प्रश्न क्र. १

अ) रेग्युलेटिंग ॲक्ट १७७३ द्वारे ब्रिटिश सरकारने कंपनीच्या प्रशासकीय आणि राजकीय कामांना मान्यता दिली.

ब) रेग्युलेटिंग ॲक्ट १७७३ द्वारे बंगालच्या गव्हर्नरला, ‘गव्हर्नर जनरल’ अशी पदवी देण्यात आली.

loksatta lokankika drama competition
‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नव्या पर्वास लवकरच प्रारंभ…
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Chhagan Bhujbal retirement
छगन भुजबळ यांचे निवृत्तीचे संकेत
sugar season india
विश्लेषण: देशातील यंदाचा साखर हंगाम कसा असेल?
after akshay shinde case thane Crime Investigation Branch post of chief become difficult
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे काटेरी मुकुट कोण पेलवणार? ठाणे पोलीस दलात चर्चांना उधाण
education sector marathi news
मावळतीचे मोजमाप: शिक्षण; प्रश्नांच्या संख्येत घट, समस्या कायम
government work in agriculture sector
मावळतीचे मोजमाप: कृषी क्षेत्र; सिंचनसमस्या भिजत, कर्जमाफी अधांतरी आणि कांदाकोंडी!
Stock market indices Sensex and Nifty hit 85000 high
सेन्सेक्स ८५ हजारांच्या शिखरावरून माघारी

क) रेग्युलेटिंग ॲक्ट १७७३ द्वारे कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खासगी व्यापार करण्यास आणि भारतीय नागरिकांकडून भेटवस्तू घेण्यास बंदी घालण्यात आली.

वरील पैकी योग्य विधान/ने ओळखा?

1) अ आणि ब

२) ब आणि क

३) फक्त क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. २

पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली?

१) रेग्युलेटिंग ॲक्ट १७७३

२) चार्टर ॲक्ट १७९३

३) चार्टर ॲक्ट १८५३

४) चार्टर ॲक्ट १८३३

प्रश्न क्र. ३

अ) इ.स. १७७४ मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.

ब) या न्यायालयात एका मुख्य न्यायाधीशांसह पाच अन्य न्यायाधीश होते.

क) सर एलिजा इम्पे यांची सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?

1) अ आणि क

२) ब आणि क

३) फक्त ब

४) फक्त क

प्रश्न क्र. ४

अयोग्य विधान ओळखा?

अ) ब्रिटिश सरकारने चार्टर ॲक्ट १८१३ द्वारे ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील एकाधिकारशाही संपुष्टात आणली.

ब) ब्रिटिश सरकारने चार्टर ॲक्ट १८१३ द्वारे चहा आणि चीनबरोबर होणाऱ्या व्यापारातील ईस्ट इंडिया कंपनीची एकाधिकारशाही कायम ठेवली.

क) ब्रिटिश सरकारने चार्टर ॲक्ट १७९३ द्वारे स्थानिक सरकारला भारतीयांकडून कर वसूल करण्याचे अधिकारही दिले.

ड) ब्रिटिश सरकारने चार्टर ॲक्ट १७९३ द्वारे इंग्लंडमध्ये असलेल्या बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांना भारतातील महसुलातून पगार देण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न क्र. ५

योग्य विधान ओळखा?

अ) चार्टर ॲक्ट १८३३ द्वारे बंगालच्या ‘गव्हर्नर जनरल’ला ‘भारताचा गव्हर्नर’ बनवण्यात आले.

ब) लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता.

क) चार्टर ॲक्ट १८३३ द्वारे गव्हर्नर जनरलच्या नेतृत्वातील संचालक मंडळाची कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ अशी कार्ये विभागण्यात आली.

