UPSC Key : What is Goat Plague : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) ‘गोट प्लेग’ संसर्ग काय आहे?

ग्रीसमध्ये ‘गोट प्लेग’ (goat plague) नावाचा संसर्ग पसरला आहे. त्यामुळे देशातील शेळ्या-मेंढ्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. ‘गोट प्लेग’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, देशातील शेळ्या आणि मेंढ्यांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण
municipality removed 125 construction that were obstructing Titwala-Shilphata bypass road
Titwala-Shilphata bypass road : टिटवाळा-शिळफाटा बाह्यवळण रस्ते मार्गातील अडथळे दूर
Hemophilia Patient Treatment Maharashtra,
देशभरातून हिमोफिलिया रुग्णांची उपचारासाठी महाराष्ट्रात धाव! हिमोफिलिया रुग्णांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालय आधारवड

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधता या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे?

गोट प्लेग म्हणजे काय?
गोट प्लेग या संसर्गाची सुरुवात कधी झाली?

तुमच्या माहितीसाठी :

१९४२ साली पश्चिम आफ्रिकेतील कोट डी’आयवरमध्ये ‘गोट प्लेग’चा पेस्टे डेस पेटिट्स रुमिनंट्स हा विषाणू सापडल्याची नोंद सर्वांत आधी झाली आहे. तेव्हापासून हा रोग जागतिक स्तरावर आफ्रिका, मध्य पूर्व, आशिया आणि युरोपमधील मोठ्या प्रदेशांमध्ये पसरला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मते, सध्या ७० पेक्षा जास्त देश या विषाणूमुळे प्रभावित आहेत किंवा त्यांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. सर्वाधिक जोखीम असणाऱ्या देशांमध्ये सुमारे १.७ अब्ज मेंढ्या आणि शेळ्या आहेत. विशेष म्हणजे ही संख्या मेंढ्या आणि शेळ्यांच्या जगातील एकूण संख्येच्या सुमारे ८० टक्के इतकी आहे.

वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थच्या (डब्ल्यूओएएच) मते, हा विषाणू शेळ्या-मेंढ्यांच्या एकमेकांच्या जवळच्या संपर्कातून प्रसारित होतो. त्यामुळे शेळ्या आणि मेंढ्यांना एकत्र बंदिवासात ठेवल्यामुळे या संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता अधिक वाढते. आजारी जनावरांच्या शरीरातून बाहेर पडणारे स्राव आणि त्यांच्यातील उत्सर्जनामुळे इतर प्राण्यांमध्येही हा संसर्ग पसरतो.

या विषाणूला औपचारिकपणे पेस्टे डेस पेटिट्स रुमिनंट्स (Peste des Petits Ruminants -PPR) म्हणून ओळखले जाते. या विषाणूचा मानवावर काही परिणाम होत नाही; मात्र तो शेळ्या-मेंढ्यांसाठी जीवघेणा ठरतो.

संक्रमित झालेल्या शेळ्यांपैकी ८० ते १०० टक्के शेळ्या या विषाणूच्या संसर्गामुळे मरण पावतात, असे आकडेवारी सांगते. या जुलै महिन्याच्या सुरुवातीला ग्रीसमध्ये हा उद्रेक आढळून आला आणि मध्य ग्रीसमध्ये हजारो प्राणी या ‘गोट प्लेग’च्या प्रादुर्भावाने मरण पावले आहेत. त्यामुळे हा आजार आणखी पसरण्याची भीती ग्रीसला वाटत आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

जवळपास आठ हजार शेळ्या-मेंढ्यांची करावी लागली कत्तल; काय आहे ‘गोट प्लेग’?

२) अवकाश मोहिमेसाठी अंतराळवीराची निवड

भारतीय वायू दलातील अधिकारी ग्रुप कॅप्टन सुधांशू शुक्ला यांची ‘प्राईम अस्ट्रॉनॉट’ (प्रमुख अंतराळवीर) म्हणून अवकाश मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भारतीय व्यक्ती पुन्हा एकदा अंतराळात झेपावणार आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अलीकडील मोहिमांसह अंतराळ तंत्रज्ञान, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

Axiom-4 मिशन काय आहे?
गगनयान मोहिम काय आहे?

तुमच्या माहितीसाठी :

भारताची अवकाश संस्था इस्रो (ISRO) ‘गगनयान मोहिमे’द्वारे स्बबळावर अवकाशात भारतीय अंतराळवीर पाठवण्याची तयारी करत आहे. शुभांशू शुक्ला हे याच भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या हवाई दलातील चार अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

‘गगनयान’ असे या मोहिमेचे नाव असून ही मोहीम पुढील वर्षी नियोजित आहे. याआधीच या चार जणांचे अवकाश प्रवासासाठी आवश्यक लागणारे प्रशिक्षण सुरूही झाले आहे.

Axiom-4 हे मिशन ‘नासा’च्या सहकार्याने पार पडणार आहे. खाजगी अंतराळ कंपनी म्हणून ओळख असलेल्या Axiom Space चे हे चौथे मिशन असून यावर्षी ऑक्टोबरनंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे हे अवकाशयान झेपावणार आहे.

या मोहिमेत एकूण चार जण अवकाश प्रवास करून अवकाश स्थानकात जाणार आहेत. ही मोहीम एकूण १४ दिवसांची असणार आहे. या मोहिमेमध्ये भारतीय अंतराळवीरांसह अमेरिका, पोलंड आणि हंगेरी या देशांचे अंतराळवीर असतील.

प्रसिद्ध Space X कंपनीचे रॉकेट आणि त्याच कंपनीची Crew Dragon हे अवकाश यान याद्वारे हा सर्व प्रवास होणार आहे. भारतीय अंतराळवीर निवड मंडळाने भारतीय वायुसेनेच्या (IAF) टेस्ट पायलट्सच्या गटातून चार अंतराळवीरांची निवड केली आहे. त्यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, विंग कमांडर शुभांशू शुक्ला अशी त्यांची नावे आहेत.

स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण करेल. यासाठी फाल्कन ९ रॉकेट वापरण्यात येणार आहे. शुक्ला यांच्याबरोबरच क्रूमध्ये पोलंड, अमेरिका आणि हंगेरीचे अंतराळवीरही असतील.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

तब्बल ४० वर्षांनी पुन्हा गगनभरारी घेणार भारतीय व्यक्ती; कोण आहेत शुभांशू शुक्ला?

गगनयान मोहीम काय आहे? स्वबळावर भारताचा पहिला अंतराळवीर अवकाशात कधी जाणार?

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा..

Story img Loader