UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात. या आठवड्यातील प्रश्नमंजुषा पुढील प्रमाणे :
प्रश्न क्र. १
शौकत अली आणि मुहम्मद अली या अली बंधुनी भारतातील कोणत्या आंदोलनाचे नेतृत्व केले?
पर्यायी उत्तरे :
१) खिलाफत चळवळ
२) भारत छोडा आंदोलन
३) चंपारण आंदोलन
४) असहकार आंदोलन
या संदर्भातील लेख – UPSC-MPSC : भारतातील मुस्लिमांनी खिलाफत चळवळ का सुरू केली? याबाबत गांधीजींची भूमिका काय होती?
प्रश्न क्र. २
खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत?
अ) कोल्हापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या कडप्पा खडकाच्या सिरीजला कलाडगी सिरीज असे म्हणतात.
ब) महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे क्षेत्र सर्वात जास्त आहे.
क) महाराष्ट्रातील गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये आढळणाऱ्या गोंडवाना खडकाला साकोली सिरीज असे म्हणतात.
ड) महाराष्ट्रात विंध्ययांना खडकाचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळते.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि क
४) क आणि ड
प्रश्न क्र. ३
महाराष्ट्रातील ऊर्जा केंद्र व जिल्हा याची अयोग्य जोडी ओळखा?
पर्यायी उत्तरे :
१) नाशिक – एकलहरे
२) बीड – परळी
३) चंद्रपूर – खापरखेडा
४) नागपूर – कोराडी
प्रश्न क्र. ४
खालीपैकी योग्य विधान/ने ओळखा?
अ) पहिल्या पाच पंचवार्षिक योजनांमध्ये आर्थिक वाढीवर अधिकाधिक भर देण्यात आला.
ब) पहिल्या चार पंचवार्षिक योजनांमध्ये किमान गरजा पूर्ण करणाऱ्या दारिद्र्य निर्मूलनाकरिता ठोस पावले उचलण्यात आलेली नव्हती.
क) सहाव्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र्य निर्मूलनाकरिता अनेक महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब
२) फक्क क
३) फक्त ब
४) वरील सर्व
प्रश्न क्र. ५
खालील विधाने लक्षात घ्या.
१) गोदावरी नदीप्रणालीने भारताचे १०% क्षेत्र व्यापले आहे.
२) तापी व गोदावरी नदी दरम्यान हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आहे.
३) गोदावरी नदी पश्चिम घाटातून उगम पावते व पूर्व घाट ओलांडून बंगालच्या उपसागराला मिळते.
४) इंद्रायणी नदी गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीला भेटते.
योग्य नसलेला पर्याय निवडा.
१) केवळ अ
२) केवळ ब व ड
३) केवळ अ आणि क
४) केवळ ड
प्रश्न क्र. ६
खालीलपैकी योग्य विधान ओळखा?
अ) पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राष्ट्रीय उत्पन्न २.१ टक्के वार्षिक वृद्धीदराचे लक्ष्य ठेवण्यात आले होते; तर लक्ष्यापेक्षा अधिक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात ३.६ टक्के वार्षिक वृद्धीदर गाठता आला.
ब) पहिल्या योजनेमध्ये कृषी आयातीवरील वाढते अवलंबित्व कमी करणे आणि कृषी क्षेत्राचा विकास करणे ही मुख्य उद्दिष्टे ठेवण्यात आली होती.
क) दुसरे महायुद्ध व फाळणीमुळे निर्माण झालेली चलनवाढ आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आले होते.
पर्यायी उत्तरे :
१ ) फक्त अ
२) फक्त क
३) फक्त ब
४) वरील सर्व
या संदर्भातील लेख – UPSC-MPSC : भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी राबवण्यात आली? त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
प्रश्न क्र. ७
प्राणहिता नदी खालीलपैकी कोणत्या नदी मिळून बनलेली आहे?
१) वर्धा नदी
२) पैनगंगा नदी
३) वैनगंगा नदी
४) इंद्रावती नदी
पर्यायी उत्तरे :
१) वैनगंगा नदी सोडून बाकी सर्व
२) वर्धा नदी सोडून बाकी सर्व
३) इंद्रावती नदी सोडून बाकी सर्व
४) पैनगंगा नदी सोडून बाकी सर्व
प्रश्न क्र. ८
पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
१) महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक दैनिक तापमान कक्षा नागपूर जिल्ह्यात २९° से. आहे.
२) कोकण किनारपट्टीवर सर्वात कमी दैनिक तापमान कक्षा आढळते. जे की सुमारे २° से ते ५° से आहे.
३) उन्हाळ्याच्या दिवसात विदर्भ व खानदेशात उष्माघाताने लोकांचा मृत्यू होतो.
