Loksatta Test Series : सराव प्रश्न पुढील प्रमाणे
प्रश्न क्र. १
योग्य विधाने ओळखा ?
अ ) अर्कावती नदीचा उगम कर्नाटक मधील चिकबल्लापुर जिल्ह्यातील नंदी टेकड्यांमध्ये झालेला आहे.
ब ) अर्कावती नदीची एकूण लांबी 190 किलोमीटर आहे.
क ) तिच्या प्रमुख उपनद्या मध्ये मोयार कुंदा कोरंगपल्लम् कूनूर सिरुवनी पेरिङ्गपलम् नद्याचा समावेश होतो.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि क योग्य
२) ब आणि क योग्य
३) अ आणि ब योग्य
४) वरीलपैकी सर्व
प्रश्न क्र. २
योग्य विधान/ने ओळखा ?
अ ) गाविलगड टेकड्यातील सर्वात उंच शिखर वैराट असून या शिखराची उंची ११७७ मीटर आहे.
ब ) धुळे जिल्ह्यातील तोरणामाळ पठार सातपुडा पर्वत रांगेत स्थित असून याची सरासरी उंची सुमारे १००० मीटर आहे.
क ) राजपीपला टेकड्या नर्मदा व तापी या दोन नद्यांची खोरी एकमेकापासून वेगळी झालेली आहे.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब योग्य
२) अ आणि क योग्य
३) ब आणि क योग्य
४) वरीलपैकी सर्व
प्रश्न क्र. ३
खालीलपैकी कोणती विधान/ने चुकीची आहेत.
अ ) सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगेला समांतर असणारी पर्वतरांग आहे.
ब ) सातपुडा पर्वतरांग दख्खनच्या पठाराला उत्तरेकडील मैदानापासून वेगळे करते.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब दोन्ही
४) वरीलपैकी नाही
प्रश्न क्र. ४
योग्य विधान/ने निवडा ?
अ ) चुनखडीचा सर्वाधिक वापर सिमेंट उद्योगात होतो.
ब ) महाराष्ट्रात राज्यात चुनखडीचे सर्वाधिक साठे आढळत.
क ) चुनखडीचा वापर रासायनिक उद्योग खत आणि कागद निर्मितीसाठी केला जातो.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि क
४)वरीलपैकी सर्व
प्रश्न क्र. ५
खालील विधानावर विचार करा ?
अ ) जगामध्ये सर्वाधिक अभ्रकाचे सर्वाधिक उत्पादन भारतात घेतले जाते.
ब ) बिहार व झारखंड राज्यातील गया, हजारीबाग, मुंगेर व भागलपूर भागांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.
क ) भारतात आंध्रप्रदेश, राजस्थान, झारखंड व बिहार राज्य अभ्रकाबाबत अग्रेसर आहेत.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब योग्य
२) अ आणि क योग्य
३) ब आणि क योग्य
४) वरीलपैकी सर्व
प्रश्न क्र. ६
योग्य विधान/ने निवडा ?
अ ) बुध ग्रहाचा परिवलन काल ५८ दिवस असून परिभ्रमण काल ८८ दिवसांचा आहे.
ब ) मारिनेर १० हे यान सर्वात प्रथम बुध या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आले होते.
क ) बुध ग्रहाला तीन उपग्रह आहेत.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब योग्य
२) अ आणि क योग्य
३) ब आणि क योग्य
४) वरीलपैकी सर्व बरोबर
प्रश्न क्र. ७
योग्य विधाने ओळखा ?
अ सूर्यमालेतील शेवटचा व सूर्यापासून सर्वात दूर असणारा ग्रह आहे.
ब ) या ग्रहाचा परिवलन काल २० तास असून परिभ्रमण काल ८० वर्षे इतका आहे.
क ) या ग्रहाचा शोध अंडम आणि लेवेरीअर यांनी १८४६ मध्ये मॅथेमॅटिकल कल्यकुलेशन द्वारे लावला.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब योग्य
२) अ आणि क योग्य
३) ब आणि क योग्य
४) वरीलपैकी सर्व
प्रश्न क्र. ८
खालील सजीवांचा विचार करा.
अ) जीवाणू
ब) बुरशी
क) पुष्पीय वनस्पती
वरीलपैकी कोणत्या सजीवांच्या काही प्रजाती जैवकीटकनाशके (Biopesticides) म्हणून वापरल्या जातात? योग्य पर्याय निवडा
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) अ व क
३) ब व क
४) अ, ब आणि क
प्रश्न क्र. ९
योग्य विधान/ने ओळखा?
अ) हैदरअलीने इ.स. १७६५ मध्ये आधुनिक म्हैसूरची स्थापना केली.
ब) ब्रिटिश आणि म्हैसूर यांच्यात तीन युद्धे झाली. ‘ॲंग्लो-म्हैसूर युद्ध’ या नावाने ओळखली जातात.
क) इ.स. १७६९ मध्ये झालेल्या मद्रासच्या तहाने पहिल्या ‘ॲंग्लो-म्हैसूर’ युद्धाचा शेवट झाला.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) अ आणि क
३) ब आणि क
४) फक्त क
प्रश्न क्र. १०
ओझोन अवक्षय घडविणाऱ्या क्लोरोप-लुरो कार्बनचा वापर कशासाठी होतो?
