UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

खालीलपैकी महाराष्ट्रातील ग्रामीण वस्तीविषयी दिलेल्या अयोग्य विधानाची निवड करा.

open ai new ai model
माणसाप्रमाणे विचार करणारं AIचं नवं मॉडेल; नोकऱ्यांवर गदा आणणार का?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
donald trump on pet animals of america (1)
खरंच अमेरिकेतील स्थलांतरित पाळीव मांजरी खातात? ट्रम्प यांनी वादविवाद सत्रात प्राण्यांचा मुद्दा का उपस्थित केला? नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis first reaction on nagpur audi car hit and run case
नागपूर हिट अँन्ड रन प्रकरणावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ” पोलिसांकडे…”
Readers reactions, Doctor, Readers,
पडसाद…
Narendra modi vadhvan port visit marathi news
शहरबात : पंतप्रधानांचा लाभदायी दौरा
rss chief mohan bhagwat (1)
RSS व भाजपात समन्वयाच्या अडचणी, संघानं केलं मान्य; प्रसिद्धीप्रमुख म्हणाले, “हे फक्त व्यवस्थापनात्मक…”
Like onion chal now ten lakh subsidy for currant shed
पिंपरी : कांदा चाळीप्रमाणे आता बेदाणे शेडसाठी दहा लाखांचे अनुदान

१) एक किंवा एकापेक्षा जास्त कुटुंबे जेव्हा परस्परांपासून थोड्या दूर अंतरावर राहतात; यामुळे निर्माण होणाऱ्या वसाहतीला ‘विखुरलेल्या वसाहती’ म्हणतात.

२) कोकणात संमिश्र वस्त्यांचे प्राबल्य आहे.

३) राजकिय, अर्थिक सामाजिक कारणांमुळे महाराष्ट्रात विखुरलेल्या वस्ती निर्माण झाल्या आहेत.

४) वरीलपैकी एकही नाही.

प्रश्न क्र. २

महाराष्ट्रातील घर बांधणी पद्धतीविषयी योग्य पर्याय निवडा.

१) पठारावरील घरांना ‘माळवदी’ किंवा ‘धाब्याची घरे’ असे म्हणतात.

२) पूर्व विदर्भात घराचे छप्पर उतरते व कौलारू किंवा नारळ-पोफळीच्या पानांनी शाकारलेले असते.

३) वलाटी भागातील खेडी ओळीसारखी दिसतात तर खलाटी भागातील खेड्यांच्या रचनेत विविधता आढळते.

४) वरील सर्व विधाने योग्य.

प्रश्न क्र. ३

खाली पैकी योग्य विधान/ने ओळखा?

अ) कनिष्ठ न्यायपालिकेतील न्यायाधीशांच्या भरती प्रक्रियेचे मानकीकरण करणे हा अखिल भारतीय न्यायिक सेवेचा उद्देश आहे.

ब) कनिष्ठ न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांसाठी एक प्रमाणित भरती प्रक्रिया स्थापित करून, राज्यांमध्ये एकवाक्यता सुनिश्चित करणे हा अखिल भारतीय न्यायिक सेवेचा उद्देश आहे.

क) अखिल भारतीय न्यायिक सेवेची अंमलबजावणी भारतातील सर्व राज्यांनी मान्य केली आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) अ आणि ब
३) अ आणि क
४) ब आणि क

प्रश्न क्र. ४

योग्य जोडी ओळखा?

अ) बार्डोली सत्याग्रह – सरकार वल्लभाई पटेल
ब) असहकार चळवळ – गो. कृ. गोखले
क) रामकृष्ण मिशन – विद्यानंद सरस्वती
ड) चंपारण्य सत्याग्रह – लोकमान्य टिळक

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ आणि क

४) फक्त क

प्रश्न क्र. ५

पाणीपतच्या लढाईसंदर्भातील योग्य विधान/ने ओळखा?

अ) पानिपतची तिसरी लढाई १७६२ मध्ये मराठा आणि अहमद शाह दुर्रानी यांच्या यांच्यात झाली.

ब) या लढाईत मराठा सैन्याचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी केले.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ आणि ब योग्य

प्रश्न क्र. ६

योग्य जोड्या लावा.

शिखरे जिल्हा

अ) तोरणा १) धुळे
आ) हनुमान २) अमरावती<br>इ) तोल ३) नाशिक
ई) वैराट ४) पुणे

पर्यायी उत्तरे :

१) अ-१, आ-२, इ-३, ई-४

२) अ-२, आ-१, इ-४, ई-३

३) अ-४, आ-१, इ-३, ई-२

४) अ-४, आ-३, इ-२, ई-१

प्रश्न क्र. ७

महाराष्ट्रामधील खालील डोंगररांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा.

पर्यायी उत्तरे :

१) सातमाळा रांगा, दंडोबा रांग, गाळण्याचे डोंगर, चिकोडी रांग

२) गाळण्याचे डोंगर, सातमाळा रांगा, दंडोबा रांग, चिकोडी रांग

३) चिकोडी रांग, दंडोबा रांग, सातमाळा रांगा, गाळण्याचे डोंगर

४) दंडोबा रांग, गाळण्याचे डोंगर, चिकोडी रांग, सातमाळा रांग

प्रश्न क्र. ८

खालील पैकी योग्य विधान/ने ओळखा?

अ) ई-एससीआर ( E-SCR) पोर्टल हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेला एक डिजिटल उपक्रम आहे.

ब) ही सेवा वकील, कायदा अभ्यासक आणि सर्वसामान्य जनतेला विनामूल्य वापरता येते.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणता आयोग हा भारतातील केंद्र-राज्य संबंधांशी संबंधित आहे.

पर्यायी उत्तरे :

१) राजमन्नार आयोग
२) नचिकेत मोर आयोग
३) स्वामीनाथन आयोग

प्रश्न क्र. १०

खालीलपैकी योग्य नसलेले विधान/ने निवडा.

१) महाराष्ट्रात ९४ तालुके अवर्षणग्रस्त आहेत.

२) निश्चित पावसाच्या प्रदेशात विदर्भात बुलढाणा वगळता जवळजवळ संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील परभणी व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो.

३) अवर्षणग्रस्त क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, अहमदनगर पूर्णतः समविष्ट आहेत.

४) महाराष्ट्रात जलसिंचन प्रकारात विहिरींच्या खालोखाल तलावा द्वारे सुमारे २३ टक्के क्षेत्र सिंचनखाली आहे.

प्रश्न क्र. ११

योग्य जोड्या जुळवा.

अ) खडकवासला – १) हिंगोली
ब) इटियाडोह – २) गोंदिया
क) राधानगरी – ३) पुणे विभाग
ड) येलदरी ४) कोल्हापूर</p>

पर्यायी उत्तरे :

१) I II III IV
२) II I III IV
३) III II IV I
४) III IV I II

वरील प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न क्र. १ – २
प्रश्न क्र. २- १
प्रश्न क्र. ३ -२
प्रश्न क्र. ४-१
प्रश्न क्र. ५-२
प्रश्न क्र. ६-३
प्रश्न क्र. ७-२
प्रश्न क्र. ८-३
प्रश्न क्र. ९-१
प्रश्न क्र. १०-४
प्रश्न क्र. ११-३