UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

महाराष्ट्राच्या स्थलांतराबाबत पुढे काही विधाने दिलेली आहेत या विधानांचा लक्षपूर्वक अभ्यास करून त्यापैकी योग्य असलेली विधान किंवा विधाने निवडा.

Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?

१) आर्थिक घटक अन्नाचा तुटवडा, अधिक चांगले आर्थिक भवितव्य इ. स्थलांतर होण्याची कारणे आहेत.

२) मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांत सर्वाधिक स्थलांतर केले जाते.

३) उत्तर प्रदेश स्थलांतरितांची राज्यामधील टक्केवारी २८.३३% आहे. या खालोखाल कर्नाटक १५.९३% स्थलांतर होते.

४) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत

प्रश्न क्र. २

खालील विधाने विचारात घ्या.

१) महाराष्ट्रात जिल्हयामधील स्थलांतरात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे.

२) भारताच्या इतर राज्यांमधून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरितांमध्ये बिहार सर्वप्रथम क्रमांक आहे.

पुढे दिलेल्या पर्यायातून अयोग्य विधान/ने असणारा पर्याय निवडा.

१) फक्त १

२) फक्त २

३) १ व २ दोन्ही

४) १ व २ दोन्ही नाहीत

प्रश्न क्र. ३

खालील विधाने लक्षात घ्या.

१) महाराष्ट्रात विवाहामुळे होणारे स्थलांतर सर्वांत जास्त आहे.

२) महाराष्ट्रात व्यवसायामुळे स्थलांतर नगण्य आहे.

३) रोजगार या कारणामुळे होणारे स्थलांतर महाराष्ट्राच्या एकूण स्थलांतराच्या १६.५५% एवढे आहे.

४) महाराष्ट्रात वरील कारणांमुळे २००१ सालच्या जनगणनेनुसार, एकूण स्थलांतरितांची संख्या ४१७.१५ लाख आहे.

वरील कोणते विधान/ने योग्य आहेत?

१) १, २ व ३

२) २, ३ व ४

३) १, ३ व ४

४) १, २, ३ व ४

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी कोणते स्थलांतराचे कारण नाही?

१) रोजगार

२) शिक्षण

३) विवाह

४) वरीलपैकी सर्व योग्य आहे.

प्रश्न क्र. ५

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

पर्यायी उत्तरे :

१) कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग – दापोडी (पुणे)

२) ब्राह्मोस – सुपरसॉनिक ब्लॅस्टिक क्षेपणास्त्र

३) बराक – क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र

४) फाल्कन – रडार यंत्रणा

प्रश्न क्र. ६

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

१) पहिल्या गोलमेज परिषदेनंतर इंग्रज सरकारने काँग्रेससोबत तडजोड करण्याचे ठरवले, त्या वेळी भारताचा व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्वनि व महात्मा गांधी यांच्यात ५ मार्च १९३१ रोजी एक करार झाला.

२) दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित नव्हते.

३) १९३२ मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड अ‍ॅटली यांनी जातीय निवाडा जाहीर केला.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १ बरोबर

२) फक्त २ बरोबर

३) फक्त ३ बरोबर

४) सर्व बरोबर

प्रश्न क्र. ७

१९१६ मधील राष्ट्रसभेच्या … अधिवेशनात जहाल आणि मवाळ यांच्यात तडजोड झाली.

१) मुंबई

२) लखनौ

३) लाहोर

४) सुरत

प्रश्न क्र. ८

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

१) सन १९३८ मध्ये हरीपुरा येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले.

२) सन १९३९ च्या त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद सुभाषचंद्र बोस यांनी भूषवले.

३) काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात ८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘चले जाव’ हा ठराव संमत करण्यात आला.

४) भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष आचार्य कृपलानी होते.

५) क्रिप्स मिशनने भारताला वसाहतीचा दर्जा देण्याची
ग्वाही दिली.

६) तात्या टोपे यांना आद्यक्रांतिकारक म्हणून संबोधले जाते.

७) टोकियो येथील कॅथी हॉलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या हंगामी सरकारची घोषणा केली.

पर्यायी उत्तरे :

१) १,२,३,४,५ बरोबर

२) २,३,४,५,६,७ बरोबर

३) २,३,४,५ बरोबर

४) सर्व बरोबर

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

१) इंडिया हाऊसच्या अनंत कान्हेरे यांनी कर्झन वायलीचा खून केला.

२) खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी मुजफ्फर येथील किंग्ज फोर्ड यांच्या वधाचा प्रयत्न केला, जो अपयशी ठरला.

३) काकोरी कटात चंद्रशेखर आझाद, राजेंद्रनाथ लाहिरी, रामप्रसाद बिस्मील यांचा समावेश होता.

४) काकोरी कटात रामप्रसाद बिस्मील, रोशनसिंग, राजेंद्रनाथ लाहिरी तसेच अश्फाकउल्ला यांना फाशीची शिक्षा झाली. ते फाशीवर जाणारे पहिले मुस्लीम क्रांतिकारक होते.

पर्यायी उत्तरे :

१) २ व ३ बरोबर

२) फक्त २ बरोबर

३) २, ३ व ४ बरोबर

४) सर्व बरोबर

प्रश्न क्र. १०

खालील विधाने लक्षात घ्या.

१) एकूण स्थलांतर करणाऱ्यांमध्ये तरुण व बुद्धिवंतांचा भरणा जास्त असतो.

२) बुध्दी स्थलांतरामुळे दोन्हीं आगमन व निर्गमन क्षेत्रावर बहुआयामी परिणाम होत असतात.

३) चांगले रोजगार या कारणामुळे बुध्दी स्थलांतर होते.

४) निर्गमन क्षेत्रात बुध्दीस्थलांतर झाल्यामुळे कार्यक्षम लोकसंख्या घटते.

वरील कोणते विधान/ने योग्य आहेत?

१) १, २ व ३

२) २, ३ व ४

३) १, ३ व ४

४) १, २, ३ व ४

प्रश्न क्र. ११

खालीलपैकी कोणते बुद्धी स्थलांतराचा प्रकार नाही?

१) बुद्धी निर्यात

२) शिक्षण

३) बुद्धी अतिरिक्तता

४) बुद्धी आदानप्रदान

प्रश्न क्र. १२

खालील विधाने विचारात घ्या.

अ) अग्निजन्य खडक प्राथमिक अवस्थेत असून या खडकांत जीवाश्म आढळत नाहीत.

ब) अग्निजन्य अगखडकांमध्ये सिलिका, अॕल्युमिनिअम, मॅग्नेशिअम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात.

क) खडकांचे गुणधर्म खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

१) फक्त अ व ब

२) फक्त अ व क

३) फक्त क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १३

योग्य विधान ओळखा ?

अ ) अमेरिकेच्या सयुंक्त संस्थानांतील मिनेसोटातील डलूथ येथे गॅब्रोचे लोपोलिथ खडक आहे.

ब ) बॅथोलिथ मध्ये बहुधा ग्रॅनाईट किंवा गॅब्रो प्रकारचा खडक असतो.

क ) महाराष्ट्राचे पठार प्रामुख्याने बेसाल्ट खडकाने तयार झाले आहे.

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ व ब

2) फक्त ब व क

3) फक्त अ व क

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १४

खालील विधान/ने विचारात घ्या.

अ ) तपांबर आणि स्थितांबर यांच्यातील वातावरणाच्या थराला तपस्तब्धी थर म्हणतात.

ब) तपस्तब्धी थरामध्ये उष्णतेचे वहन अथवा हवेचे परिवर्तन होत नाही

क )ओझोन थर हा तपस्तब्धी या थरांमध्ये आढळतो.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

१) फक्त अ व ब

२) फक्त अ व क

३) फक्त क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १५

योग्य विधान/ने ओळखा ?

अ ) रेडिओद्वारा संदेशवहन, संपर्क आणि दळणवळण साधणे आयनांबरामुळे शक्य झाले आहे.

ब ) आयनांबरामध्ये राख व धुळीचे ढग निर्माण होतात.

क ) नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि वातावरणातील सर्व विविध वायु हे आयनाबंर थरामध्ये आढळतात.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त ब व क

२) फक्त अ व ब

३) फक्त अ व क

४) वरीलपैकी सर्व

वरील प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न क्र. १ -४
प्रश्न क्र. २-२
प्रश्न क्र. ३-४
प्रश्न क्र. ४-४
प्रश्न क्र. ५-२
प्रश्न क्र. ६-१
प्रश्न क्र. ७-२
प्रश्न क्र. ८-३
प्रश्न क्र. ९-३
प्रश्न क्र. १०-४
प्रश्न क्र. ११-२
प्रश्न क्र. १२-४
प्रश्न क्र. १३-४
प्रश्न क्र. १४-१
प्रश्न क्र. १५ -२