Venezuela Glaciers Melting : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) व्हेनेझुएलातून लुप्त झालेल्या हिमनद्या

जगभरात लोक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहेत. याच बदलत्या वातावरणामुळे व्हेनेझुएलातून तील हिमनद्या पूर्णपणे वितळल्या आहेत. आधुनिक इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.

Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?
pm narendra modi donald trump
“माझे मित्र…”, नरेंद्र मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनकॉलनंतर सोशल पोस्ट; म्हणाले…
First Miss World Kiki Hakansson Death
First Miss World : जगातली पहिली ‘विश्वसुंदरी’ काळाच्या पडद्याआड! किकी हॅकन्सन यांचं ९५ व्या वर्षी निधन
msrdc new Mahabaleshwar project
नवीन महाबळेश्वरला केवळ १०० सूचना-हरकती, आराखड्यावर सूचना-हरकती नोंदविण्यासाठी अखेरचे ४ दिवस
loksatta readers feedback
लोकमानस: सिग्मॉइड कर्व्हच्या उतारावर महाराष्ट्र

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी, आंतराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि पर्यावरणीय पारिस्थितिकी, जैव-विविधता आणि हवामान बदल या विषयावरील सामान्य समस्या तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील पर्यावरणीय पारिस्थितिकी, जैव-विविधता आणि हवामान बदल या विषयावरील सामान्य समस्या या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

हिमनदी म्हणजे काय?

जगाच्या नकाशावर व्हेनेझुएलाचे स्थान

व्हेनेझुएलातील हिमनदी वितळण्याचे कारण आणि परिणाम

तुमच्या माहितीसाठी :

जमिनीवर शतकानुशतके बर्फ साचल्यामुळे हिमनद्या (ग्लेशियर) तयार होतात. यालाच हिमवाह, हिमानी असेदेखील म्हटले जाते. हा बर्फाचा थर म्हणजे पृथ्वी आणि महासागरांचे संरक्षणात्मक आवरण आहे.

अमेरिकेतील जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, या हिमनद्या सामान्यतः त्या भागात अस्तित्वात असतात, ज्या भागात सरासरी वार्षिक तापमान गोठणबिंदूच्या जवळ पोहोचते.

हिवाळ्यातील पर्जन्यवृष्टीमुळे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ जमा होतो. मोठा आकार आणि गुरुत्वाकर्षण यांमुळे हिमनद्या अतिशय संथ नद्यांप्रमाणे वाहतात. ग्लेशियर म्हणून बर्फाचे वस्तुमान किती मोठे असणे आवश्यक आहे, यावर सार्वत्रिक एकमत नाही. मात्र, यूएसजीएसनुसार सामान्यतः याचा आकार १० हेक्टर असावा लागतो.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या अपेक्षेपेक्षा दुप्पट वेगाने वितळत आहेत. जसा बर्फ उष्णतेच्या संपर्कात आल्यावर वितळतो, त्याचप्रमाणे उष्ण तापमानामुळे हिमनद्या वितळत आहेत. इतके उष्ण तापमान होण्याचे कारण म्हणजे हरितगृह वायू (जीएचजी) आहे.

१८ व्या शतकात औद्योगिक क्रांती सुरू झाल्यापासून कार्बन डाय-ऑक्साइड आणि मिथेनसारखे हरितगृह वायू वातावरणात सोडले जात आहेत. त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) भारतीय वंशाच्या व्यक्तीचं पहिलंवहिलं अंतराळ पर्यटन

भारतीय वंशाचे उद्योजक आणि वैमानिक गोपी थोटाकुरा हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. रविवारी (१९ मे) गोपी थोटाकुरा यांच्यासहित एकूण सहा जणांनी अंतराळ पर्यटन मोहिमेत सहभाग नोंदवत अवकाशातील सफारीचा आनंद घेतला.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अणुऊर्जा, अलीकडील मोहिमांसह अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, डार्क मॅटर, हिग्स बोसॉन, जीएम क्रॉप्स, चालू घडामोडी आणि आयटी, अंतराळ, संगणक, रोबोटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान या घटकाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

अंतराळ पर्यटन ही संकल्पना काय?

Sub-Orbital पर्यटन म्हणजे काय?

Orbital पर्यटन म्हणजे काय?

तुमच्या माहितीसाठी :

अंतराळ पर्यटनाचे सामान्यत: निम्नस्तरीय (Sub-Orbital) आणि कक्षीय (Orbital) अंतराळ पर्यटन असे दोन मुख्य प्रकार पडतात. निम्नस्तरीय अंतराळ पर्यटनामध्ये पर्यटकाला कर्मन रेषेच्या (Kármán Line) थोडे पुढे नेले जाते. ही रेषा आपल्यापासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर अवकाशामध्ये आहे. या रेषेला पृथ्वीचे वातावरण आणि बाहेरील अवकाश यांच्यामधील सीमारेषा असेही मानले जाते. निम्नस्तरीय अंतराळ पर्यटनामध्ये पर्यटकाला काही मिनिटांसाठी बाहेरील अवकाशात जाऊ दिले जाते आणि त्यानंतर परत पृथ्वीवर आणले जाते. या कर्मन रेषेच्या खाली उडणाऱ्या कोणत्याही वस्तूला विमान असे म्हणतात, तर ही रेषा ओलांडणाऱ्या वाहनाला अंतराळयान असे म्हटले जाते.

अंतराळ पर्यटनामध्ये सामान्यत: प्रवाशाला काही दिवस ते आठवड्याहून अधिक काळ जमिनीपासून सुमारे १.३ दशलक्ष फूट उंचीवर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये राहता येते. पृथ्वीपासून सुमारे ४०० किमी उंचीवर हे अवकाश स्थानक आहे. डेनिस टिटो हे पहिले अंतराळ पर्यटक होते. २००१ मध्ये त्यांनी ‘सोयुझ’ या रशियन अंतराळयानातून हा प्रवास केला होता. ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये तब्बल सात दिवस राहिले होते. २००१ ते २००९ या दरम्यानच्या काळात रशियाने सात पर्यटकांना अवकाशात नेले होते. यातील चार्ल्स सिमोनी हे पर्यटक दोनदा अवकाशात जाऊन आले आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भात इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…