UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

भारत आणि तैवान या दोन देशांतील संबंधांसंदर्भात खालील विधानांचा विचार करा :

nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
bhandara large scale scam in mpsc exams emerged with links reaching Bhandara district
एमपीएससी घोटाळ्याचे धागेदोरे भंडाऱ्यापर्यंत; संशयित चौकशीसाठी ताब्यात
tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
MPSC Mantra Group B Services Prelims Exam General Science career news
एमपीएससी मंत्र: गट ब सेवा पूर्व परीक्षा: सामान्य विज्ञान

अ) भारत आणि तैवान यांच्यात औपचारिक राजनैतिक संबंध आहेत.

ब) दोन्ही देशांच्या राजधानीत एकमेकांची प्रतिनिधी कार्यालये नाहीत.

वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ आणि ब दोन्ही योग्य

४) अ आणि ब दोन्ही अयोग्य

प्रश्न क्र. २

खालील विधानाचा विचार करा आणि योग्य विधान निवडा :

१) भारताची संघराज्य प्रणाली कॅनेडियन प्रणालीवर आधारित आहे.

२) अमेरिकन प्रकारची फेडरल युनियन प्रशासनासाठी, १३ सार्वभौम आणि स्वतंत्र राज्यांमधील कराराद्वारे तयार केली गेली आहे.

३) भारत सरकार कायदा, १९३५ लागू असेपर्यंत भारतामध्ये पूर्णपणे केंद्रीकृत एकात्मक राज्यघटना होती.

४) वरीलपैकी सर्व योग्य आहेत.

प्रश्न क्र. ३

खालीलपैकी असत्य असलेले विधान निवडा.

१) भारतीय संसदेला अनुच्छेद ४(२) नुसार, सामान्य बहुमताने राज्यांची पुनर्रचना करणे किंवा त्यांच्या सीमा बदलणे शक्य आहे.

२) राज्यांची पुनर्रचना करणे किंवा त्यांच्या सीमा बदल करण्यासाठी राज्य सरकारची संमती आवश्यक नसते.

३) कलम २४६ नुसार अवशिष्ट अधिकार हे भारतीय राज्यघटनेने राज्यांना दिलेले आहेत.

४) कलम ३७१ F, सिक्कीमच्या संदर्भात विशेष परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी तरतुद करते.

प्रश्न क्र. ४

वाळवंट आणि त्याच्या स्थाननुसार खालीलपैकी किती जोड्या योग्य आहेत?

१) नेगेव-सीरिया

२)गोबी-रशिया

३) अरल काराकूम- कझाकिस्तान

पर्यायी उत्तरे :

अ) फक्त एक

ब) फक्त दोन

क) तिन्ही योग्य

ड) एकही नाही

प्रश्न क्र. ५

खालील विधानांचा विचार करून योग्य असलेले विधान निवडा.

१) भारतातील रस्त्यांच्या वितरण पद्धतीमध्ये समानता असल्याचे दिसून येते.

२) उत्तर प्रदेश मध्ये रस्त्याचे जाळे गुजरात राज्याच्या तुलनेत अधिक आहे.

३) राज्य महामार्ग मध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो.

४) वरीलपैकी सर्व योग्य

प्रश्न क्र. ६

पुढील विधानापैकी योग्य असलेला पर्याय निवडा.

१) भारतातील उत्तरेचे मैदान रस्ते वाहतुकीचे जाळे बांधण्यासाठी उपयुक्त असले तरी तिथे रस्ते बांधण्याची सामग्री उपलब्ध नाही.

२) उत्तरेचे मैदान हे वाळू गाळ आणि चिकन मातीचे बनलेले आहे.

पर्यायी उत्तरे :

१) १ आणि २ दोन्ही बरोबर असून विधान २ हे विधान १ चे कारण आहे.

२) १ आणि २ दोन्ही बरोबर असून विधान २ हे विधान १ चे कारण नाही.

३) १ योग्य २ अयोग्य

४) २ योग्य १ अयोग्य

प्रश्न क्र. ७

पुढील विधाने विचारात घ्या.

१) आपत्कालीन परिस्थितीत तसेच पूर, दुष्काळ, महामारी आणि युद्धे यांसारख्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमध्ये हवाई वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावते.

२) प्रतिकूल प्रदेश जसे उंच पर्वत, घनदाट जंगले, दलदलीचे क्षेत्र आणि वालुकामय वाळवंट हवाई वाहतुकीद्वारे सहजपणे पोहोचू शकतो, जे वाहतुकीच्या इतर पद्धतींद्वारे जवळजवळ अशक्य आहे.

पर्यायी उत्तरे :

१) १ आणि २ दोन्ही बरोबर असून विधान २ हे विधान १ चे कारण आहे.

२) १ आणि २ दोन्ही बरोबर असून विधान २ हे विधान १ चे कारण नाही.

३) १ योग्य २ अयोग्य

४) २ योग्य १ अयोग्य

प्रश्न क्र. ८

खालीलपैकी असत्य विधान निवडा.

१) इंडियन नॅशनल एअरवेजची स्थापना १९३३ मध्ये झाली.

२) १९५३ मध्ये, हवाई वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

३) देशातील हवाई वाहतूक वाढवण्यासाठी १९८१ मध्ये वायुदूतची स्थापना करण्यात आली.

४) वरीलपैकी सर्व योग्य आहे.

प्रश्न क्र. ९

पुढील विधनांपैकी कोणते विधान योग्य नाही?

