UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) ‘ब्यूबॉनिक प्लेग’

या आठवड्याच्या सुरुवातीला यूएसमधील ओरेगॉन येथे आरोग्य अधिकाऱ्यांनी २००५ नंतर राज्यात ब्यूबॉनिक प्लेगच्या पहिल्या रुग्णाची नोंद केली आहे. विविध अहवालांनुसार, या व्यक्तीला आजारी पाळीव मांजरीपासून हा आजार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

terrorist cases are investigated with caste bias
प्रत्येक दहशतवादी प्रकरणाचा तपास जातीय पूर्वग्रहातून, दोषसिद्ध आरोपींचा उच्च न्यायालयातील अपिलात आरोप
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
nadi tarangini latest news in marathi
‘नाडी तरंगिणी’द्वारे अचूक नाडी परीक्षा! पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले डिजिटल उपकरण
kalyan Police sent Vishal Gawlis mobile to forensic lab
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळीचा, मोबाईल तपासणीसाठी फाॅरेन्सिक प्रयोगशाळेकडे
bmc has decided to completely ban POP idols during Maghi Ganeshotsav
‘पीओपी’वरून पुन्हा घोळ आयत्या वेळच्या घोषणेमुळे माघी गणेशोत्सवात मूर्तिकार, मंडळांसमोर फेरनियोजनाचे आव्हान
online exam for post of Clerk and Constable of Cooperative Bank canceled due to technical glitches
चंद्रपूर : परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ; भरती प्रक्रिया…
On Saturday false message of bomb being placed in control room
बॉम्ब लावल्याचा निनावी खोटा फोन, पोलीसांची धावपळ
Terrorist vandalism of vehicles in Dhankavadi Case registered against gang
धनकवडीत दहशत माजवून वाहनांची तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्वी परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन २ मधील आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधनांशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या, या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

येर्सिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे ब्यूबॉनिक प्लेग हा रोग होतो. याचा संसर्ग प्राणी आणि माणसांमध्ये होतो. येर्सिनिया पेस्टिस सामान्यतः लहान प्राण्यांच्या शरीरावर आढळणार्‍या पिसवांनी दंश केल्यामुळे पसरतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) नुसार, माणसांना याचा संसर्ग तीन गोष्टींनी होऊ शकतो. संक्रमित वेक्टर पिसवांनी दंश केल्याने, संसर्गजन्यांच्या संपर्कात आल्याने (जसे की संक्रमित उंदराने दंश केल्यास) आणि न्यूमोनिक प्लेग असलेल्या रुग्णातील जीवाणू श्वसनामार्फत शरीरात गेल्याने हा रोग होऊ शकतो. विशेषत: ब्यूबॉनिक प्लेगमध्ये लसीका वाहिनीवाटे हे जीवाणू लसीका ग्रंथीमध्ये शिरतात. ‘युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी)’ नुसार, यामुळे ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, असह्य वेदना, लसीका ग्रंथीवर सूज यांसारखी लक्षणे आढळतात.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) इस्त्रोचे ‘नॉटी बॉय’ रॉकेट

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा हवामान उपग्रह INSAT-3DS शनिवारी (१७ फेब्रुवारी) ५.३५ वाजता श्रीहरिकोटा येथी सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला. इस्त्रोने आपल्या १६व्या मोहिमेंतर्गत हवामान उपग्रह INSAT-3DS ला जिओसिंक्रोनस लॉंच व्हेईकल F14 (GSLV-F14)द्वारे त्याच्या अभिप्रेत कक्षेत यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला.

परीक्षेसाठी महत्त्वाचा का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

ज्या रॉकेटद्वारे हवामान उपग्रह प्रक्षेपित केला गेला, त्या रॉकेटचे टोपणनाव ‘नॉटी बॉय’ असे आहे. GSLV रॉकेटला ‘नॉटी बॉय’ हे टोपणनाव देण्यात आले. कारण- या रॉकेटच्या मागील १५ प्रक्षेपणांपैकी किमान चार प्रक्षेपणे अयशस्वी ठरली. त्या तुलनेत इस्रोचे वर्कहॉर्स PSLV (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण रॉकेट) आतापर्यंतच्या ६० पैकी केवळ तीन मोहिमांमध्ये अपयशी ठरले; तर LVM-3 त्याच्या सातही मोहिमांमध्ये यशस्वी राहिले. या रेकॉर्डमुळेच GSLV रॉकेटचे नाव ‘नॉटी बॉय’ असे पडले.

GSLV रॉकेटमध्ये क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येते; ज्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू द्रव स्वरूपात असतात. जुन्या प्रक्षेपण वाहनांमध्ये वापरण्यात येणार्‍या इंजिनांपेक्षा याचे इंजिन पूर्णपणे वेगळे असते. ऑगस्ट २०२१ मध्ये जेव्हा GSLV-F10 पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-03 घेऊन जात होते, त्यावेळी प्रक्षेपणाच्या पाच मिनिटांच ते आपल्या नियोजित मार्गावरून भरकटले. परंतु, GSLV ने पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही टप्प्यांमध्ये यावेळी व्यवस्थित काम केले होते. मात्र, GSLV मधील द्रव स्वरूपातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू क्रायोजेनिक इंजिनाला हवी तितकी ऊर्जा पोहोचवू शकले नाहीत. त्यामुळे अग्नी प्रज्वलित झाली नाही. याच कारणाने रॉकेट अधिक वरती जाऊ शकले नाही आणि ते उपग्रहासह अंदमान समुद्रात पडले.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader