UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न क्र. १

खालील विधाने लक्षात घ्या.

१) प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची १९५० या साली स्थापना केली.

२) देशातील पहिली सहकारी सूतगिरणी – कोल्हापूर इचलकरंजी ही आहे.

३) धवलक्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन आहेत.

४) संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण परिषदेने २०१२ सहकाराचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते.

वरील कोणते विधान/ने योग्य आहेत?

पर्यायी उत्तरे :

१) १, २ व ३

२) २, ३ व ४

३) १, ३ व ४

४) १, २, ३ व ४

प्रश्न क्र. २

खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सहकारी संस्थेचे नाही?

१) भेदभाव न करता सर्व व्यक्तीनां संस्थेचे सभासदत्व दिले जाते.

२) गुंतवणूक भांडवलीनुसार मताचा हक्क सदस्याला दिला जातो.

३) सहकारी संस्थांचा मूलमंत्र स्वयंसाहाय्यता, लोकशाही, समानता व एकता इत्यादी तत्त्वांना प्रोत्साहन देणे हा आहे.

४) वरीलपैकी सर्व योग्य आहे.

प्रश्न क्र. ३

अयोग्य विधान ओळखा?

अ) सरकारकडून मूलभूत हक्कांवर निर्बंध आणले जाऊ शकतात. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येत नाही.

ब) सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात मूलभूत हक्कांचा उपयोग केला जाऊ शकतो

क) अनुच्छेद २० आणि २१ मध्ये दिलेले मूलभूत हक्क सोडून इतर मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्थगित करता येऊ शकतात.

ड) मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्यासाठी घटनादुरुस्तीची आवश्यकता असते. सामान्य कायद्याद्वारे यात बदल करता येत नाही.

प्रश्न क्र. ४

अ) पृथ्वीच्या सर्वात वरच्या बाह्य घनरूपास शिलावरण असे म्हणतात.

ब) शिलावरणाचा २९ टक्के भाग जमिनीने आणि ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे.

क) शिलावरणाचे सियाल आणि सायमा असे दोन भागात वर्गीकरण केले जाते.

योग्य विधान ओळखा?

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि क

२) फक्त क

३) ब आणि क

४) वरील सर्व

प्रश्न क्र. ५

अ) भारतीय संविधानातील अनुच्छेद २३ ते २४ द्वारे प्रत्येक भारतीय व्यक्तीला शोषणाविरुद्धचा हक्क देण्यात आला आहे.

ब) संविधानातील अनुच्छेद १९ ते २२ द्वारे प्रत्येक भारतीय व्यक्तीला स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आला आहे.

क) भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ ते १८ दरम्यान समानतेच्या हक्काचे वर्णन करण्यात आले आहे.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब

२) ब आणि क

३) फक्त क

४) वरील सर्व

प्रश्न क्र. ६

महाराष्ट्राच्या लोकसंख्ये बाबत पुढे काही विधाने दिलेली आहेत या विधानांचा लक्षपूर्वक अभ्यास करून त्यापैकी योग्य असलेली विधान किंवा विधाने निवडा.

पर्यायी उत्तरे :

१) सन २०११ च्या जनगणनेनुसार, मुंबई शहर या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वांत जास्त आहे.

२) सन १९६१ ते १९७१ दरम्यान वाढीचा सर्वोच्च दर २७.४५ टक्के होता.

३) महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात ८९% सह सर्वाधिक शहरीकरण झाले आहे.

४) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत

प्रश्न क्र. ७

खालील विधाने विचारात घ्या.

१) महाराष्ट्राची व भारताची लोकसंख्या घनता विचारात घेता भारतापेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या घनता ही १७ बिंदूंनी जास्त आहे.

२) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता २०११ च्या जनगणनेनुसार ३६५ पासून ती २००१ च्या जनगणना घनतेपेक्षा ५० बिंदूंनी वाढली आहे.

पुढे दिलेल्या पर्यायातून अयोग्य विधान/ने असणारा पर्याय निवडा.

१) फक्त १

२) फक्त २

३) १ व २ दोन्ही

४) १ व २ दोन्ही नाहीत

प्रश्न क्र. ८

महाराष्ट्राच्या लोकसंख्येबाबत पुढे काही विधाने दिलेली आहेत या विधानांचा लक्षपूर्वक अभ्यास करून त्यापैकी अयोग्य असलेली विधान किंवा विधाने निवडा.

पर्यायी उत्तरे :

१) सन २०११ च्या जनगणनेनुसार, मुंबई शहर या जिल्ह्याची लोकसंख्या साक्षरता सर्वांत जास्त आहे.

२) महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तरात सर्वांत कमी लिंग-गुणोत्तर मुंबई शहर असून ते ८३२ आहे.

३) सन २००१ ते २०११ या दशवार्षिक कालखंडात महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तर ९२९ वरून ९२२ पर्यंत कमी झाले आहे.

४) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत.

प्रश्न क्र. ९

खालील विधाने विचारात घ्या.

१) महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तरात सर्वांत प्रथम क्रमांक १,१२२ सह रत्नागिरी जिल्हा आहे.

२) २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तर दर १००० ला ९२९ आहे, तर राष्ट्रीय स्तरावर हेच प्रमाण ९४३ आहे.

पुढे दिलेल्या पर्यायातून अयोग्य विधान/ने असणारा पर्याय निवडा.

१) फक्त १

२) फक्त २

३) १ व २ दोन्ही

४) १ व २ दोन्ही नाहीत

प्रश्न क्र. १०

योग्य जोडी लावा?

अ ) भोसले – १) राजापूर घाटचा तह

ब) सिंधिया – २) देवगावचा तह

क) होळकर – ३) सुर्जी अर्जन गावचा तह

पर्यायी उत्तरे :

१) अ – २, ब- ३, क-१

२) अ – १, ब- ३, क-२

३) अ – ३, ब- २, क-१

४) अ – १, ब- २, क-३

प्रश्न क्र. ११

फझल अली आयोगाबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

अ) फझल अली आयोगाने १९५५ मध्ये आपला अहवाल सादर केला.

ब) के. एस. पणिकर आणि एच. एन कुंजरू हे या आयोगाचे सदस्य होते.

क) आयोगाने राज्यांच्या पुनर्रचनेसाठी भाषा हा निकष अमान्य केला.

ड) फझल अली आयोगाने ‘एक भाषा एक प्रांत’ या तत्वाला मान्यता दिली नाही.

वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे….

प्रश्न क्र. १ -४
प्रश्न क्र. २ -२
प्रश्न क्र. ३-१
प्रश्न क्र. ४-४
प्रश्न क्र. ५-४
प्रश्न क्र. ६-२
प्रश्न क्र. ७-१
प्रश्न क्र. ८-३
प्रश्न क्र. ९-३
प्रश्न क्र. १०-१
प्रश्न क्र. ११-३