UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सीरिज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते, तसेच त्याची उत्तरेही खाली दिली जातात.
प्रश्न क्र. १
अतिवाहकता (Superconductivity) संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
१) अतिवाहकता ही स्थिती कमी तापमानात निर्माण होते.
२) जर्मेनियम ही अतिवाहकता गुणधर्म आढळलेला पहिला पदार्थ होता.
३) अतिवाहकता ही अशी स्थिती आहे, जी विद्युत प्रवाहास जास्तीत जास्त प्रतिकार करते.
वरीलपैकी किती विधान योग्य आहेत?
अ) फक्त १
ब) फक्त २
क) तिन्ही बरोबर
ड) एकही नाही.
हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३६
प्रश्न क्र. २
अणुऊर्जा प्रकल्प | स्थान |
कैगा | गुजरात |
कुडनकुलम | तामिळनाडू |
काक्रापार | कर्नाटक |
वरीलपैकी किती जोड्या योग्य आहेत?
१) फक्त १
२) फक्त २
३) सर्व योग्य
४) एकही नाही
प्रश्न क्र. ३
खालील बेटांचा विचार करा :
१) आगत्ती बेट
२) सिंक बेट
३) किल्टन बेट
४) रुटलँड बेट
५) बित्रा बेट
वर दिलेली किती बेटे लक्षद्वीपचा भाग आहेत?
अ) फक्त दोन
ब) फक्त तीन
क) फक्त चार
ड) पाचही बेटे
प्रश्न क्र. ४
१) पेरिहेलियन (Perihelion) हा असा बिंदू असतो, जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात दूर असते.
२) ॲफेलियन हा बिंदू असतो, जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात जवळ असते.
वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत?
अ) फक्त १
ब) फक्त २
क) दोन्ही योग्य
ड) दोन्ही अयोग्य
हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३७
वरील प्रश्नांची उत्तरे :
प्रश्न क्र. १ : पर्याय ‘अ’ हे उत्तर योग्य
१) अतिवाहकता ही पदार्थांची अशी स्थिती आहे, ज्यावेळी पदार्थातील विद्युत प्रवाहाला प्रतिकार करण्याची क्षमता ही शून्य किंवा शून्याच्या जवळपास असते. त्यामुळे विधान ‘क’ हे अयोग्य आहे.
२) अतिवाहकता ही स्थिती कमी तापमानात निर्माण होते. ( उणे २५० ते २७३ अंश सेंल्सिअस ) त्यामुळे विधान १ योग्य आहे.
३) अतिवाहकता हा गुणधर्म आढळलेला पहिला पदार्थ पारा हा होता, त्यामुळे विधान २ योग्य नाही.
प्रश्न क्र. २ : पर्याय ‘अ’ हे उत्तर योग्य
अणुऊर्जा प्रकल्प स्थान
कैगा कर्नाटक
कुडनकुलम तामिळनाडू
काक्रापार गुजरात
प्रश्न क्र. ३ : पर्याय ‘ब’ हे उत्तर योग्य
१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप चर्चेचा विषय ठरला आहे.
२) लक्षद्वीप अरबी समुद्रापासून केरळपासून सुमारे ४०० किमी अंतरावर आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. येथील बहुसंख्य लोकसंख्या ही मुस्लीम आहे.
३) आगत्ती, अमिनी, अँड्रॉट, बित्रा, किल्टन, कावरत्ती, मिनिकॉय ही बेटे लक्षद्वीपचा भाग आहेत; तर सिंक आणि रुटलँड बेट ही अंदमान आणि निकोबार बेटांचा भाग आहेत.
प्रश्न क्र. ४ : पर्याय ‘ड’ हे उत्तर योग्य
१) पेरिहेलियन या शब्दाची निर्मिती ग्रीक शब्द पेरी, ज्याचा अर्थ जवळ असा होतो आणि हेलिओस म्हणजे सूर्य या दोन शब्दांपासून झाली आहे. त्यामुळे विधान १ अयोग्य आहे.
२) आपल्या सूर्यमालेतील ग्रह धूमकेतू आणि लघुग्रह यांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते, त्यामुळे प्रत्येकाचा एक पेरिहेलियन आणिॲफेलियन बिंदू असतो.
३) पृथ्वी ही पेरिहेलियन बिंदूवर जानेवारी महिन्यात, तर ॲफेलियन बिंदूवर जुलै महिन्यात येते. ॲफेलियन हा असा बिंदू असतो, जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात दूर असते, त्यामुळे विधान २ ही अयोग्य आहे.