Katchatheevu Island Issue : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) भूकंपप्रवण क्षेत्र असलेले ‘रिंग ऑफ फायर’

बुधवारी (३ एप्रिल) सकाळी तैवानच्या पूर्व किनार्‍याला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
Chandivali asalfa five constructions demolished
चांदिवली – असल्फादरम्यानच्या मिसिंग लिंक प्रकल्पातील अडथळा दूर, महापालिकेने पाच बांधकामे हटवली
Massive fire breaks out in building in sion
शीवमधील इमारतीला भीषण आग
Massive fire breaks out in 13 floor building in Andheri Mumbai
अंधेरीत १३ मजली इमारतीला भीषण आग; आगीचे गांभीर्य वाढले
fire erupted late Sunday night in second floor room of six storey in balkoom area Thane
बाळकूम भागात एका इमारतीत आग, ४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

तैवानला नेहमीच भूंकपाचा धोका असतो. कारण हे बेट प्रशांत महासागरातील रिंग ऑफ फायरच्या शेजारी आहे. महत्त्वाचे म्हणजे रिंग ऑफ फायरच्या क्षेत्रातच जगभरातील जवळपास ९० टक्के भूकंप होतात. १९८० पासून तैवान आणि आजूबाजूच्या भागात ४.० रिश्टर स्केल किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेच्या २००० पेक्षा जास्त भूकंपाच्या घटनांची नोंद झाली आहे, तर ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या १०० भूकंपाच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

रिंग ऑफ फायर ही प्रशांत महासागराच्या सभोवताली असलेली ज्वालामुखी आणि भूकंपाच्या ठिकाणांची एक शृंखला आहे. हे क्षेत्र अर्धवर्तुळाकार किंवा घोड्याच्या नालीच्या आकारासारखे असून ४० हजार २५० किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रालाच सर्कम-पॅसिफिक बेल्ट असेही म्हणतात. महत्त्वाचे म्हणजे या भागात ४०० पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत. रिंग ऑफ फायरचा भाग दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारा तसेच जपान आणि न्यूझीलंडपर्यंत पसरला आहे. रिंग ऑफ फायरमध्ये बोलिव्हिया, चिली, इक्वेडोर, पेरू, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा, रशिया, जपान, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका या ठिकाणांचा समावेश होतो.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) कचाथीवू बेटाचा वादग्रस्त प्रवास

तमिळनाडू किनाऱ्यापासून समीप असलेले कचाथीवू हे निर्मनुष्य बेट १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला ‘देऊन टाकले’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांनी सुरू केला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील आंतरराष्ट्रीय संबंध घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

पाल्कच्या सामुद्रधुनीत कचाथीवू हे २८२ एकरचे निर्मनुष्य बेट आहे. बेटाची लांबी १.६ किलोमीटर असून कमाल रुंदी ३०० मीटर आहे. रामेश्वरमच्या ईशान्येकडे, भारतीय किनाऱ्यापासून ३३ किलोमीटरवर, तर जाफनाच्या नैर्ऋत्येकडे श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून ६२ किलोमीटरवर हे बेट आहे. या बेटापासून सर्वांत नजीकचा भूभाग डेल्फ्ट आयलँड असून त्या बेटावर श्रीलंकेचे स्वामित्व आहे. या बेटावर सेंट अँथनीज हे कॅथलिक चर्च आहे. तेथे वार्षिक यात्रेसाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांतून धर्मगुरू आणि यात्रेकरू येतात. बेटावर पाण्याचा उद्भव नसल्यामुळे कचाथीवू वस्तीयोग्य नाही.

भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी माहितीच्या अधिकारातून या कराराविषयी आणि वादाविषयी अधिक तपशील मिळवला, जो लगेचच माध्यमांत प्रसृत झाला. या तपशिलात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा दाखला देण्यात आला आहे. श्रीलंकेच्या नौदलाने कचाथीवूवर स्वामित्व सांगितले, त्यावेळी पंडित नेहरूंनी ‘या बेटावरील हक्क सोडण्यास आम्ही तयार आहोत, कारण याविषयीच्या चर्चेत वेळ घालवण्यात आम्हाला स्वारस्य नाही’ असे म्हटल्याचे या कागदपत्रांत म्हटले आहे. त्यावेळी मंत्रिमंडळ आणि प्रशासनामध्येच ‘हक्क सांगावा की सोडावा’, या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू होते.

पुढे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या वादाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या दृष्टीने पावले उचलली. २८ जून १९७४ रोजी इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमावो बंडारनायके यांच्यात करार झाला, त्याचा मसुदा असा : ‘भारत-श्रीलंका यांच्यादरम्यान ऐतिहासिक संदर्भ आणि विद्यमान आंतरराष्ट्रीय कायदे विचारात घेऊन सागरी सीमा आखण्यात येत आहे. ही सीमा कचाथीवूच्या पश्चिम किनाऱ्यापासून एक मैलावर असेल.’

या रचनेत श्रीलंकेची सागरी सीमा या बेटाला ‘सामावून’ भारताकडे सरकली. यातूनच हे बेट इंदिरा गांधींच्या सरकारने श्रीलंकेला देऊन टाकले, असा समज रूढ झाला. १९७६ मधील सुधारित करारानुसार, दोन्ही देशांच्या सागरी सीमांमध्ये तसेच विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये मच्छीमारी करण्यास दोन्ही देशांची संमती अनिवार्य करण्यात आली. पण कचाथीवू हे बेट दोन्ही देशांच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या सीमांवर असल्यामुळे या मुद्द्यावर संदिग्धता कायम राहिली.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…

Story img Loader