प्रश्न क्र. १

खालीलपैकी कोणत्या उपनद्या गोदावरीला दक्षिण तीरावर म्हणजे उजव्या दिशेने येऊन मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ) प्रवरा

ब) प्राणहिता

क) सिंधफणा

ड) मांजरा

पर्यायी उत्तरे:-

1) अ, ब आणि क योग्य

2) ब, क आणि ड योग्य

3) अ, क आणि ड योग्य

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. २

योग्य विधाने ओळखा ?

अ) दक्षिण पूर्णा नदीचा उगम अजिंठा डोंगररांगात झालेला आहे.

ब) बिंदुसरा नदीचा उगम बालघाट डोंगर रांगेत झालेला आहे.

क) बिंदुसरा नदीचा उगम वेरूळ डोंगर रांगेत झालेला आहे.

ड) बीड शहर प्रवरा नदीकाठी वसलेले आहे.

पर्यायी उत्तरे

1) अ आणि ब योग्य

2) अ, ब आणि क योग्य

3) ब, क आणि ड योग्य

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ३

1) योग्य विधान ओळखा ?

अ) राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी महाराष्ट्र राज्यात असून उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ब) राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी सर्वाधिक उत्तर प्रदेश मध्ये असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

क) राज्य महामार्गाची एकूण लांबी सर्वाधिक महाराष्ट्रात असून दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे.

पर्यायी उत्तरे :

1) अ आणि ब

2) अ आणि क

3) ब आणि क

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ४

योग्य विधाने ओळखा ?

अ) गव्हर्नर जनरल लॉर्ड रिडिंग यांच्या कारकिर्दीत मुंबई आणि कुर्ला दरम्यान भारतातील पहिली विजेवर धावणारी रेल्वे धावली.

ब) भारतीय रेल्वे ही आशियातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे.

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ योग्य

2) फक्त ब योग्य

3) अ व ब योग्य

4) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. ५

योग्य विधान/ने ओळखा?

अ) अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याची तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्या बदलास एल निनो म्हणतात.

ब) एल निनो नसताना इक्वेडोर पेरु यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील माशांची संख्या वाढते.

क) एल निनो नसताना इक्वेडोर व पेरू यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील माशांची संख्या घटते.

पर्यायी उत्तरे :

1) अ व ब

2) अ व क

3) क व ड

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ६

योग्य विधान/ने ओळखा ?

अ) एल निनोचा प्रभाव वाढल्यास भारतामध्ये दुष्काळाचे प्रमाण वाढते.

ब) एल निनोचा प्रभाव घटल्यास भारतामध्ये दुष्काळाचे प्रमाण वाढते.

क) लहान मुलाच्या घटने दरम्यान मध्ये आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होते.

पर्यायी उत्तरे :

1) अ व ब

2) अ व क

3) ब व क

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ७

योग्य विधाने ओळखा?

अ) चंबळ नदी मध्य प्रदेशातील जानापाव येथे विंध्य पर्वतात तिचा उगम आहे.

ब) बेटवा या नदीचा उगम मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यात होतो.

पर्यायी उत्तरे :

1) अ योग्य

2) ब योग्य

3) अ व ब योग्य

4) वरील पैकी नाही

प्रश्न क्र. ८

खालीलपैकी कोणत्या नद्या यमुना नदीच्या उजव्या तीरावरील उपनद्या आहेत.

अ) चंबळ

ब) सिंध

क) बेटवा

ड) केन

इ) वरूणा

पर्यायी उत्तरे :

1) अ,ब,क आणि ड

2) अ, ब, ड आणि इ

3) अ, ब, क आणि इ

4) ब ,क, ड आणि इ

प्रश्न क्र. ९

योग्य विधान/ने ओळखा ?

अ ) दख्खनच्या पठाराची निर्मिती भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे.

ब ) जपानचा फुजियामा, भूमध्यसागरातील स्टॉबोली ही जागृत ज्वालामुखीची उदाहरणे आहेत.

क ) अलास्कातील काटमाई हा मृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे.

पर्यायी उत्तरे :-

1) अ आणि ब

2) अ आणि क

3) ब आणि क

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १०

योग्य विधान/ने ओळखा ?

अ ) इटलीतील व्हीस्यूव्हियस हा केंद्रीय ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो.

ब ) वेस्ट इंडीजमधील पिली पर्वत अशा भेगीय ज्वालामुखीचे उदाहरण आहे.

पर्यायी उत्तरे :

1) अ योग्य

2) ब योग्य

3) अ व ब योग्य

4) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. ११

खालील पैकी पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती?

अ) पर्यावरणाच्या नियोजनाची रूपरेषा तयार करणे.

ब) पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त ठेवणे.

क) पर्यावरणातील निरनिराळ्या घटकांचे संशोधन करणे.

ड) मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे.

पर्याय उत्तरे :

१) अ आणि ब

२) फक्त ब

३) अ आणि क

४) वरील सर्व

प्रश्न क्र. १२

1 ) योग्य विधान/ ने ओळखा?

अ ) कोलोरॅडो आणि कोलंबिया ही दोन्ही आंतरपर्वतीय पठारे आहेत.

ब ) कोलंबियाचे पठारचा समावेश उत्तर अमेरिका खंडात होतो.

क ) भूपृष्ठावर लाव्हारस पसरून तयार झालेले खडक कोलंबियाचे पठारी प्रदेशात आढळतात.

पर्यायी उत्तरे :

1) अ व ब योग्य

2) फक्त ब व क योग्य

3) फक्त क योग्य

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १३

खालील विधाने विचारात घ्या.

अ ) गियाना उच्चभूमी भागात अनेक धबधबे आढळत असून जगातील सर्वांत उंच एंजल धबधबा येथे आढळतो.

ब ) पमाउंट ॲकन्काग्वा हे अँडीज पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची सुमारे ६९६२ मी आहे.

वरीलपैकी कोणते विधान /ने बरोबर आहे?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) दोन्ही बरोबर

४) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. १४

योग्य विधान/ ने ओळखा?

अ ) मेसेटा हे आयबेरियन द्वीपकल्पात असून त्याने स्पेन देशाचा निम्मा भाग व्यापला आहे.

ब ) पुय डे सॅन्सी हा मॅसिफ सेंट्रलमधील  सर्वात उंच शिखर आहे.

क ) उरल पर्वत श्रेणीमधील गालधोपिगेन हे सवौच शिखर आहे.

पर्यायी उत्तरे :

1) अ व ब योग्य

2) फक्त क योग्य

3) फक्त ब योग्य

4) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १५

खालील विधाने विचारात घ्या.

अ ) उरल पर्वत पर्वतामुळे अशिया व युरोपमधील सीमारेषा निश्चित होते.

ब ) माउंट ब्लॅक हे उरल पर्वतातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची सुमारे ४८१० मीटर आहे.

वरीलपैकी कोणते विधान /ने बरोबर आहे?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) दोन्ही बरोबर

४) वरीलपैकी नाही

वरील प्रश्नांची उत्तरं पुढील प्रमाणे –

प्रश्न क्र. १ – ३
प्रश्न क्र. २ – २
प्रश्न क्र. ३ – २
प्रश्न क्र. ४ – ३
प्रश्न क्र. ५ – १
प्रश्न क्र. ६ – २
प्रश्न क्र. ७ – ३
प्रश्न क्र. ८ – १
प्रश्न क्र. ९ – १
प्रश्न क्र. १० – १
प्रश्न क्र. ११ – ४
प्रश्न क्र. १२ – ४
प्रश्न क्र. १३ – ३
प्रश्न क्र. १४ – १
प्रश्न क्र. १५ – १