UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

पुढील विधाने विचारात घ्या आणि त्यापैकी योग्य असलेले विधान निवडा.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

१) राज्यघटनेचा भाग ११ केंद्र आणि राज्यांमधील प्रशासकीय संबंधांशी संबंधित आहेत.

२) राज्यघटनेतील कलम २५६ ते २६३ केंद्र आणि राज्यांमधील प्रशासकीय संबंधांशी संबंधित आहेत.

३) १९६६ मध्ये भारतीय वन सेवा (IFS) तिसरी अखिल भारतीय सेवा म्हणून तयार करण्यात आली.

४) राज्यसभेच्या ठरावाच्या आधारे नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासाठी राज्यघटनेचे कलम ३१२ संसदेला अधिकृत करते.

पर्यायी उत्तरे :

१) १, २ आणि ३

२) २, ३ आणि ४

३) १, ३ आणि ४

४) १, २, ३ आणि ४

प्रश्न क्र. २

खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

१) २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चार टप्प्यातील अंतराळ वर्कहॉर्स PSLV (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण) द्वारे चंद्रयान १ चे प्रक्षेपण केले गेले.

२) चंद्रयान-१ ही मोहीम पूर्णपणे यशस्वी ठरली.

३) चंद्रयान ३ मोहिमेचे प्रक्षेपण LVM3 M4 लॉन्च वेहिकल द्वारे १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटा येथून करण्यात आले.

४) वरीलपैकी सर्व योग्य.

प्रश्न क्र. ३

पुढील विधानाचा विचार करा आणि योग्य विधानाचे चयन करा.

१) भारताची संघराज्य प्रणाली कॅनेडियन प्रणालीवर आधारित आहे.

२) अमेरिकन प्रकारची फेडरल युनियन प्रशासनासाठी, १३ सार्वभौम आणि स्वतंत्र राज्यांमधील कराराद्वारे तयार केली गेली आहे.

३) भारत सरकार कायदा, १९३५ लागू असेपर्यंत भारतामध्ये पूर्णपणे केंद्रीकृत एकात्मक राज्यघटना होती.

४) वरीलपैकी सर्व योग्य आहेत.

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी असत्य असलेले विधान निवडा.

१) भारतीय संसदेला अनुच्छेद ४(२) नुसार, सामान्य बहुमताने राज्यांची पुनर्रचना करणे किंवा त्यांच्या सीमा बदलणे शक्य आहे.

२) राज्यांची पुनर्रचना करणे किंवा त्यांच्या सीमा बदल करण्यासाठी राज्य सरकारची संमती आवश्यक नसते.

३) कलम २४६ नुसार अवशिष्ट अधिकार हे भारतीय राज्यघटनेने राज्यांना दिलेले आहेत.

४) कलम ३७१ F, सिक्कीमच्या संदर्भात विशेष परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी तरतुद करते.

प्रश्न क्र. ५

पुढे दिलेल्या विधानांचा लक्षपूर्वक वाचन करून अयोग्य असलेले विधान निवडा.

१) रामेश्वरम जवळील थुंबा हे ध्वनी रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुविधा म्हणून निवडले गेले.

२) साराभाईंच्या सन्मानार्थ थुंबा कॉम्प्लेक्सचे विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे नामकरण करण्यात आले.

३) इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ची भारतीय अंतराळ मोहिमा राबवण्यासाठी व रॉकेट बनवण्यासाठी १५ ऑगस्ट १९६९ रोजी स्थापना करण्यात आली.

४) इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन चे मुख्यालय बेंगलोरमध्ये आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३५

प्रश्न क्र. ६

पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही?

१) आर्थिक आणीबाणी दरम्यान राज्यांना त्यांचे धन विधेयके आणि आर्थिक विधेयके राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी राहून ठेवणे अनिवार्य आहे.

२) समवर्ती सूचीतील विषयांशी निगडित अंतिम निर्णय राज्याचे असतात.

३) कलम ३६५ नुसार राष्ट्रपतीला राज्यामध्ये आणीबाणी लावण्याचा अधिकार आहे.

४) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत.

प्रश्न क्र. ७

खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ते ओळखा :

१) जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) हे प्रक्षेपणासाठी तीन-टप्प्याचे (३ stage) वाहन आहे.

२) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) ही लॉन्च व्हेईकल गॅस आणि द्रव इंधन दोन्ही वापरते.

३) प्रो. धवन यांच्या स्मरणार्थ श्रीहरिकोटाचे सतीश धवन स्पेस सेंटर असे नामकरण करण्यात आले आहे.

४) सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा हे ओडिशा किनारपट्टीवर आहे.

प्रश्न क्र. ८

खाली दिलेल्या विधानांचा विचार करा आणि त्याची सत्यता तपासा.

१) ट्रान्सपॉन्डर्स ही अशी उपकरणे आहेत जी जमिनीवरून रेडिओ सिग्नल प्राप्त करतात आणि ते प्रसारित करतात.

२) २००४ मध्ये ISRO द्वारे EDUSAT लाँच केले गेले.

३) ओशनसॅट हा भारताचा पहिला उपग्रह होता, ज्याचा उद्देश मत्स्यसंपत्ती, समुद्र पातळीतील बदल, गाळ संचयनाचा वेग, समुद्र प्रदूषण, समुद्राच्या पाण्याचे तापमान, समुद्राच्या पृष्ठभागावरील हवेतील आर्द्रता आणि प्रवाळ खडकांचा अभ्यास करणे हा आहे.

४) वरीलपैकी सर्व सत्य आहेत.

प्रश्न क्र. ९

राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन उपक्रमासंदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) विकसित पायाभूत व सामाजिक सुविधा पुरवून भारतीयांच्या जीवनाची गुणवत्ता आणि राहणीमानातील सुलभता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

ब) या योजनेअंतर्गत अशी लक्ष्ये निश्चित करण्यात आलेली आहेत, जेणेकरून ही ध्येय SDG प्राप्त करण्याकरिता देखील पूरक ठरतील.

वरीलपैकी योग्य विधान ओळखा?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) दोन्ही योग्य

४) दोन्ही अयोग्य

प्रश्न क्र. १०

खालील जोड्या विचारात घ्या :

सर्जनशील शहरे श्रेणी

१) कोझिकोड हस्तकला आणि लोककला

२) वाराणसी संगीत

३) श्रीनगर साहित्य

युनेस्कोच्या ( UNESCO) क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) नुसार वर दिलेल्या जोड्यांपैकी किती जोड्या योग्य आहेत?

अ) फक्त एक

ब) फक्त दोन

क) तिन्ही

ड) एकही नाही

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३४

वरील प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न क्र. १-४
प्रश्न क्र. २-२
प्रश्न क्र. ३-४
प्रश्न क्र. ४-३
प्रश्न क्र. ५-१
प्रश्न क्र. ६-२
प्रश्न क्र. ७-४
प्रश्न क्र. ८-४
प्रश्न क्र. ९-३
प्रश्न क्र. १०- १

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.