UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.
प्रश्न क्र. १
उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अचूक नाही?
१) कलम ६६ मध्ये उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी पात्रता नमूद आहे.
२) उपराष्ट्रपती होण्यासाठी व्यक्तीने वयाची २५ वर्षे पूर्ण केली असावी.
३) ती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावी.
४) वरीलपैकी सर्व योग्य
प्रश्न क्र. २
भारतात रेल्वे मार्गाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी खालीलपैकी कोणता घटक संबंधित नाही?
१) भौगोलिक घटक
२) आर्थिक घटक
३) आयात निर्यात घटक
४) वरीलपैकी सर्व योग्य
प्रश्न क्र. ३
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
१) भारतीय उपराष्ट्रपती पुन्हा उपराष्ट्रपती पदावर निवडणुकीसाठी पात्र असतो.
२) कलम ७१ मध्ये असलेल्या तरतुदी नुसार उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित शंका आणि विवादांचे निर्णय घेण्याचा अधिकार उच्च न्यायालयाचा आहे.
३) उपराष्ट्रपती हे लोकसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य पार पाडतात.
४) वरीलपैकी एकही नाही.
हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – २९
प्रश्न क्र. ४
पुढील विधानांना विचारात घेऊन बिनचूक असलेले विधान निवडा.
१) भारतातील पहिला रेल्वे मार्ग १६ एप्रिल १८५६ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान ३४ किमी अंतरावर सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
२) स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये रेल्वे विभागणी दरम्यान पाकिस्तानला भारताच्या तुलनेत रेल्वे मार्गाची लांबी जास्त गेली.
३) भारतात लोहमार्गाचे जाळे जरी जगातील चौथ्या क्रमांकाचे असले तरीही मागील तीन दशकांमध्ये देशाचे रेल्वे नेटवर्क फक्त ७.५% प्रमाणात वाढले आहे.
४) भारतातील पहिला रेल्वे मार्ग १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते पुणे दरम्यान ३४ किमी अंतरावर सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
प्रश्न क्र. ५
‘सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीम’संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
अ) सार्वजनिक सुरक्षा वाढवणे आणि आणीबाणीच्या काळात लोकांपर्यंत वेळावर सुचना पोहोचवणे हे यंत्रणेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
ब) ही यंत्रणा सरकार आणि आपात्कालीन सेवेत काम करणाऱ्या संस्थांसाठी संवादाचं एक साधन म्हणून कार्य करते.
क) ही यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीत कमी वेळात सर्वांपर्यंत माहिती पोहोचवण्यास मदत करते.
वरील योग्य विधान/ने कोणती?
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब
२) ब आणि क
३) फक्त ब
४) वरील सर्व
प्रश्न क्र. ६
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) दांडेली वन्यजीव अभयारण्य परिसरात छत बांधण्यास अनुकूलता दर्शवलता दर्शवली आहे. हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
पर्यायी उत्तरे :
अ) महाराष्ट्र
ब) कर्नाटक
क) छत्तीसगड
ड) तेलंगणा
प्रश्न क्र. ७
खालीलपैकी कोणत्या माशाला गुजरात सरकारने राज्य माशाचा दर्जा दिला आहे.
पर्यायी उत्तरे :
अ) गोल्डन महसीर
ब) फिनफिश
क) कॅटफिश
ड) घोल
प्रश्न क्र. ८
नेहरू-लियाकत करारासंदर्भात खालील विधानांचा विचार करा.
१) हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान झालेला एक द्विपक्षीय करार होता.
२) यालाच ‘पुना पॅक्ट’ असेही म्हणतात.
वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?
पर्यायी उत्तरे :
अ) फक्त अ
ब ) फक्त ब
क) दोन्ही बरोबर
ड) दोन्ही चूक
प्रश्न क्र. ९
भारताच्या अंतरिम सरकार संदर्भात, खालील विधानांचा विचार करा.
अ) या सरकारचे कार्य १९३५ च्या भारत सरकार कायद्यानुसार चालले.
ब) या सरकारमध्ये वल्लभभाई पटेल हे कृषी आणि अन्न खात्याचे मंत्री होते.
क) या सरकारमध्ये मुस्लीम लीगचा समावेश नव्हता.
वरील पैकी योग्य विधान/ने ओळखा :
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि क
४) वरीलपैकी एकही नाही
प्रश्न क्र. १०
कोन्याक, खिमनियुंगन, चांग आणि संगटम या आदिवासी जमाती अलीकडेच चर्चेत होत्या. या जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात राहतात?
पर्यायी उत्तरे :
अ) मणिपूर
ब) मेघालय
क) त्रिपुरा
ड) नागालँड
हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – २८
प्रश्न क्र. ११
सिव्हिएरोडोनेत्स्क हे एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे, जे रासायनिक प्रकल्प केंद्र आणि मशीन निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसाठी ओळखले जाते. हे औद्योगिक केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे?
पर्यायी उत्तरे :
अ) रशिया
ब) रोमानिया
क) इस्रायल
ड) युक्रेन
प्रश्न क्र. १२
खालील देशांचा विचार करा :
अ) इस्रायल
ब) इजिप्त
क) सीरिया
योम किप्पूर युद्धात वरीलपैकी किती देश सहभागी होते?
पर्यायी उत्तरे :
१) फक्त १
२) फक्त २
३) वरील सर्व
४) एकही नाही
प्रश्न क्र. १३
खालील ठिकाणांचा विचार करा:
(१) पासमलुंग
(२) जकारलुंग खोरे
(३) डोकलाम
वरील ठिकाणांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे त्यांच्या स्थानांचा योग्य क्रम काय आहे?
अ) १-२-३
ब) ३-१-२
क)३-२-१
ड)१-३-२
प्रश्न क्र. १४
खालील विधानांचा विचार करा आणि चुकीचे विधान ओळखा.
१) आंतरराज्य नदी जलविवाद सोडविण्यासाठी घटनेतील कलम २६२ नुसार न्यायाधिकरण स्थापन केले जाते.
२) संसदेने आंतर-राज्य नदी जल विवाद कायदा, १९६५ लागू केला आहे.
३) आंतरराज्य नदी जलविवाद न्यायाधिकरण राष्ट्रपतीद्वारे स्थापन केले जाते.
४) जल विवाद न्यायाधिकरणाद्वारे करण्यात आलेला निवाडा कलम २६२(२) नुसार अंतिम असतो आणि या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येत नाही.
हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३०
प्रश्न क्र. १५
पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
१) कलम १९(१)(g) नुसार व्यापार किंवा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
२) कलम ३०३(१) नुसार संसदेला किंवा राज्य विधानमंडळाला व्यापार, वाणिज्य किंवा परस्परसंबंधात कोणताही कायदा करण्याचा अधिकार नाही.
३) सार्वजनिक हितासाठी राज्याद्वारे आंतरराज्य व्यापारावर वाजवी निर्बंध लादले जाऊ शकतात.
४) वरीलपैकी सर्व योग्य
वरील प्रश्नांची उत्तरं खालीलप्रमाणे :
प्रश्न क्र. १- २
प्रश्न क्र. २- ४
प्रश्न क्र. ३- १
प्रश्न क्र. ४- ३
प्रश्न क्र. ५- ४
प्रश्न क्र. ६- २
प्रश्न क्र. ७- ४
प्रश्न क्र. ८- १
प्रश्न क्र. ९- ४
प्रश्न क्र. १०-४
प्रश्न क्र. ११-४
प्रश्न क्र. १२-३
प्रश्न क्र. १३-१
प्रश्न क्र. १४-२
प्रश्न क्र. १५-४
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.