UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात. या आठवड्यातील प्रश्नमंजुषा पुढील प्रमाणे :

प्रश्न क्र. १

बंगाल विभाजनासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.

nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
MPSC Mantra Group B Services Prelims Exam General Science career news
एमपीएससी मंत्र: गट ब सेवा पूर्व परीक्षा: सामान्य विज्ञान
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल

१) जुलै १९०५ मध्ये कोलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये बंगाल विभाजनाविरुद्ध आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२) बहिष्काराचा प्रस्ताव याच ठिकाणी पारित करण्यात आला.

वरील विधानांपकी कोणते विधान अयोग्य आहे?

पर्याय :

अ) फक्त १

ब) फक्त २

क) दोन्ही

ड ) दोन्ही बरोबर

प्रश्न क्र. २

खालीलपकी कोणत्या कायद्यान्वये केंद्र व प्रांत या दोन्ही स्तरांवर लोकसेवा आयोगाची रचना करण्याची तरतूद करण्यात आली होती?

पर्याय :

अ) पिट्स इंडिया अ‍ॅक्ट

ब) १९१९ चा सुधारणा कायदा

क) १९०९ चा सुधारणा कायदा

ड) १९३५ चा भारत सरकार कायदा

प्रश्न क्र. ३

खालीलपकी कोणते विधान भारताच्या संविधानातील चौथ्या परिशिष्टाचे बरोबर वर्णन करते?

पर्याय :

अ) राज्यसभेतील जागांचे वाटप त्यामध्ये दिले आहे.

ब) केंद्र आणि राज्यादरम्यान सत्तेच्या वाटपाची योजना त्यामध्ये दिली आहे.

क) जमातींच्या क्षेत्रांच्या प्रशासनाविषयींच्या तरतुदी त्यामध्ये दिल्या आहेत.

ड) संविधानात नमूद केलेल्या भाषांची सूची त्यामध्ये दिली आहे.

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

१) पहिल्या गोलमेज परिषदेनंतर इंग्रज सरकारने काँग्रेससोबत तडजोड करण्याचे ठरवले, त्या वेळी भारताचा व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्वनि व महात्मा गांधी यांच्यात ५ मार्च १९३१ रोजी एक करार झाला.

२) दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित नव्हते.

३) १९३२ मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड अ‍ॅटली यांनी जातीय निवाडा जाहीर केला.

पर्याय :

१) फक्त १ बरोबर

२) फक्त २ बरोबर

३) फक्त ३ बरोबर

४) सर्व बरोबर

प्रश्न क्र. ५

योग्य विधान/ने ओळखा ?

अ) शिवाजी महाराजांनंतर गनिमी काव्याचा सर्वाधिक वापर कोणी केला असेल तर तो पहिले बाजीराव यांनी केला.

ब) मीर जाफरने १४८ ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवले आणि त्यांची हत्या केली. याच घटनेला इतिहासात ‘पटना हत्याकांड’ या नावाने ओळखले जाते.

क) बक्सरचे युद्ध इ.स. १७६४ मध्ये झाले.

पर्याय :

१) फक्त अ बरोबर

२) अ आणि क बरोबर

३) फक्त ब बरोबर

४) वरील सर्व बरोबर

प्रश्न क्र. ६

अ) पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास पारिस्थितिकी (Ecology) असे म्हणतात.

ब) पारिस्थितिकी म्हणजे सजीवांचा त्यांच्या मूळ निवासस्थानी केलेला अभ्यास होय.

क) पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते, त्यास परिसंस्था (Ecosystem) असे म्हणतात.

वरीलपैकी योग्य विधान ओळखा?

१) अ आणि ब

२) क आणि अ

३) फक्त ब

४) अ, ब, क बरोबर

प्रश्न क्र. ७

विधान अ : १९११ मध्ये भारताच्या राजधानीचे ठिकाण पूर्व भारतामधून पश्चिम भारतात बदलण्यात आले.

स्पष्टीकरण ब : १९११ मध्ये ब्रिटिश सम्राट जॉर्ज पंचम यांचे दिल्लीत आगमनासाठी दिल्ली दरबार भरविण्यात आला होता.

पर्याय :

अ) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

क) विधान अ बरोबर व ब चूक.

ड) विधान अ चूक व ब बरोबर

प्रश्न क्र. ८

योग्य विधान/ने ओळखा?

