प्रश्न क्र. १

योग्य विधान/ने ओळखा ?

अ) कॉर्न आणि ऊस यांसारख्या पिकांमध्ये आढळणाऱ्या साखरेच्या किण्वनातून इथेनॉल निर्मिती केली जाते.

loksatta lokankika drama competition
‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नव्या पर्वास लवकरच प्रारंभ…
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Chhagan Bhujbal retirement
छगन भुजबळ यांचे निवृत्तीचे संकेत
sugar season india
विश्लेषण: देशातील यंदाचा साखर हंगाम कसा असेल?
after akshay shinde case thane Crime Investigation Branch post of chief become difficult
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे काटेरी मुकुट कोण पेलवणार? ठाणे पोलीस दलात चर्चांना उधाण
education sector marathi news
मावळतीचे मोजमाप: शिक्षण; प्रश्नांच्या संख्येत घट, समस्या कायम
government work in agriculture sector
मावळतीचे मोजमाप: कृषी क्षेत्र; सिंचनसमस्या भिजत, कर्जमाफी अधांतरी आणि कांदाकोंडी!
Stock market indices Sensex and Nifty hit 85000 high
सेन्सेक्स ८५ हजारांच्या शिखरावरून माघारी

ब) १९८२ मध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

क) अपारंपारिक ऊर्जेची (NCE) एकूण स्थापित क्षमता देशातील विजेच्या एकूण स्थापित क्षमतेच्या २२% आहे

पर्याय :

1) फक्त अ व ब

2) फक्त अ व क

3) फक्त ब व क

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. २

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांतर्गत खालीलपैकी कोणत्या उर्जेचा समावेश होतो?

अ) पवन ऊर्जा

ब) सौर ऊर्जा

क) भू- औष्णिक ऊर्जा

ड) जैवइंधन

इ) पेट्रोलियम

पर्याय :

1) फक्त अ ब,आणि क

2) अ, ब, क आणि ड

3) फक्त इ

4) फक्त ड आणि इ

प्रश्न क्र. ३

योग्य विधाने/ने ओळखा ?

अ) जागतिक औषध उत्पादनामध्ये भारताचा ८ टक्के एवढा वाटा आहे.

ब) जागतिक साखर उत्पादनामध्ये भारताचा ब्राझील नंतर दुसरा क्रमांक लागतो.

क) रेशीम उत्पादनात भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक आहे.

पर्याय :

१) अ व क

२) अ व ब

३) ब व क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य नाहीत?

अ) देशातील एकूण कारखान्यांपैकी १/४ एवढे साखर कारखाने महाराष्ट्रात आहे.

ब) भारतातील पहिली कापड गिरणी कासबजी दावर यांनी मुंबई मध्ये ११ जुलै १८५१ रोजी सुरु केली.

क) भारतातील पहिली तागाची गिरणी १८५४ मध्ये कोलकत्ता पासून २० किलोमीटर अंतरावर रिश्रा येथे सुरु झाली.

पर्याय :

१) फक्त अ

२) फक्त अ व ब

३) फक्त अ व क

४) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. ५

योग्य विधान/ने ओळखा ?

अ) कोळसा देशातील एकूण व्यावसायिक ऊर्जेच्या जवळपास ६७% ची पूर्तता करतो.

ब) कोळसा उद्योगाचे राष्ट्रीयकरण १९७६ मध्ये करण्यात आले.

क) अँथ्रासाइट हा कोळशाचा सर्वोत्तम प्रकार मानला जातो.

पर्याय :

१) फक्त अ व ब

२) फक्त अ व क

३) फक्त ब व क

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ६

खालीलपैकी कोणते पारंपारिक ऊर्जा संसाधने आहेत?

अ) कोळसा

ब) खनिज तेल

क) नैसर्गिक वायू

ड) बायोडीजल

पर्याय :

१) फक्त अ आणि ब

२) वरीलपैकी सर्व

३) फक्त अ, ब आणि क

४) फक्त ब आणि क

प्रश्न क्र. ७

योग्य विधान/ने ओळखा ?

अ) शिवाजी महाराजांनंतर गनिमी काव्याचा सर्वाधिक वापर कोणी केला असेल तर तो पहिले बाजीराव यांनी केला.

ब) मीर जाफरने १४८ ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवले आणि त्यांची हत्या केली. याच घटनेला इतिहासात ‘पटना हत्याकांड’ या नावाने ओळखले जाते.

