UPSC Key : Malaysia Orangutan Diplomacy : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) अमेरिकेच्या आण्विक धोरणातील बदल

अवघ्या चार-पाच महिन्यांची कारकीर्द बाकी असताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ‘गोपनीय आण्विक धोरणा’त बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आणखी एका शीतयुद्धाची बीजे रोवली गेली आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा आणि राजकारणाचा परीणाम या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी

‘न्यूक्लिअर एम्प्लॉयमेंट गाईडन्स’ या नावाने ओळखला जाणारा हा दस्तावेज अमेरिकेच्या अण्वस्त्रविषयक धोरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा दस्तावेज दर चार वर्षांनी अद्ययावत केला जातो आणि त्याला राष्ट्राध्यक्षांची मंजुरी घ्यावी लागते. ही कागदपत्रे गोपनीय असतात.

मार्च महिन्यात बायडेन यांनी नव्या धोरणाला मंजुरी दिली. मात्र यावेळी केवळ दर चार वर्षांची औपचारिकता नसून अमेरिकेच्या धोरणात खरोखरच मोठा बदल घडल्याचे वृत्त आहे. खरे म्हणजे हा दस्तावेज एवढा गोपनीय असतो, की त्याबाबत फारशी माहिती बाहेर येत नाही. मात्र पेंटागॉनमधील काही धोरणकर्त्यांनी दिलेल्या संकेतांमुळे अमेरिकेच्या अण्वस्त्रनीतीचा अक्ष बदलत असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील प्रथितयश ‘एमआयटी’ संस्थेतील आण्विक धोरणकर्ते विपिन नारंग हे काही काळ पेंटागॉनचे (अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय) सल्लागार होते. आपल्या मूळ संस्थेत परण्यापूर्वी त्यांना नव्या धोरणाबाबत संकेत देण्याची परवानगी देण्यात आले. नारंग यांचे शब्द असे… “अनेक अण्वस्त्रधारी शत्रूंचा सामाना करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अलीकडेच अद्ययावत ‘न्यूक्लिअर एम्प्लॉयमेंट गाईडन्स’ जारी केले. विशेषतः चीनच्या आण्विक शस्त्रागाराच्या आकार आणि विस्ताराचा यात विचार केला गेला आहे.” याचा अर्थ अमेरिकेच्या धोरणाचा अक्ष रशियाकडून चीनकडे वळला आहे. मात्र अन्य एका अधिकाऱ्याच्या विधानामुळे नव्या धोरणाबाबत अधिक स्पष्टता येते.

राष्ट्रीय सुरक्षा समितीचे शस्त्रास्त्र नियंत्रण विभागाचे वरिष्ठ संचालक प्रणय वड्डी यांनी जूनमध्ये याच दस्तावेजाचा संदर्भ दिला आहे. नवी रणनीतीही रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांना एकाच वेळी रोखण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

विश्लेषण : अमेरिकेच्या आण्विक धोरणात आमूलाग्र बदल… चार शत्रूराष्ट्रांविरुद्ध नव्या शीतयुद्धाची नांदी?

२) ‘ओरंगुटान डिप्लोमसी’

मलेशिया हा पाम तेलाच्या सर्वांत मोठ्या विक्रेत्या देशांपैकी एक आहे. या देशाने मध्यंतरी एक धोरण राबविण्यास सुरुवात केली. पाम तेल खरेदी करणार्‍या देशांना ओरंगुटान ही वानराची प्रजाती भेट देण्याचे हे धोरण होते. परंतु, या धोरणात आता बदल करण्यात आला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधता या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

‘ओरंगुटान डिप्लोमसी’ म्हणजे काय?

तुमच्या माहिसाठी :

या वर्षी मे महिन्यात जोहरी घनी यांनी पहिल्यांदा पाम तेल खरेदी करणाऱ्या देशांना ओरंगुटान भेट देण्याची त्यांची योजना जाहीर केली होती. ते म्हणाले होते की, हे धोरण चीनच्या ‘पांडा डिप्लोमसी’वर आधारित आहे. मुत्सद्देगिरी आणि वन्यजीव संरक्षण म्हणून चीनमधून इतर देशांमध्ये ‘पांडा डिप्लोमसी’अंतर्गत पांडा पाठवण्यात आले होते.

मलेशिया हा जगातील दुसरा सर्वांत मोठा पाम तेल उत्पादक देश आहे. पाम तेल उद्योगाचा अधिक विस्तार करण्यासाठी या देशावर प्रचंड दबाव आला आहे. हा उद्योग जंगलतोडीशी जोडला गेला आहे; ज्यामुळे ओरंगुटानचा अधिवासही नष्ट होत आहे.

मलेशिया, इंडोनेशिया व ब्रुनेई यांनी सामायिक केलेल्या बोर्नियो आणि सुमात्रा बेटांच्या वर्षावनांमध्ये ही वानरांची प्रजाती आढळते. सध्या ओरंगुटानची संख्या सुमारे १,२०,००० आहे. प्रामुख्याने पाम तेलाच्या वाढत्या व्यापारामुळे जलद जंगलतोड होण्याचा धोका उद्भवला आहे, असे जागतिक वन्यजीव निधीच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आहे. त्यांच्या प्रस्तावित ‘ओरंगुटान डिप्लोमसी’द्वारे घनी यांना पाम तेलाच्या उत्पादनामुळे ओरंगुटानवर होणार्‍या परिणामासंबंधीची चिंता दूर करायची होती.

प्राणी कल्याण संस्थांनी मलेशियाच्या सुरुवातीच्या धोरणावर टीका केली होती. ओरंगुटान राहतात अशा जंगलांचा पाम तेल उत्पादनासाठी नाश करणे आणि त्यांना व्यापारी देशांकडून अनुग्रह मिळविण्याच्या उद्देशाने भेटवस्तू म्हणून देणे ही अतिशय गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटलं होतं.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

पाम तेल खरेदी करणार्‍या देशांना वानरे भेट देण्याचे धोरण मलेशियाने बदलले? ‘ओरंगुटान डिप्लोमसी’ म्हणजे नक्की काय?

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…