UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दररोज घडणाऱ्या घटनांचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्यासंदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

विरोधकांना सनातन धर्म संपवायचा आहे, त्यांना थांबवणे गरजेचे- पंतप्रधान मोदी

बातमीत का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेल्या एका भाषणात सतानन धर्म विरोधकांना संपवायचा आहे, असे म्हणत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आणि त्याचवेळेस हा देशावरच असलेला हल्ला असून त्या संदर्भात जागरूक राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे १) सनातन धर्म म्हणजे काय? २) सनातन धर्म या शब्दामागचे व्युत्पत्तिशास्त्र आणि ३) सनातन धर्म सध्या चर्चेत का आहे? हे सर्व समजून घेणं गरजेचं आहे. लोकसत्ता ‘यूपीएससी सूत्र’च्या माध्यमातून आपण हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील भारताचा आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन-१ या पेपरमधील भारतीय संस्कृती या विषयातील कला, साहित्य आणि स्थापत्य यांची गुणवैशिष्ट्ये आणि प्राचीन इतिहास या घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी –

सनातन धर्म हा संस्कृत शब्द असून, त्याचा शब्दशः अर्थ ‘शाश्वत धर्म’ किंवा ‘शाश्वत कायदा’ असा आहे. सनातन धर्माला ‘अचल’, ‘धर्मोपदेश’ किंवा ‘प्राचीन’ व ‘निरंतर मार्गदर्शन’, असेही म्हटले जाते. पौराणिक अभ्यासक व लेखक देवदत्त पटनायक यांनी ट्विटरवर (आता एक्स) एक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यात सनातन धर्म म्हणजे काय; याबद्दलची माहिती दिली. पटनायक यांनी सांगितले की, सनातन म्हणजे शाश्वत; ज्याचा अंत होत नाही. सनातन हा शब्द वेदांतमध्ये आढळत नाही.

भगवदगीतेमध्ये सनातन शब्द वापरण्यात आला असून, तो आत्म्याशी निगडित असल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रकाशित एका लेखात म्हटले आहे. तर देवदत्त पटनायक यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले, “ज्या धर्मात आत्मा आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जातो, त्याला सनातन धर्म म्हणतात. आत्म्याचा, पुनर्जन्माचा अंत होत नाही. सनातन याचा अर्थच ज्याचा अंत नाही”

केंब्रिज विद्यापीठातील हिंदू धर्म आणि धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करणारे निवृत्त प्राध्यापक जुलियस जे. लिपनर यांनी “हिंदूज : देअर रिलिजियस बिलिफ अँड प्रॅक्टिसेस” (Hindus : Their Religious Beliefs and Practices – 1994) हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सनातन धर्माचा उल्लेख अर्जुनाने महाभारतात केलेला आहे. कृष्णाशी संवाद साधताना अर्जुन म्हणतो, “जेव्हा वंश विकृत होतो, तेव्हा त्या वंशाचा सनातन धर्म नष्ट होतो”. लिपनर यांनी पुढे म्हटले की, सनातन धर्माचा उल्लेख द्रौपदीनेही एके ठिकाणी केल्याचे आढळते. “जेव्हा कुणीही तिच्या मदतीला येत नाही, तेव्हा ती सनातन धर्माचा उल्लेख करते.”

देवदत्त पटनायक सांगतात, की सनातन धर्माची संज्ञा हिंदू धर्माशी संबंधित असली तरी जैन व बौद्धांनाही ती लागू पडते. मात्र, जे धर्म एकाच जन्मावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी ही संज्ञा वापरली जात नाही. जसे की, पूर्वेत उगम पावलेल्या यहुदी, ख्रिश्चन व इस्लाम या धर्मांमध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जात नाही.

अगदी अलीकडे म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला इतर धर्मांपेक्षा वेगळा धर्म असल्याचे सांगण्यासाठी सनातन धर्माचा वापर केला जातो. हिंदू धर्मातील विशिष्ट एकजिनसीपणा असल्याचे सांगण्यासाठी ही संज्ञा वापरली जात असली तरी एकजिनसीपणा म्हणजे नेमके काय, हे कुणीही स्पष्ट केलेले नाही.

लिपनर सांगतात: “अनेक हिंदू धर्मीय स्वतःला सनातनवादी असल्याचे म्हणवतात. म्हणजेच ते शाश्वत धर्माचे पालन करतात; पण शाश्वत धर्म काय आहे, हे स्पष्ट होत नाही. लिपनर यांनी लिहिले आहे की, काही वैश्विक मान्यताप्राप्त तत्त्वज्ञानाच्या आधारे मला अद्याप हिंदू सनातन धर्म शोधायचा आहे.”

याबरोबरच सनातन धर्माला ऐतिहासिक महत्त्व केव्हा प्राप्त झाले?, सनातन धर्माचे तत्त्वज्ञान नेमके काय आहे? सनातन धर्माचा समावेश भारतीय तत्त्वज्ञानाच्या शाखांमध्ये होतो का? वैशैषिक, न्याय, सांख्य,योग, मीमांसा आणि वेदांन्त याबद्दल तुम्ही ऐकून आहात का? आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेबद्दल तुम्हाला कोणती माहिती आहे? या मुद्द्यांचा अभ्यास करणंही गरजेचं आहे.

या विषयाशी संबंधित इतर माहितीसाठी तुम्ही खालील लेख वाचू शकता.

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

Story img Loader