World Health Organization : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) पश्चिम बंगालमधील ‘रेमल’ चक्रीवादळ

‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास पश्चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशच्या खेपुपारा किनार्‍यावर धडकले. त्यामुळे पश्चिम बंगालमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळालं.

pune bjp fight
पुणे: प्रचार फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संगमवाडीतील घटना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
How is census of population conducted
जनगणना कशी होते? प्रगणकांना कोणते अनुभव येतात?
ngo voting awareness
मुंबई: बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध खाजगी संस्थांचा पुढाकार
Zopu scheme, MHADA developer, MHADA,
‘झोपु’ योजनेत म्हाडा विकासक, पहिल्यांदाच जबाबदारी; चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील भारतीय आणि जागतिक भूगोल – भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक, आर्थिक तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखीय क्रियाकलाप, चक्रीवादळ इत्यादीसारख्या महत्त्वाच्या भूभौतिकीय घटना; भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान- गंभीर भौगोलिक वैशिष्ट्यांमधील बदल (जलसंस्था आणि बर्फाच्या टोप्यांसह), वनस्पती आणि प्राणी आणि अशा बदलांचे परिणाम या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

१) ‘रेमल’ चक्रीवादळ नेमकं काय?
२) चक्रीवादळ म्हणजे काय?
३) चक्रीवादळाचे प्रकार कोणते?
४) बंगालच्या उपसागरातील इतर चक्रीवादळे कोणती?

चक्रीवादळाशी संबंधित संस्था : भारतीय हवामान विभाग (IMD), जागतिक हवामान संघटना (WMO), उष्णकटिबंधीय चक्रीवादळांवरील पॅनेल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

तुमच्या माहितीसाठी :

रेमल’ चक्रीवादळ हे एक उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ असून या चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ११०-१२० किमी प्रतितास आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) चक्रीवादळांचे विस्तृतपणे दोन श्रेणींमध्ये वर्गीकरण करते. पहिले आहे समशीतोष्ण चक्रीवादळ आणि दुसरे आहे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ.

चक्रीवादळ हवेची एक मोठी प्रणाली असून ते कमी दाबाचे केंद्र असते. ही वादळे अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात.

‘एनडीएमए’नुसार, उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट्या दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या सरळ दिशेने वाहणार्‍या वार्‍यांमुळे हवेमध्ये भोवरा तयार होतो. चक्रीवादळांचा आकार गोल किंवा लंबवर्तुळाकार असतो.

समशीतोष्ण चक्रीवादळास मध्य-अक्षांश किंवा बॅरोक्लिनिक चक्रीवादळ म्हणूनही ओळखले जाते. अतिउष्ण कटिबंधीय चक्रीवादळे उष्ण कटिबंधाच्या बाहेर उदभवतात.

यूएस नॅशनल ओशनिक अॅण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (एनओएए)नुसार, या वादळांच्या आतल्या बाजूला थंड हवा असते. उत्तर गोलार्धात उत्तरेकडून थंड हवा वाहते आणि दक्षिणेकडून उबदार हवा वाहते.

हवेचा दाब कमी झाल्यावर उत्तरेकडील वारे दक्षिणेकडे सरकतात आणि दक्षिणेकडील वारे उत्तरेकडे सरकतात. त्यामुळे समशीतोष्ण चक्रीवादळ तयार होते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) जागतिक आरोग्य संघटनेची साथरोग ठराव बैठक

करोनासारखी साथ पुन्हा आली तर सर्व देशांनी एकत्र येत कशाप्रकारे लढायला हवे, याचीही एक चांगली आणि सुधारित नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे असायला हवीत, या गरजेतून सध्या जागतिक आरोग्य संघटना बहुतांश देशांसमवेत एक ठराव करणार आहे. त्यासाठीची बैठक आजपासून (२७ मे) सुरू झाली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधनांशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या. तसेच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी आणि मंच, त्यांची रचना, आदेश या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

१) साथरोग म्हणजे काय?
२) साथरोग जाहीर करण्याचे निकष काय?
३) ‘साथरोग ठरावाची बैठक’ नेमकी काय?
४) यापूर्वी अशी बैठक आयोजित करण्यात आली होती का?
५) ‘आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली (२००५)’ काय आहे?

यासंदर्भातील महत्त्वाच्या संघटना : जागतिक आरोग्य संघटना

तुमच्या माहितीसाठी :

करोनासारखी साथ पुन्हा आली तर सर्व देशांनी एकत्र येत कशाप्रकारे लढायला हवे, याचीही एक चांगली आणि सुधारित नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे असायला हवीत, या गरजेतून सध्या जागतिक आरोग्य संघटना बहुतांश देशांसमवेत एक ठराव करणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आयोजित केलेल्या या बैठकीला १९४ सदस्य देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. जिनिव्हामध्ये ही बैठक होत असून यामध्ये नव्या नियमावलीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. या नव्या नियमावलींसंदर्भातील वाटाघाटी जवळपास दोनहून अधिक वर्षांपासून सुरू होत्या.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींबाबतचे ठराव सहमतीने संमत केले जातील. एक म्हणजे करोना साथीच्या पार्श्वभूमीवर महासाथीशी दोन हात करण्यासंदर्भातले नियम अद्ययावत करणे आणि दुसरे म्हणजे भविष्यात अशी एखादी महासाथ पुन्हा उद्भवली तर तिच्याशी लढा देण्यासाठी आपपासात सहकार्य करता यावे, यासाठी नवा कायदेशीर ठराव करणे;

या ठरावाच्या बैठकीला जवळपास १०० प्रतिनिधी हजर राहणार आहेत. १९४८ साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाल्यापासून हा एक महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून जगातील देशांना एकमेकांशी बांधून ठेवणारी संघटना म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील घटनांबाबत आरोग्य संघटनेने तयार केलेले काही नियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत. या नियमांना ‘आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली (२००५)’ म्हणून ओळखले जाते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यासंदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…