प्रश्न क्र. १

अ) १८५७ च्या उठावाची अधिकृत सुरुवात १० मे १८५७ रोजी मेरठमधून झाली.

ब) ब्रिटिशांनी मंगल पांडेचे कोर्ट मार्शल करीत त्याला २९ मार्च १८५७ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली.

nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
How to Practice Mock Tests For Exams
SBI PO & Clerk Exam Tips : परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत? मग मॉक टेस्टचा ‘असा’ करा सराव
MPSC Mantra Group B Services Prelims Exam General Science career news
एमपीएससी मंत्र: गट ब सेवा पूर्व परीक्षा: सामान्य विज्ञान
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी

क) कानपूरमध्ये १८५७ च्या उठावाचे नेतृत्व दुसऱ्या बाजीरावांचे दत्तक पुत्र नानासाहेब यांनी केले.

योग्य विधान ओळखा?

पर्याय :

१) अ आणि क

२) ब आणि क

३) फक्त क

४) वरील सर्व

प्रश्न क्र. २

योग्य विधान/ने ओळखा?

अ ) उष्ण कटिबंधीय आवर्त दोन्ही गोलार्धात ८ ते २० अक्षवृत्तादरम्यान तयार होतात.

ब ) उष्ण कटिबंधीय आवर्ताची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे.

क ) उष्ण कटिबंधीय आवर्ताची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे.

पर्यायी उत्तरे

१) फक्त ब व क

२) फक्त अ व ब

३) फक्त अ व क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ३

योग्य विधान/ने ओळखा ?

अ ) जर्मन शास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर यांनी भूखंडवहन सिद्धांत मांडला आहे.

ब ) ६५ दशलक्ष वर्षापूर्वी उत्तर अमेरिका हा युरेशिया पासून वेगळा झाला आहे.

क ) जिगस्वा फिट , पूराहवामान शास्त्रीय पुरावे , भु-शास्त्रीय पुरावे, पूराचुंबकीय पुरावे हे अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञानी मांडलेले पुरावे आहेत.

पर्यायी उत्तरे :

१ ) अ आणि ब योग्य

२) ब आणि क योग्य

३) अ आणि क योग्य

४ ) वरीलपैकी सर्व बरोबर

प्रश्न क्र. ४

खालील विधाने विचारात घ्या.

अ ) भूपट्ट विवर्तनिकी सिध्दांत डब्ल्यूजे मॉर्गन यानी मांडला आहे.

ब ) भूपट्ट विवर्तनिकी सिध्दांत हा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे.

क ) जगातील बहुसंख्य सक्रिय ज्वालामुखी दोन प्लेटच्या सीमेवर आढळतात.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब योग्य

२) ब आणि क योग्य

३) अ आणि क योग्य

४) वरीलपैकी सर्व बरोबर

प्रश्न क्र. ५

योग्य विधान/ने ओळखा ?

अ ) बाह्यगाभा आणि अंतर गाभा यांना विभागणाऱ्या थरास रेपेट्टी असे म्हणतात.

ब ) बाह्यप्रावरण आणि आंतर प्रावरण यांना विभागणाऱ्या थरास लेहमन विलगता असे म्हणतात.

क ) सियाल आणि सायमा थरास विभागणाऱ्या थरास कॉनरॉड विलगता असे म्हणतात.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ आणि ब

२) फक्त क

३) फक्त ब योग्य

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ६

योग्य विधाने/ने ओळखा?

अ ) बाह्यगाभा द्रव्यरूप स्वरुपाचा असुन त्यामधुन दुय्यम लहरी जाऊ शकत नाही.

ब ) अंतरिक गाभा घन स्वरुपाचा आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ आणि ब योग्य

४) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. ७

येलदरी जलविद्युत प्रकल्पविषयी योग्य विधान/ने ओळखा ?

अ ) हा प्रकल्प परभणी जिल्ह्यामध्ये दक्षिण पूर्णा नदीवर उभारण्यात आलेला आहे.

ब ) येलदरी जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 50 मेगावॅट आहे

क ) हा प्रकल्प महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.

पर्यायी उत्तरे :

१ ) अ आणि ब योग्य

२) ब आणि क योग्य

३) अ आणि क योग्य

४) वरीलपैकी सर्व बरोबर

प्रश्न क्र. ८

खालील विधाने विचारात घ्या.

अ ) पवनऊर्जा निर्मितीसाठी १५ मी/से वारा उत्तम समजला जातो.

ब ) पवनऊर्जा निर्मितीसाठी २५ मी/से हा वारा प्रतिकूल समजला जातो.

क ) सौरउर्जेची निर्मिती फोटोसेलचा वापर करून केली जाते.