पर्याय

१) अ आणि ब बरोबर

२) ब आणि क बरोबर

३) फक्त क बरोबर

४) अ आणि क बरोबर

प्रश्न क्र. ६

अ) चार्टर ॲक्ट १८५३ द्वारे कंपनीचा भारतीय कारभार ब्रिटिश संसदेद्वारे केव्हाही बरखास्त केला जाऊ शकतो, असे स्पष्ट संकेत देण्यात आले.

ब) चार्टर ॲक्ट १८५३ द्वारे भारतीयांसाठी नागरी सेवेची दारे उघडी करण्यात आली

क) इ.स. १८५३ साली पारित करण्यात आलेला चार्टर ॲक्ट हा शेवटचा चार्टर ॲक्ट (सनद ) होता.

वरीलपैकी योग्य विधान ओळखा?

पर्याय

१) अ आणि क बरोबर

२) ब आणि क बरोबर

३) फक्त क बरोबर

४) वरील सर्व बरोबर

प्रश्न क्र. ७

अ) भारतात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया एकात्म स्वरूपाची असून ती एकाच मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेच्या हाती सोपविली आहे.

ब) जनसामान्यांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने १९९६ पासून देशातील राजकीय पक्षांना आचासंहिसहिता लागू केली.

क) निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्याखेरीज जेव्हा राष्ट्रपतींना वाटेल तेव्हा आणखी आयुक्त असतात.

वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?

पर्याय

१) अ आणि ब बरोबर

२) क आणि ब बरोबर

३) फक्त क बरोबर

४) वरील सर्व बरोबर

प्रश्न क्र. ८

अ) पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास पारिस्थितिकी (Ecology) असे म्हणतात.

ब) पारिस्थितिकी म्हणजे सजीवांचा त्यांच्या मूळ निवासस्थानी केलेला अभ्यास होय.

क) पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते, त्यास परिसंस्था (Ecosystem) असे म्हणतात.

वरीलपैकी योग्य विधान ओळखा?

१) अ आणि ब

२) क आणि अ

३) फक्त ब

४) अ, ब, क बरोबर

प्रश्न क्र. ९

अयोग्य विधान कोणते?

अ) परिसंस्था ही कितीही लहान तसेच कितीही मोठी असू शकते.

ब) परिसंस्थेतील एका घटकाचा परिणाम हा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या परिसंस्थांतील इतर घटकांवर होत असतो.

क) परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळेही पर्यावरणातील-संतुलन कायम राहण्यास अडचणी निर्माण होतात.

ड) एका ऊर्जा-विनिमय स्तरापासून दुसऱ्या विनिमय-स्तरांकडे ऊर्जेचे होणारे क्रमवार संक्रमण म्हणजे अन्नसाखळी होय.

प्रश्न क्र. १०

खालीलपैकी कोणत्या उपनद्या गोदावरीला दक्षिण तीरावर म्हणजे उजव्या दिशेने येऊन मिळतात.

अ) प्रवरा

ब) प्राणहिता

क) सिंधफणा

ड) मांजरा

पर्यायी उत्तरे:-

१) अ, ब आणि क योग्य

२) ब, क आणि ड योग्य

३) अ, क आणि ड योग्य

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ११

योग्य विधाने ओळखा ?

अ) दक्षिण पूर्णा नदीचा उगम अजिंठा डोंगररांगात झालेला आहे.

ब) बिंदुसरा नदीचा उगम बालघाट डोंगर रांगेत झालेला आहे.

क) बिंदुसरा नदीचा उगम वेरूळ डोंगर रांगेत झालेला आहे.

ड) बीड शहर प्रवरा नदीकाठी वसलेले आहे.

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब योग्य

२) अ, ब आणि क योग्य

३) ब, क आणि ड योग्य

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १२

योग्य विधान ओळखा ?

अ) राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी महाराष्ट्र राज्यात असून उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ब) राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी सर्वाधिक उत्तर प्रदेश मध्ये असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

क) राज्य महामार्गाची एकूण लांबी सर्वाधिक महाराष्ट्रात असून दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब

२) अ आणि क

३) ब आणि क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १३

योग्य विधाने ओळखा ?