अ) बुराई नदी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री व सिंदखेडराजा या तीन तालुक्यामधून वाहते.

ब) चंद्रभागा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील गाळण डोंगर रांगेत होते.

क) पांजरा नदीचा उगम अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्यांमध्ये होते.

पर्याय :

१)अ आणि ब योग्य
२) फक्त अ योग्य
३) फक्त ब योग्य
४) अ,ब आणि क

प्रश्न क्र. ९

अ) घटनादुरुस्ती विधेयक जर संघराज्यात्मक संरचनेशी संबंधित असेल, तर ते विधेयक पारित करण्यासाठी विशेष बहुताची आवश्यक असते.

ब) घटनादुरुस्ती विधेयक राज्यांच्या संमतीसाठी मांडले असता, राज्य विधिमंडळाने ते किती कालमर्यादेत पारित करावे, याचा कोणताही उल्लेख राज्यघटनेत नाही.

क) घटनादुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी करणे राष्ट्रपतींसाठी बंधनकारक असते. असे विधेयक राष्ट्रपती रोखून धरू शकत नाहीत किंवा परत ते पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवता येत नाही.

वरील पैकी योग्य विधान/ने ओळखा?

पर्याय :

अ) अ आणि ब
ब) ब आणि क
क) फक्क अ
ब ) फक्त क

प्रश्न क्र. १०

बृहद अर्थशास्त्राशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.

अ) बृहद अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा आहे जी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तनाचा आणि कार्यक्षमतेचा अभ्यास करते.

ब) बृहद अर्थशास्त्र ही बेरोजगारी, विकास दर, सकल देशांतर्गत उत्पादन आणि महागाई यासारख्या अर्थव्यवस्थेतील एकूण बदलांवर लक्ष केंद्रीत करते.

क) बृहद अर्थशास्त्राला उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणूनदेखील ओळखले जाते.

पर्याय :

१) अ आणि ब
२) क आणि अ
३) फक्त ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. ११

खालील विधानावर विचार करा ?

अ ) जगामध्ये सर्वाधिक अभ्रकाचे सर्वाधिक उत्पादन भारतात घेतले जाते.
ब ) बिहार व झारखंड राज्यातील गया, हजारीबाग, मुंगेर व भागलपूर भागांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.
क ) भारतात आंध्रप्रदेश, राजस्थान, झारखंड व बिहार राज्य अभ्रकाबाबत अग्रेसर आहेत.

पर्याय :

१) अ आणि ब योग्य
२) अ आणि क योग्य
३) ब आणि क योग्य
४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १२

खालीलपैकी योग्य विधान ओळखा?

अ) पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राष्ट्रीय उत्पन्न २.१ टक्के वार्षिक वृद्धीदराचे लक्ष्य ठेवण्यात आले होते; तर लक्ष्यापेक्षा अधिक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात ३.६ टक्के वार्षिक वृद्धीदर गाठता आला.

ब) पहिल्या योजनेमध्ये कृषी आयातीवरील वाढते अवलंबित्व कमी करणे आणि कृषी क्षेत्राचा विकास करणे ही मुख्य उद्दिष्टे ठेवण्यात आली होती.

क) दुसरे महायुद्ध व फाळणीमुळे निर्माण झालेली चलनवाढ आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आले होते.

पर्याय :

१ ) फक्त अ
२) फक्त क
३) फक्त ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १३

पुढील विधानांपैकी योग्य नसलेले विधान ओळखा.

१) महाराष्ट्राचा प्राथमिक खडक बेसॉल्ट हा आहे.

२) महाराष्ट्राचा मुख्य खडक अर्कियन यांना हा आहे.

पर्याय :

१) फक्त १ चूक
२) फक्त २ चूक
३) १ व २ दोन्ही चूक
४) १ व २ दोन्हीं बरोबर


वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे :

प्रश्न क्र. १- १
प्रश्न क्र. २- ४
प्रश्न क्र. ३- १
प्रश्न क्र. ४- १
प्रश्न क्र. ५- २
प्रश्न क्र. ६- ४
प्रश्न क्र. ७-४
प्रश्न क्र. ८-२
प्रश्न क्र. ९- २
प्रश्न क्र. १०- ४
प्रश्न क्र. ११- ४
प्रश्न क्र. १२- ४
प्रश्न क्र. १३-५

Story img Loader