१) भारतात खासगी हवाई टॅक्सींनी १९९० मध्ये त्यांची सेवा सुरू केली.

२) देशांतर्गत हवाई वाहतूक सेवेबाबतचे धोरण एप्रिल १९९७ मध्ये मंजूर करण्यात आले होते.

३) १ एप्रिल १९९० रोजी विलीन करून भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) स्थापन करण्यात आले.

४) दिल्ली येथील विमानतळाचे नाव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

प्रश्न क्र. १०

कच्च्या तेला संदर्भात खालीलपैकी योग्य विधान ओळखा :

१) भारत कच्च्या तेलाचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे.

२) कच्च्या तेलासंदर्भात सौदी अरेबिया हा भारताचा मुख्य आणि सर्वात मोठा स्त्रोत आहे.

पर्यायी उत्तरे :

अ) फक्त १

ब) फक्त २

क) दोन्ही बरोबर

ड) दोन्ही चूक

प्रश्न क्र. ११

खालीलपैकी अयोग्य असलेले विधान निवडा.

१) स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा जून, २०१६ मध्ये एकात्मिक नागरी उड्डाण धोरण अधिसूचित करण्यात आले.

२) लोकांसाठी विमान प्रवास सुलभ आणि परवडणारा बनवण्यासाठी ही योजना ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १

२) फक्त २

३) १ आणि २ दोन्ही

४) १ आणि २ दोन्ही नाही

प्रश्न क्र. १२

पुढील विधानांचा लक्षपूर्वक अभ्यास करून योग्य असलेला पर्याय निवडा.

विधान १) : घटनात्मक मर्यादांचे उल्लंघन झाल्यास, संबंधित विधिमंडळाचा कायदा न्यायालयांद्वारे अवैध घोषित केला जातो.

विधान २) : भारताची राज्यघटना हा देशातील सर्वोच्च कायदा आहे.

पर्यायी उत्तरे :

१) विधान १ आणि २ दोन्ही बरोबर असून, विधान २ हे विधान १ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

२) विधान १ आणि २ दोन्ही बरोबर असून, विधान २ हे विधान १ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

३) विधान १ बरोबर, विधान २ चूक

४) विधान १ चूक, विधान २ बरोबर

प्रश्न क्र. १३

खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

१) राज्यघटनेच्या भाग ११ मध्ये केंद्र राज्य यांच्यातील कायदेविषयक अधिकार दिलेले आहेत.

२) कलमे २४५ ते २५५ केंद्र आणि राज्यांमधील कायदेविषयक संबंधांशी संबंधित आहेत.

३) राज्य विधिमंडळ फक्त त्याच्याखात्यारीत येणाऱ्या प्रदेशाबद्दलच कायदे करू शकतो.

४) वरीलपैकी सर्व योग्य.

प्रश्न क्र. १४

पुढील विधानांची सत्यता तपासा.

१) केंद्र आणि राज्यात कायदेशीर अधिकारांचे विभाजन भारत सरकार कायदा, १९३५ मधून राज्यघटनेत स्वीकारण्यात आले आहे.

२) केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या तीन सूची संविधानाच्या अनुसूची ७ आणि कलम २४६ मध्ये नमूद आहेत.

३) कलम २४८ मधील अवशिष्ठ अधिकारांबाबत (Residuary powers) निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रच आहे.

४) वरीलपैकी सर्व योग्य

प्रश्न क्र. १५

पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे ते ओळखा.

१) अनुच्छेद २५० नुसार, आणीबाणी कार्यान्वित असताना, संसदेला राज्य विषयांच्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार असेल.

२) जर दोन किंवा अधिक राज्यांच्या विधानमंडळांनी ठराव केला की, त्या राज्यांशी संबंधित राज्य सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही बाबींच्या संदर्भात कायदे करणे संसदेला कायदेशीर असेल.

३) आंतरराष्ट्रीय करार आणि अधिवेशने लागू करण्याच्या उद्देशाने कोणत्याही विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार केंद्राला आहे.

४) राज्यांना आर्थिक आणीबाणीच्या काळात राज्य विधानसभेने मंजूर केलेली मनी बिले राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे बंधनकारक नाही.

प्रश्न क्र. १६

२+२ बैठकांसंदर्भात खालील विधानांचा विचार करा :

१) ही विदेश व संरक्षण मंत्रालयातील दोन उच्च-स्तरीय अधिकारारी/मंत्र्यांची बैठक असते.

२) रशिया हा भारताचा सर्वात जुना आणि सर्वात महत्त्वाचा २+२ बैठक भागीदार देश आहे.

३) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २+२ बैठक झालेली नाही.

वरील विधानांपैकी किती विधाने योग्य आहेत?

पर्यायी उत्तरे :

अ) फक्त एक

ब) फक्त दोन

क) तिन्ही

ड) एकही नाही

वरील प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न क्र. १- ४
प्रश्न क्र. २- ४
प्रश्न क्र. ३- ३
प्रश्न क्र. ४- १
प्रश्न क्र. ५- ३
प्रश्न क्र. ६- १
प्रश्न क्र. ७- १
प्रश्न क्र. ८- ४
प्रश्न क्र. ९- ३
प्रश्न क्र. १०-४
प्रश्न क्र. ११- १
प्रश्न क्र. १२-१
प्रश्न क्र. १३-४
प्रश्न क्र. १४-४
प्रश्न क्र. १५-४
प्रश्न क्र. १६-१

Story img Loader