अ) प्लास्टिक फोम उत्पादन
ब) ट्यूबलेस टायर उत्पादन
क) काही इलेक्ट्रॉनिक्स भाग स्वच्छ करण्यासाठी
ड) एअरोसोल कॅन्समध्ये प्रेशरायिझग एजंट म्हणून
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा
पर्यायी उत्तरे :
अ) अ आणि क
ब) फक्त ब
क) अ, क आणि ड
ड) वरीलपैकी सर्व
प्रश्न क्र. ११
भारत हा रामसर कराराचा सदस्य आहे. भारताने अनेक प्रदेश रामसर यादीत समाविष्ट केलेले आहेत. या प्रदेशांच्या योग्य देखरेखीसंदर्भात खालीलपैकी
सर्वात योग्य विधान कोणते?
पर्यायी उत्तरे :
अ) रामसर क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद करणे.
ब) परिस्थितिकीय दृष्टिकोनातून या क्षेत्रांचे संवर्धन करणे व केवळ पर्यटन आणि पुनर्निर्माणास परवानगी
क) काही काळाकरिता प्रत्येक रामसर क्षेत्राचे विशिष्ट निकषांच्या आधारे विशिष्ट काळासाठी परिस्थितिकीय दृष्टिकोनातून संवर्धन करणे आणि भावी पिढीला त्याचा शाश्वत वापर करू देणे.
ड) परिस्थितीकीय दृष्टिकोनातून सर्व रामसर क्षेत्रांचे संवर्धन आणि त्याचबरोरबर त्यांचा शाश्वत वापर.
प्रश्न क्र. १२
योग्य विधान/ने ओळखा ?
अ) शिवाजी महाराजांनंतर गनिमी काव्याचा सर्वाधिक वापर कोणी केला असेल तर तो पहिले बाजीराव यांनी केला.
ब) मीर जाफरने १४८ ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवले आणि त्यांची हत्या केली. याच घटनेला इतिहासात ‘पटना हत्याकांड’ या नावाने ओळखले जाते.
क) बक्सरचे युद्ध इ.स. १७६४ मध्ये झाले.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ बरोबर
२) अ आणि क बरोबर
३) फक्त ब बरोबर
४) वरील सर्व बरोबर
प्रश्न क्र. १३
मुघल बादशहा शाहआलम द्वितीय आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यात १२ ऑगस्ट १७६४ रोजी एक तह झाला. हा तह कोणत्या नावाने ओळखळा जातो?
अ) खेडा तह
ब) अलाहाबाद तह
क) बिहार तह
ड) कानपूर तह
प्रश्न क्र. १४
योग्य विधान/ने ओळखा?
अ) हैदरअलीने इ.स. १७६५ मध्ये आधुनिक म्हैसूरची स्थापना केली.
ब) ब्रिटिश आणि म्हैसूर यांच्यात तीन युद्धे झाली. ‘ॲंग्लो-म्हैसूर युद्ध’ या नावाने ओळखली जातात.
क) इ.स. १७६९ मध्ये झालेल्या मद्रासच्या तहाने पहिल्या ‘ॲंग्लो-म्हैसूर’ युद्धाचा शेवट झाला.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) अ आणि क
३) ब आणि क
४) फक्त क
प्रश्न क्र. १५
अयोग्य विधान ओळखा?
अ) बाळाजी बाजीराव यांच्या काळात पेशवेपद वंशपरंपरागत झाले.
ब) बाळाजी बाजीराव यांना नानासाहेब या नावानेही ओळखलं जाते.
क) बाळाजी बाजीरावांनी आपली राजधानी पुणे येथे हलवली.
ड) इ.स. १७६४ मध्ये बाळाजी बाजीराव यांचे निधन झाले.
प्रश्न क्र. १६
योग्य जोडी लावा?
अ ) भोसले – १) राजापूर घाटचा तह
ब) सिंधिया – २) देवगावचा तह
क) होळकर – ३) सुर्जी अर्जन गावचा तह
पर्यायी उत्तरे :
१) अ – २, ब- ३, क-१
२) अ – १, ब- ३, क-२
३) अ – ३, ब- २, क-१
४) अ – १, ब- २, क-३
प्रश्न क्र. १७
फझल अली आयोगाबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
अ) फझल अली आयोगाने १९५५ मध्ये आपला अहवाल सादर केला.
ब) के. एस. पणिकर आणि एच. एन कुंजरू हे या आयोगाचे सदस्य होते.
क) आयोगाने राज्यांच्या पुनर्रचनेसाठी भाषा हा निकष अमान्य केला.
ड) फझल अली आयोगाने ‘एक भाषा एक प्रांत’ या तत्वाला मान्यता दिली नाही.
वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे
प्रश्न क्र. १- ३
प्रश्न क्र. २-१
प्रश्न क्र. ३-४
प्रश्न क्र. ४-३
प्रश्न क्र. ५-४
प्रश्न क्र. ६-१
प्रश्न क्र. ७-२
प्रश्न क्र. ८- ४
प्रश्न क्र. ९- ४
प्रश्न क्र. १०- ड
प्रश्न क्र. ११- २
प्रश्न क्र. १२– २
प्रश्न क्र. १३– २
प्रश्न क्र. १४– ४
प्रश्न क्र. १५– ४
प्रश्न क्र. १६– १
प्रश्न क्र. १७ – ३