UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे दररोज घडणाऱ्या घटनांचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज लोकसत्ता ‘यूपीएससी सूत्र’च्या माध्यमातून आपण हिंदी भाषेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बातमी का आहे?

स्थानिक भाषांना सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी हिंदी हे महत्त्वाचे माध्यम ठरेल : अमित शहा

हिंदी भाषादिनी बोलताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भारतातील भाषावैविध्यामध्ये हिंदी हा सर्वांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्याशिवाय इतर जागतिक भाषा आणि बोलीभाषा यांचा आदरही हिंदी भाषा करते. हिंदीने आजवर कधीही कोणत्याही भारतीय भाषेशी स्पर्धा केलेली नाही; ना ती करणार. सर्व भारतीय भाषा सक्षम झाल्या, तर त्यातूनच एक सक्षम व सबळ राष्ट्र तयार होईल.

परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे का?

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या विधानानंतर हिंदी दिवसाचे महत्त्व काय? भारतात हिंदी भाषा किती बोलली जाते? १४ सप्टेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने हिंदीचा स्वीकार भारताची अधिकृत भाषा म्हणून का केला? या संदर्भात जाणून घेणे गरजेचे आहे. कारण- हा विषय यूपीएससीच्या पूर्व परीक्षेतील भारतीय राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण व चालू घडामोडी; तसेच मुख्य परीक्षेचा सामान्य अध्ययन पेपर-२ हा केंद्र आणि राज्य सरकारची कार्ये व जबाबदाऱ्या, संघराज्य पद्धतीशी संबंधित मुद्दे आणि आव्हाने, स्थानिक पातळीपर्यंत अधिकार आणि आर्थिक बाबींच्या संदर्भातील हस्तांतराबाबत असलेल्या समस्या आदी विषयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

हेही वाचा – यूपीएससी सूत्र – १८ सप्टेंबर २०२३ : सनातन धर्मावरून नेमका वाद काय? परंपरा काय? मोदी काय म्हणाले अन् बरंच काही…

या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे :

राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये एकूण २२ भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल ५२.८ कोटी भारतीयांनी, याचाच अर्थ ४३.६ टक्के लोकसंख्येने हिंदी ही त्यांची मातृभाषा म्हणून स्वीकारली आहे. हिंदी ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. त्यानंतर बंगाली मातृभाषा म्हणून स्वीकारणाऱ्यांचा क्रमांक लागतो. ९.७ कोटी भारतीयांनी बंगाली मातृभाषा म्हणून स्वीकारली आहे. ही संख्या हिंदी भाषकांच्या एक-पंचमांश आहे.

हिंदी समजणारे वा जाणणारे यांची संख्या तर देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. तब्बल १३.९ कोटी भारतीयांनी (११ टक्क्यांपेक्षा अधिक) हिंदी ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून स्वीकारली आहे. त्यामुळे हिंदी मातृभाषा किंवा दुसरी भाषा म्हणून स्वीकारणाऱ्यांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ५५ टक्क्यांहून अधिक आहे. कित्येक दशके हिंदी ही भारतातील सर्वाधिक प्रभावी मातृभाषा असून, दर जनगणनेमध्ये ही भाषा बोलणाऱ्यांच्या किंवा मातृभाषा म्हणून स्वीकारणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढच होते आहे.

१९७१ साली हिंदी मातृभाषा असणाऱ्यांचे प्रमाण केवळ ३७ टक्के होते. त्यानंतरच्या चारही जनगणनांमध्ये ते प्रमाण अनुक्रमे ३८.७ टक्के, ३९.२ टक्के, ४१ टक्के, असे वाढत अखेरीस ४३.६ टक्क्यां र्यंत पोहोचले. १९७१ ते २०११ या काळामध्ये हिंदी मातृभाषा आहे, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण २.६ पटींनी वाढले असून, ते २०.२ कोटींवरून ५२.८ कोटींवर पोहोचले आहे. ही संख्या पंजाबी, मैथिली, बंगाली, गुजराती, कन्नड या भाषांच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. अगदी मराठीच्याही तुलनेत साधारण दुप्पटच आहे.

१९४७ नंतर हिंदीवरून झालेले वाद आणि चर्चा-

तब्बल ५२.८ कोटी भारतीयांनी म्हणजेच ४३.६ टक्के लोकसंख्येने हिंदी ही त्यांची मातृभाषा म्हणून स्वीकारली आहे. हिंदी ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. त्यानंतर बंगाली भाषेचा क्रमांक लागतो. ९.७ कोटी भारतीयांनी बंगाली ही मातृभाषा म्हणून स्वीकारली आहे. ही संख्या हिंदी भाषकांच्या एक-पंचमांश आहे. तब्बल १३.९ कोटी भारतीयांनी (११ % पेक्षा अधिक) हिंदी ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून स्वीकारली आहे. त्यामुळे हिंदी स्वीकारणाऱ्यांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ५५ टक्क्यांहून अधिक आहे.

हिंदीशी संबंधित वाद नेमके काय आहे, त्याबाबत काळजी व्यक्त होण्याचे कारण काय आणि त्यामुळे तुमची ओळख वा परिचय बदलतो का? भाषांबद्दल राज्यघटना नेमके काय सांगते? तसेच या संदर्भातील इतर माहिती मिळवण्यासाठी वाचायला विसरू नका खालील लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc key current affairs what is hindi language day spb