४) वरीलपैकी सर्व योग्य
प्रश्न क्र. ९
खालील पैकी कोणते विधान/ने योग्य आहे?
अ) असहकार चळवळ हे १९२० ते १९२२ या काळात गांधीजींच्या नेतृत्वात करण्यात आलेले पहिले अखिल भारतीय आंदोलन होते.
ब) या चळवळीने राष्ट्रीय आंदोलनाला जनसामान्यांच्या आंदोलनात परावर्तीत केले.
क) या आंदोलनाने राष्ट्रीय आंदोलनाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि क
२) ब आणि क
३) फक्त अ
४) वरील सर्व
या संदर्भातील लेख – UPSC-MPSC : असहकार चळवळ; कारणे, स्वरूप अन् महत्त्व
प्रश्न क्र. १०
खालील विधनांपैकी योग्य असलेले विधान निवडा.
१) महाराष्ट्रात राज्य उष्कटिबंधीय क्षेत्रात येते.
२) महाराष्ट्रातून २३°३०’ उ. कर्करेखा जाते.
३) महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाळ्यात धुळीची वादळे निर्माण होतात.
४) वरील सर्व योग्य
प्रश्न क्र. ११
तिसऱ्या पंचवार्षिक योजनेसंदर्भातील अयोग्य विधान/ने ओळखा?
अ) तिसरी पंचवार्षिक योजना ही १ एप्रिल १९६२ ते ३१ मार्च १९६७ या कालावधीदरम्यान राबविण्यात आली होती.
ब) या योजनेला कृषी व उद्योग योजना, असे नाव देण्यात आले होते.
क) या योजनेमध्ये शेती उद्योगाचा विकास हे भारतामधील नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब
२) फक्त अ
३) फक्त ब
४) वरील सर्व
या संदर्भातील लेख – UPSC-MPSC : तिसर्या योजनेनंतर पंचवार्षिक योजनेमध्ये खंड का पडला? त्यानंतर किती वार्षिक योजना राबवण्यात आल्या?
प्रश्न क्र. १२
महाराष्ट्रातील ऊर्जा साधन संपत्ती बद्दल योग्य असलेला पर्याय निवडा.
१) महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सर्वाधिक दगडी कोळशाची साठी आहेत.
२) मुंबईच्या पश्चिमेला बॉम्बे हाय या तेलक्षेत्रातून भारताच्या एकूण तेलाचे ५० टक्के उत्पादन होते.
३) ठाणे जिल्ह्यातील तुर्भे टाटा हे अणूविद्युत केंद्र आहे.
४) फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यात आहे.
या संदर्भातील लेख – UPSC-MPSC : क्षयक्षम ऊर्जासंपत्ती म्हणजे काय? महाराष्ट्रातील कोणत्या भागात ही ऊर्जा संसाधने आढळतात?
प्रश्न क्र. १३
रौलेट कायद्यासंदर्भातील योग्य विधान/ने ओळखा?
अ) रौलेट कायदा हा एक असा कायदा होता, ज्याद्वारे पोलिस कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करू शकत होते.
ब) या कायद्यांतर्गत विशेष न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. या न्यायालयाला असीमित असे अधिकार देण्यात आले होते.
क) या न्यायालयाच्या निर्णयांवर अन्य कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नव्हते.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब
२) ब आणि क
३) फक्त क
४) वरील सर्व
या संदर्भातील लेख – UPSC-MPSC : रौलेट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड; पार्श्वभूमी, कारणे अन् परिणाम
प्रश्न क्र. १४
पुढील विधानांपैकी योग्य नसलेले विधान ओळखा.
१) महाराष्ट्राचा प्राथमिक खडक बेसॉल्ट हा आहे.
२) महाराष्ट्राचा मुख्य खडक अर्कियन यांना हा आहे.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त १ चूक
२) फक्त २ चूक
३) १ व २ दोन्ही चूक
४) १ व २ दोन्हीं बरोबर
या संदर्भातील लेख – UPSC-MPSC : महाराष्ट्राची भूगर्भ रचना नेमकी कशी आहे?
वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे :
प्रश्न क्र. १-१
प्रश्न क्र. २-४
प्रश्न क्र. ३-३
प्रश्न क्र. ४-४
प्रश्न क्र. ५-२
प्रश्न क्र. ६-४
प्रश्न क्र. ७-३
प्रश्न क्र. ८-४
प्रश्न क्र. ९-४
प्रश्न क्र. १०-४
प्रश्न क्र. ११-२
प्रश्न क्र. १२- २
प्रश्न क्र. १३- ४
प्रश्न क्र. १४- ३
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.