UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर शनिवार-रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात. या आठवड्यातील प्रश्नमंजुषा पुढील प्रमाणे :

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रश्न क्र. १

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) डिसेंबर १८८५ मध्ये काँग्रेसचे पहिले अधिवेशन बॉम्बेतील तेजपाल संस्कृत महाविद्यालयात पार पडले.

ब) काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. या अधिवेशनात देशभरातून ७२ प्रतिनिधी हजर होते.

क) ब्रिटिश सरकार आणि भारतातील आंदोलकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आणि संविधानिक सुधारणांची मागणी करणे हे काँग्रेसचे प्राथमिक उद्देश होते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरील सर्व

प्रश्न क्र. २

१८७५ साली बाबू शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली होती. पुढे याच संघटनेचे नाव बदलून……………… करण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

१) ब्रिटिश इंडियन असोसिएशन

२) इंडियन (नॅशनल) असोसिएशन

३) मद्रास महाजन सभा, १८८४

४) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन

प्रश्न क्र. ३

स्टँपच्या संक्रमण क्षेत्रातील हवामानात खालीलपैकी कोणते राज्य समाविष्ट आहे?

पर्यायी उत्तरे :

१) उत्तरप्रदेश आणि बिहार
२) राजस्थान आणि पंजाब
३) आंध्र प्रदेश
४) जम्मू काश्मीर आणि पंजाब

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत :

अ) इंडियन असोसिएशन हा भारतातील राष्ट्रवादी गट होता, ज्याने भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुकूलता दिली.

ब) इंडियन असोसिएशनची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी केली होती.

क ) इंडियन असोसिएशन 1884 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये विलीन झाली

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब
२) क आणि अ
३) ब आणि क
४) फक्त क

प्रश्न क्र. ५

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) १९२२ मध्ये, महात्मा गांधींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले.

ब) बेळगाव अधिवेशन हे महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसचे एकमेव अधिवेशन होते.

क) १९२५ मध्ये सरोजिनी नायडू काँग्रेसच्या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) क आणि अ
४) फक्क अ

प्रश्न क्र. ६

सुनामी हा कोणत्या भाषेतील शब्द आहे?

पर्यायी उत्तरे :

१) लॅटिन
२) इंग्रजी
३) फ्रेंच
४) जपानी

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – १६

प्रश्न क्र. ७

दादाभाई नौरोजी यांच्यासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे :

अ) दादाभाई नौरोजी यांना भारताचा ‘ग्रँड ओल्डमॅन’ म्हणून ओळखलं जात असे.

ब) दादाभाई नौरोजी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

क) दादाभाई नौरोजी हे चार वेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

ड) दादाभाई नौरोजी हे यूके हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून गेलेले पहिले संसद सदस्य होते.

प्रश्न क्र. ८

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) राज्यघटनेचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रपतींना ज्या प्रक्रियेद्वारे पदावरून हटवले जाते, त्याला ‘महाभियोग प्रक्रिया’ असे म्हणतात. संविधानात ‘राज्यघटनेचे उल्लंघन’ या शब्दाचा अर्थ नमूद केलेला नाही.

ब) संसदेच्या कोणत्याही सभागृहात महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.

क) सभागृहात मांडलेल्या या प्रस्तावावर एक-चतुर्थांश सदस्यांनी सह्या करणे आणि हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी राष्ट्र्पतींना पूर्वसूचना देण्याची आवश्यक नसते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) क आणि अ
३) ब आणि क
४) फक्त अ

प्रश्न क्र. ९

खाली पैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) राष्ट्रपती भारताचे ॲटर्नी जनरल, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG), मुख्य निवडणूक आयुक्त, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य व राज्यपाल, भारतीय वित्त आयोगाचे अध्यक्ष यांची नियुक्ती करतात.

ब) अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांची स्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रपती आयोग नेमू शकतात.

क) राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक बोलावू शकतात.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) फक्त ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १०

खालील पैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) घटनेच्या भाग V मधील अनुच्छेद ५० ते ७५ केंद्रीय कार्यकारिणीशी संबंधित आहेत.

ब) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री परिषद आणि भारताचे महान्यायवादी यांचा समावेश होतो.

क) राष्ट्रपती हे भारतीय राज्याचे प्रमुख असतात.

पर्यायी उत्तरे :

१) ब आणि क
२) अ आणि क
३) फक्त अ
४) वरील सर्व

प्रश्न क्र. ११

पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे सुनामी उद्भवत नाही?

पर्यायी उत्तरे :

१) भूस्खलन
२) चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती
३) ज्वालामुखीचा उद्रेक
४) उल्कापात

प्रश्न क्र. १२

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) धन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची परवानगी घेणे आवश्यक असते.

ब) राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात.

क) आंतरराष्ट्रीय करार हे राष्ट्रपतींच्या नावाने होत असतात. मात्र, त्यासाठी संसदेची परवानगी आवश्यक असते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) क आणि अ
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १३

खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा :

अ) सामाजिक शेअर बाजार ही संकल्पना सर्वप्रथम २००३ मध्ये ब्राझीलमध्ये अस्तित्वात आली.

ब) भारतामध्ये सन २०१९-२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारने सेबीद्वारे सामाजिक शेअर बाजार स्थापन करण्याची घोषणा केली.

क) २०२२ मध्ये सामाजिक शेअर बाजाराबद्दल अधिक तज्ज्ञांचा सल्ला आणि स्पष्टता मिळवण्यासाठी नाबार्डचे माजी अध्यक्ष हर्ष मानवाला यांच्या अंतर्गत पुन्हा एका कार्यगटाची स्थापना करण्यात आली.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि क
२) ब आणि क
३) फक्त क
४) वरील सर्व

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – १५

प्रश्न क्र. १४

खालील पैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) भारतामध्ये १९९८ मध्ये प्रथमच इन्फ्लेशन इंडेक्स्ड बाँडची विक्री करण्यात आली. याला ‘कॅपिटल इंडेक्स्ड बाँड’ असे नाव देण्यात आले होते.

ब) सन २०१३-१४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये इन्फ्लेशन इंडेक्स बाँडचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

क) सन २०१३-१४ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारचे दोन बाँड सादर केले.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि क
२) ब आणि अ
३) फक्त ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १५

इन्फ्लेशन इंडेक्स्ड बाँडसंदर्भात पुढील पैकी कोणते विधान/ने योग्य आहे?

अ) कोणतीही सामान्य व्यक्ती या बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतो.
हे बाँड अशाप्रकारे वितरित केले जातात की, संस्थात्मक गुंतवणूकदारांना ८० टक्के रोखे आणि किरकोळ गुंतवणूकदारांना २० टक्के रोखे प्राप्त होतात.

ब ) या बाँडचा थेट रिझर्व्ह बँकेकडून लिलाव केला जातो आणि हा पैसा सरकारला मिळतो.

क) सामान्य व्यक्तीचा विचार केला असता किमान ५००० ते कमाल १० लाख रुपये पर्यंतची रक्कम यामध्ये गुंतवणूक करू शकतो; तर एखादी संस्था यामध्ये २५ लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवणूक करू शकतो.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) क आणि अ
३) फक्त अ
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १६

खालीलपैकी कोणते कमाल तीव्रतेचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते?

पर्यायी उत्तरे :

१) हिमालय क्षेत्र
२) पश्चिम घाट क्षेत्र
३) इंडो गंगा क्षेत्र
४) दविपकल्पिय क्षेत्र

प्रश्न क्र. १७

गुजरात मधील भुज भूकंप कोणत्या वर्षी घडला?

पर्यायी उत्तरे :

१) १९९९
२) २०००
३) २००४
४) २००६

वरील प्रश्नांची उत्तरं पुढील प्रमाणे :

प्रश्न क्र. १- ४
प्रश्न क्र. २- २
प्रश्न क्र. ३- १
प्रश्न क्र. ४- १
प्रश्न क्र. ५- २
प्रश्न क्र. ६- ४
प्रश्न क्र. ७ -३
प्रश्न क्र. ८- १
प्रश्न क्र. ९- ४
प्रश्न क्र. १०-१
प्रश्न क्र. ११- २
प्रश्न क्र. १२- ४
प्रश्न क्र. १३- ३
प्रश्न क्र. १४- ४
प्रश्न क्र. १५- ४
प्रश्न क्र. १६- १
प्रश्न क्र. १७- ३

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc loksatta test series history ecomics polity geography evs question set 17 spb