क) बक्सरचे युद्ध इ.स. १७६४ मध्ये झाले.

पर्याय :

१) फक्त अ बरोबर

२) अ आणि क बरोबर

३) फक्त ब बरोबर

४) वरील सर्व बरोबर

प्रश्न क्र. ८

मुघल बादशहा शाहआलम द्वितीय आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यात १२ ऑगस्ट १७६४ रोजी एक तह झाला. हा तह कोणत्या नावाने ओळखळा जातो?

अ) खेडा तह

ब) अलाहाबाद तह

क) बिहार तह

ड) कानपूर तह

प्रश्न क्र. ९

योग्य विधान/ने ओळखा?

अ) हैदरअलीने इ.स. १७६५ मध्ये आधुनिक म्हैसूरची स्थापना केली.

ब) ब्रिटिश आणि म्हैसूर यांच्यात तीन युद्धे झाली. ‘ॲंग्लो-म्हैसूर युद्ध’ या नावाने ओळखली जातात.

क) इ.स. १७६९ मध्ये झालेल्या मद्रासच्या तहाने पहिल्या ‘ॲंग्लो-म्हैसूर’ युद्धाचा शेवट झाला.

पर्याय :

१) फक्त अ

२) अ आणि क

३) ब आणि क

४) फक्त क

प्रश्न क्र. १०

अयोग्य विधान ओळखा?

अ) बाळाजी बाजीराव यांच्या काळात पेशवेपद वंशपरंपरागत झाले.

ब) बाळाजी बाजीराव यांना नानासाहेब या नावानेही ओळखलं जाते.

क) बाळाजी बाजीरावांनी आपली राजधानी पुणे येथे हलवली.

ड) इ.स. १७६४ मध्ये बाळाजी बाजीराव यांचे निधन झाले.

प्रश्न क्र. ११

योग्य जोडी लावा?

अ ) भोसले – १) राजापूर घाटचा तह

ब) सिंधिया – २) देवगावचा तह

क) होळकर – ३) सुर्जी अर्जन गावचा तह

पर्याय :

१) अ – २, ब- ३, क-१

२) अ – १, ब- ३, क-२

३) अ – ३, ब- २, क-१

४) अ – १, ब- २, क-३

प्रश्न क्र. १२

योग्य विधान/ने ओळखा?

अ) भारतातील पहिली रेशीम कापड गिरणी इंग्रजांनी १८३२ मध्ये कोलकत्याजवळील हावडा येथे सुरू केली होती.

ब) भारतामध्ये तागाची पहिली गिरणी १८५४ मध्ये कोलकत्यापासून २० किलोमीटर अंतरावरील रिश्रा येथे सुरू झाली.

क) भारतातील पहिला कागद कारखाना १८३२ मध्ये सेहरामपूर येथे सुरू करण्यात आला; परंतु तो अयशस्वी ठरला.

पर्याय :

१) फक्त अ बरोबर

२) अ आणि क बरोबर

३) क आणि ड बरोबर

४) वरील सर्व बरोबर

प्रश्न क्र. १३

योग्य विधान/ने ओळखा?

अ) पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी २४% भूक्षेत्रावर गवताळ प्रदेश आहेत.

ब) गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत.

क) विविध गवताळ प्रदेशांतील वनस्पती जीवन व प्राणी जीवन आणि त्यांच्या आंतरक्रिया भिन्न असल्याने प्रत्येक गवताळ प्रदेश ही स्वतंत्र गवताळ भूमी परिसंस्था म्हणून ओळखली जाते.

पर्याय :

१) फक्त अ बरोबर

२ अ आणि क बरोबर

३) क आणि ब बरोबर

४) वरील सर्व बरोबर

प्रश्न क्र. १४

अ) भारतासारख्या मोसमी पावसाच्या हवामानात नैसर्गिक गवताळ प्रदेश फार कमी प्रमाणात आढळतात.

ब) भारतातील भिन्न हवामानामुळे गवताळ प्रदेशाचे स्वरूप हंगामी असते.

क) भारतामध्ये मुख्य अन्न असलेल्या गहू, तांदूळ, मका, ज्वारी या गवत प्रजातीच आहेत.

वरील पैकी कोणते विधान/ने योग्य आहे?

पर्याय :

१) फक्त अ बरोबर

२ अ आणि क बरोबर

३) क आणि ब बरोबर

४) वरील सर्व बरोबर

प्रश्न क्र. १५

अ) महाराष्ट्रात माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी १९७५ साली सोलापूर व अहमदनगर या जिल्ह्यांतील गवताळ अधिवास मिळून ‘नानज माळढोक’ अभयारण्याची निर्मिती करण्यात आली.

ब) नाशिकपासून काही अंतरावर ‘ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्र’ काळविटांसाठी विकसित करण्यात आले आहे.

क) महाराष्ट्रात चांदोली, राधानगरी तसेच कारंजा, सोहोळ अभयारण्यामध्ये गवताळ परिसंस्था आहेत.

वरील पैकी अयोग्य विधान/ने कोणते?

पर्याय :

१) फक्त अ

२) अ आणि क

३) क आणि ब

४) फक्त ब

प्रश्न क्र. १६

गवताळ प्रदेशांसदर्भात कोणतं विधान अयोग्य ते ओळखा?

अ) गवताळ प्रदेश हा मानवाला स्वच्छ पाणी आणि हवा पुरविणारा एक प्रमुख स्रोत आहे.

ब) वाघ, बिबट यांसारख्या प्राण्यांसाठी गवताळ प्रदेश हा महत्त्वाचा अधिवास आहे.

क) हा प्रदेश ‘कार्बन डाय-ऑक्साईड’ शोषून घेऊन ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

पर्याय :

१) फक्त अ

२) अ आणि ब

३) फक्त ब

४) क आणि ब

प्रश्न क्र. १७

फझल अली आयोगाबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

अ) फझल अली आयोगाने १९५५ मध्ये आपला अहवाल सादर केला.

ब) के. एस. पणिकर आणि एच. एन कुंजरू हे या आयोगाचे सदस्य होते.

क) आयोगाने राज्यांच्या पुनर्रचनेसाठी भाषा हा निकष अमान्य केला. –

ड) फझल अली आयोगाने ‘एक भाषा एक प्रांत’ या तत्वाला मान्यता दिली नाही.

प्रश्न क्र. १८

अ) भाषेच्या निकषावर निर्माण करण्यात आलेले आंध्रप्रदेश हे पहिले राज्य होते.

ब) फझल अली आयोगाच्या अहवानानुसार भारत सरकारनेही राज्य पुनर्रचना अधिनियम १९५६ पारीत करत १४ आणि ६ केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली.

क) जेपीव्ही समितीने भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याला मान्यता दिली.

वरीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे?

पर्याय :

१)फक्त अ

२) अ आणि क

३) फक्त क

४) अ आणि ब

प्रश्न क्र. १९

अ) भारतीय संविधानातील अनुच्छेद-३ भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या निर्मितीशी संबंधित आहे.

ब) अनुच्छेद-२ नुसार कोणत्याही राज्यांचे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे, राज्याच्या नावात बदल करणे किंवा त्याच्या सीमांमध्ये बदल करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आले आहेत.

क) अनुच्छेद-४ नुसार नवीन राज्याच्या निर्मितीसाठी केलेले कायदे आणि विद्यमान राज्यांच्या क्षेत्रफळ, नाव आदींसंदर्भात केलेले कायदे अनुच्छेद ३६८ अंतर्गत घटनादुरुस्ती म्हणून विचारात घेतले जात नाहीत.

वरील पैकी कोणते विधान/ने योग्य आहे?

पर्याय :

१) अ आणि क

२) ब आणि क

३) फक्त क

४) फक्त अ

वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे –

प्रश्न क्र. १ – ४
प्रश्न क्र. २ – २
प्रश्न क्र. ३- २
प्रश्न क्र. ४ – ४
प्रश्न क्र. ५ – २
प्रश्न क्र. ६ – ३
प्रश्न क्र. ७ – २
प्रश्न क्र. ८ – २
प्रश्न क्र. ९ – ४
प्रश्न क्र. १० – ४
प्रश्न क्र. ११ – १
प्रश्न क्र. १२ – ४
प्रश्न क्र. १३ – ४
प्रश्न क्र. १४ – ४
प्रश्न क्र. १५ – १
प्रश्न क्र. १६ -३
प्रश्न क्र. १७ – ३
प्रश्न क्र. १८ -३
प्रश्न क्र. १९ – ३