पर्यायी उत्तरे :

१ ) अ आणि ब योग्य

२) ब आणि क योग्य

३) अ आणि क योग्य

४) वरीलपैकी सर्व बरोबर

प्रश्न क्र. ९

योग्य विधान/ने ओळखा?

अ ) बॉक्साईट या खनिजाचे साठे प्रामुख्याने जांभा खडकांत आढळतात.

ब ) महाराष्ट्रात चुनखडीचे एकूण ९% साठ असून केवळ २% उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते.

क ) यवतमाळ जिल्हयात महाराष्ट्रातील चुनखडीचे सर्वाधिक साठे आढळतात.

पर्यायी उत्तरे :

१ ) अ आणि ब योग्य

२ ) ब आणि क योग्य

३) अ आणि क योग्य

४) वरीलपैकी सर्व बरोबर

प्रश्न क्र. १०

खालील विधाने विचारात घ्या.

अ ) भारतात आढळणाऱ्या एकूण मॅंगनीज साठ्यापैकी त्यापैकी ४० टक्के साठा महाराष्ट्रात आहे.

ब ) मँगनीजचे हे खनिज अग्निजन्य खडकातील गोंडाईट मालेतील मिलोमिलोन या मुख्य खडकात आढळते.

क ) देशातील जवळपास ४०% मँगनीजचे उत्पादन महाराष्ट्रात होते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब योग्य

२ ) ब आणि क योग्य

३ ) अ आणि क योग्य

४) वरीलपैकी सर्व बरोबर

प्रश्न क्र. ११

खालील विधाने विचारात घ्या.

अ ) सातमाळा- अजिंठा डोंगररांगेमुळे गोदावरी आणि तापी या नद्यांचे खोरे वेगळे झालेले आहे.

ब ) सातमाळा- अजिंठा डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेले आहे.

क ) सातमाळा- अजिंठा डोंगररांगांची सुरवात नाशिक जिल्ह्याच्या वायव्य भागामध्ये सह्याद्रीच्या मुख्य समूहात होते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब योग्य

२ ) ब आणि क योग्य

३ ) अ आणि क योग्य

४ ) वरीलपैकी सर्व बरोबर

प्रश्न क्र. १२

योग्य विधाने /ने ओळखा ?

अ ) शंभूमहादेव डोंगररांगेमुळे भीमा आणि कृष्णा नद्यांचे खोरे वेगळी झालेले आहे.

ब ) शंभू महादेव डोंगररांगाचे स्थान हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांगाच्या दक्षिणेला येते.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ आणि ब योग्य

४) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. १३

राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वांसंबंधी खालील विधानांपैकी योग्य विधान ओळखा.

अ) भारतीय संविधानाच्या चौथ्या भागामध्ये कलम ३६ ते ५४ मध्ये राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे.

ब) डॉ. आंबेडकर यांच्या मते, ”मार्गदर्शक तत्त्वे ही १९३५ च्या भारत सरकार कायद्यात नमूद असलेल्या सूचना साधनांसारखीच आहे.”

क) मार्गदर्शक तत्त्वे ही कार्यकारी मंडळाबरोबरच कायदे मंडळालाही निर्देश देतात.

पर्याय

१) अ आणि क

२) क आणि ब

३) अ आणि ब

४) फक्त अ

प्रश्न क्र. १४

खालील विधाने विचारात घ्या.

अ ) उत्तर गोलार्धात व्यापारी वाऱ्याची दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे आहे.

ब) उत्तर गोलार्धात व्यापारी वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे आहे.

क ) दक्षिण गोलार्धात व्यापारी वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून वायव्येकडे आहे.

वरीलपैकी कोणते विधान /ने बरोबर आहेत?

पर्याय

१) फक्त अ व ब

२) फक्त अ व क

३) फक्त क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १५

अ) मूलभूत हक्क म्हणजे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी मूलभूत स्वातंत्र्ये होत.

ब) भारतीय राज्यघटनेच्या कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत अधिकारविषयक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

क) मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ठ असतात

योग्य विधान/ने ओळखा?

पर्याय

१) फक्त अ

२) अ आणि क

३) फक्क ब

४) वरील सर्व

वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे

प्रश्न क्र. १ – ४
प्रश्न क्र. २ -२
प्रश्न क्र. ३ – ४
प्रश्न क्र. ४ – ४
प्रश्न क्र. ५ – २
प्रश्न क्र. ६ – ३
प्रश्न क्र. ७ – १
प्रश्न क्र. ८ – ४
प्रश्न क्र. ९ – ४
प्रश्न क्र. १० – १
प्रश्न क्र. ११ – ३
प्रश्न क्र. १२ -३
प्रश्न क्र. १३ – २
प्रश्न क्र. १४ – २
प्रश्न क्र. १५ – ४

Story img Loader