अ) गव्हर्नर जनरल लॉर्ड रिडिंग यांच्या कारकिर्दीत मुंबई आणि कुर्ला दरम्यान भारतातील पहिली विजेवर धावणारी रेल्वे धावली.

ब) भारतीय रेल्वे ही आशियातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ योग्य

२) फक्त ब योग्य

३) अ व ब योग्य

४) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. १४

योग्य विधान/ने ओळखा?

अ) अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याची तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्या बदलास एल निनो म्हणतात.

ब) एल निनो नसताना इक्वेडोर पेरु यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील माशांची संख्या वाढते.

क) एल निनो नसताना इक्वेडोर व पेरू यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील माशांची संख्या घटते.

पर्यायी उत्तरे :

१) अ व ब

२) अ व क

३) क व ड

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १५

योग्य विधान/ने ओळखा ?

अ) एल निनोचा प्रभाव वाढल्यास भारतामध्ये दुष्काळाचे प्रमाण वाढते.

ब) एल निनोचा प्रभाव घटल्यास भारतामध्ये दुष्काळाचे प्रमाण वाढते.

क) लहान मुलाच्या घटने दरम्यान मध्ये आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होते.

पर्यायी उत्तरे :

१) अ व ब

२) अ व क

३) ब व क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १६

योग्य विधाने ओळखा?

अ) चंबळ नदी मध्य प्रदेशातील जानापाव येथे विंध्य पर्वतात तिचा उगम आहे.

ब) बेटवा या नदीचा उगम मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यात होतो.

पर्यायी उत्तरे :

१) अ योग्य

२) ब योग्य

३) अ व ब योग्य

४) वरील पैकी नाही

प्रश्न क्र. १७

खालीलपैकी कोणत्या नद्या यमुना नदीच्या उजव्या तीरावरील उपनद्या आहेत.

अ) चंबळ

ब) सिंध

क) बेटवा

ड) केन

इ) वरूणा

पर्यायी उत्तरे :

१) अ,ब,क आणि ड

२) अ, ब, ड आणि इ

३) अ, ब, क आणि इ

४) ब ,क, ड आणि इ

प्रश्न क्र. १८

योग्य विधान/ने ओळखा ?

अ ) दख्खनच्या पठाराची निर्मिती भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे.

ब ) जपानचा फुजियामा, भूमध्यसागरातील स्टॉबोली ही जागृत ज्वालामुखीची उदाहरणे आहेत.

क ) अलास्कातील काटमाई हा मृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे.

पर्यायी उत्तरे :-

१) अ आणि ब

२) अ आणि क

३) ब आणि क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १९

योग्य विधान/ने ओळखा ?

अ ) इटलीतील व्हीस्यूव्हियस हा केंद्रीय ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो.

ब ) वेस्ट इंडीजमधील पिली पर्वत अशा भेगीय ज्वालामुखीचे उदाहरण आहे.

पर्यायी उत्तरे :

१) अ योग्य

२) ब योग्य

३) अ व ब योग्य

४) वरीलपैकी नाही

वरील प्रश्नांची उत्तरं पुढील प्रमाणे –

प्रश्न क्र. १ – ४
प्रश्न क्र. २ – १
प्रश्न क्र. ३ – १
प्रश्न क्र. ४ – क
प्रश्न क्र. ५ – १
प्रश्न क्र. ६ – ४
प्रश्न क्र. ७ – ४
प्रश्न क्र. ८ – ४
प्रश्न क्र. ९ – क
प्रश्न क्र. १० – ३
प्रश्न क्र. ११ – २
प्रश्न क्र. १२ – २
प्रश्न क्र. १३ – ३
प्रश्न क्र. १४ – १
प्रश्न क्र. १५ – १
प्रश्न क्र. १६ – ३
प्रश्न क्र. १७ – १
प्रश्न क्र. १८ – १
प्रश्न क्र. १९ – २