Current Affairs Question Set For UPSC 2024 : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सीरिज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते, तसेच त्याची उत्तरेही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

काही दिवसांपूर्वी कोटिया क्षेत्र बातम्यांमध्ये होते, हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमधील विवादित क्षेत्र आहे?

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
maharashtra assembly election 2024 srijaya chavan vs tirupati kadam kondhekar bhokar assembly constituency
लक्षवेधी लढत : मुलीसाठी अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
BJP Astrological Predictions 2024 Shani Impact on BJP Future in Marathi
BJP Astrological Predictions 2024: शनी भाजपासाठी अडचणींचा, निवडणुकांमध्ये होणार मोठा धमाका; वाचा ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

अ) आंध्र प्रदेश आणि तेलंगणा
ब) महाराष्ट्र आणि कर्नाटक
क) ओडिशा आणि आंध्रप्रदेश
ड) आसाम आणि मिजोरम

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सीरिज-३८

प्रश्न क्र. २

हा मार्ग पर्शियन आखातीच्या मुखाशी स्थित असून, तो ईराण आणि ओमान या दोन देशांना वेगळा करतो. तसेच तो पर्शियन आखातीला ओमाची खाडी आणि अरबी समुद्राला जोडते.

वरील वर्णन हे कशाशी संबंधित आहे?

पर्यायी उत्तरे :

अ) होर्मुज सामुद्रधुनी
ब)बाब अल-मंदेब
क) लाल सागर
ड) मृत सागर

प्रश्न क्र. ३

RE-HAB प्रकल्प कधी-कधी बातम्यांमध्ये असतो, हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांशी संबंधित आहे.

अ) कोळसा प्रदुषण कमी करणे
ब) लोकांना अंमली पदार्थ आणि दारूच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करणे
क) मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे
ड) शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यासाठीचा प्रकल्प

प्रश्न क्र. ४

खालील राज्यांचा विचार करा :

१) नागालँड
२) त्रिपुरा
३) आसाम
४) मेघालय
५) मणिपूर

वरील राज्यांपैकी किती राज्यांची सीमा मिझोरमला लागून आहे?

अ) फक्त दोन
ब) फक्त तीन
क) फक्त चार
ड) सर्व पाच

प्रश्न क्र. ५

बॅब-अल-मंदेब सामुद्रधुनी बातम्यांमध्ये होती. ही खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांना जोडते?

अ) लाल समुद्र आणि भूमध्य सागर
ब) पर्शियन आखात आणि अरबी समुद्र
क) एडनचे आखात आणि अरबी समुद्र
ड) लाल समुद्र आणि एडनचे आखात

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सीरिज- ३९

वरील प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न क्र. १ चे उत्तर : पर्याय ‘क’ हे उत्तर योग्य आहे.

१) कोटिया क्षेत्र ओडिशा आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर आहे. या क्षेत्रात साधारण २२ गावे येतात. दोन्ही राज्ये या क्षेत्रावर आपला हक्क सांगतात. हे क्षेत्र भुवनेश्वरवरून जवळपास ५५० किमी दूर आहे.

२) या क्षेत्रावरून ओडिशा आणि आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये पाच दशकांपासून वाद सुरू आहेत. दोन्ही राज्यांनी या क्षेत्रावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या, यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आधी १९६८ मध्ये आणि नंतर २००६ मध्ये परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले.

३) २०२१ मध्ये आंध्रप्रदेशने कोटिया क्षेत्रांतील काही गावांमध्ये मतदान केंद्र तयार केले होते, तसेच काही ठिकाणी थेट ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या होत्या. या क्षेत्राची लोकसंख्या ही साधारण ४ हजार आहे.

प्रश्न क्र. २ उत्तर : पर्याय ‘अ’ हे उत्तर योग्य आहे.

होर्मुज सामुद्रधुनी ही पर्शियन आखातीच्या मुखाशी स्थित असून आंतराराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.

हा जलमार्ग ईराण आणि ओमान या दोन देशांना वेगळा करतो. तसेच तो पर्शियन आखातीला ओमाची खाडी आणि अरबी समुद्राला जोडते.

हा जलमार्ग ३३ किमी रुंद असून सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात, कुवैत आणि इराक यांच्याद्वारे केली जाणारी कच्च्या तेलाची निर्यात याच मार्गावरून केली जाते.

प्रश्न क्र. ३ चे उत्तर : पर्याय क हे उत्तर योग्य आहे.

१) हा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे सुरु करण्यात आलेला एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे वन्यजीवांना कोणतेही नुकसान न पोहोचवता मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकल्प देशातील ७ राज्यांमध्ये चालवला जातो. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.

२) या प्रकल्पांतर्गत मधमाशांच्या पेटीला अशा ठिकाणी ठेवले जाते, जिथून हत्ती सारखे प्राणी शेत आणि मानवी वस्तीत प्रवेश करतात. असे प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करू नये, हा त्यामागचा मुख्य हेतू असतो.

प्रश्न क्र. ४ चे उत्तर : पर्याय ‘ब’ हे योग्य उत्तर आहे.

मिझोरामची १६५ किलोमीटरची सीमा आसामला लागून आहे. तसेच मिझोरामची सीमा आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर या तीन राज्यांना लागून आहे. त्यामुळे पर्याय ब हे योग्य उत्तर आहे.

प्रश्न क्र. ५ चे उत्तर : पर्याय ‘ड’ हे उत्तर योग्य आहे

कच्चे तेल आणि एलएनजी गॅसच्या आयातीसाठी तसेच पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोप बरोबर व्यापाराच्या दृष्टीने बॅब-अल-मंदेब सामुद्रधुनी भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ही सामुद्रधुनी लाल समुद्र आणि एडनच्या आखाताला जोडते.