त चुकीच्या पद्धतीने वाहनासमोर आला किंवा नियमांचे उल्लंघन करून रस्ता ओलांडत असेल तर वाहनचालकांना दहाऐवजी पाच वर्षांची शिक्षा आणि दंडात्मक कारवाई, अशीही तरतूद करण्यात आली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ या वर्षांत देशभरात ३० हजार ४०० नागरिकांचा हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक घटना या उत्तर प्रदेशातील (३,९९४) असून महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक (३,७२३) लागतो. महत्त्वाचे म्हणजे या वर्षात मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर ‘हिट अँड रन’ची प्रकरणे नोंदविली गेली आहेत.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- विश्लेषण: ‘भारतीय न्याय संहिते’तील तरतुदींना वाहतूकदारांचा विरोध का?
- भारतीय दंड संहितेची जागा घेतलेल्या न्याय संहितेत नवं काय? नेमके बदल काय?
- भारतीय दंड संहिता (IPC) कायदा कधी आणि कसा अस्तित्वात आला?
२) भारत रत्न पुरस्काराची ७० वर्ष
भारत रत्न पुरस्काराला यंदा ७० वर्ष पूर्ण झाली आहेत. २ जानेवारी १९५४ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी भारतातील सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली होती. पुढे त्याच वर्षी पद्म पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. त्यामुळे हे पुरस्कार नेमके काय आहेत? आणि कोणत्या व्यक्तीला हे पुरस्कार दिले जातात? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
भारत सरकारच्या सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गॅलेनटरी (शौर्य) आणि सिव्हिलियन्स (नागरी) अशा दोन पुरस्कारांचा समावेश होतो. शौर्य पुरस्कार भारत सरकारकडून सशस्त्र सेवेतील असमान्य कामगिरी- पराक्रमासाठी देण्यात येतो. तर सिव्हिलियन्स अर्थात नागरी पुरस्कार हे नागरिकांसाठी असतात. नागरी पुरस्कार दोन प्रकारचे आहेत, ते म्हणजे भारतरत्न आणि पद्म पुरस्कार.
भारतरत्न : हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, २ जानेवारी १९५४ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी हा पुरस्कार सुरू केला. दरवर्षी या पुरस्कारासाठी पंतप्रधान तीन जणांची निवड करतात. या सन्मानाच्या विजेत्याला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले (सनद) प्रमाणपत्र दिले जाते. तसेच पिंपळाच्या पानाच्या आकाराचे पदकही दिले जाते. हा पुरस्कार भारतीय पुरस्कारांच्या श्रेणीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात अतुलनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
पद्म पुरस्कार : हा अत्यंत महत्त्वाचा नागरी सन्मान मानला जातो, जो दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जातो. पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री अशा तीन विशिष्ट श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण पुरस्कार हे राष्ट्रासाठी अनुकरणीय आणि सन्माननीय सेवेचे प्रतीक आहे. प्राप्तकर्त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते. पद्म पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा दरवर्षी मार्च- एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो. पद्म पुरस्कारांचे पूर्वी पाहिला वर्ग, दूसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा तीन विशिष्ट भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. त्यानंतर १९५५ मध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे नामकरण करण्यात आले.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.