Questions And Answers Set : सराव प्रश्न पुढील प्रमाणे..

प्रश्न क्र. १

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

अ) भूकंपाच्या प्राथमिक लहरी घन आणि द्रव्य माध्यमातून प्रवास करतात.

ब) भूकंपाच्या दुय्यम लहरी द्रव्य माध्यमातून प्रवास करीत नाहीत.

क) भूकंपाच्या प्राथमिक लहरींचा वेग दुय्यम लहरींपेक्षा १.७ पटपेक्षा जास्त आहे.

पर्याय :

१) फक्त अ आणि ब

२) फक्त ब आणि क

३) फक्त अ आणि क

४) वरील सर्व बरोबर

प्रश्न क्र. २

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

पर्याय :

अ) भाबर : शिवालिक पर्वताच्या पायथ्याजवळील जाडीभरडी वाळू दगडगोट्यांचा भाग

ब) तराई : दलदलीचा प्रदेश

क) भांगर : नवीन गाळाचे मैदान

ड) खादर : सखल प्रदेशातील नवीन गाळाचे मैदान

प्रश्न क्र. ३

प्रसिद्ध काश्मिर खोरे म्हणजे…या दोन पर्वतरांगेतील खोरे होय.

पर्याय :

१ ) झास्कर व लडाक रांगा

२ ) काराकोरम व लडाक डोंगररांगा

३ ) पीरपंजाल व झास्कर डोंगररांगा

४ ) यापैकी नाही

प्रश्न क्र. ४

पूर्व घाटातील टेकड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा?

पर्याय :

१ ) नल्लामल्ला, पालकोंडा, जावडी, शेवराई

२ ) शेवराई, जावडी, पालकोंड, नल्लामल्ला

३ ) शेवराई, जावडी, नल्लामल्ला, पालकोंडा

४ ) नल्लामल्ला, शेवराई, जावडी, पालकोंडा

प्रश्न क्र. ५

केरळ हे राज्य स्त्रियांना सर्वाधिक अनुकूल असे स्त्री- पुरुष प्रमाण दर्शवते तर…. हा केंद्रशासित प्रदेश स्त्रियांना सर्वाधिक प्रतिकूल असे स्त्री-पुरुष प्रमाण दर्शवतो?

पर्याय :

१ ) दीव-दमण

२) लक्षद्वीप

३) पुदुच्चेरी

४) दिल्ली

प्रश्न क्र. ६

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) केरळच्या किनारपट्टीवर दैनिक तापमान कक्षा कमी आढळून येते.

ब) थाग-ला, निती आणि लिपु लेक या खिंडी बृहद हिमालयातील सिक्कीम या राज्यात आढळून येतात.

पर्याय :

१) विधान अ बरोबर आहे.

२) विधान अ व ब बरोबर आहे.

३) विधान ब बरोबर आहे.

४) विधान अ व ब चूक आहे.

प्रश्न क्र. ७

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) लेसर हिमालय व शिवालिक यांच्या दरम्यानचा सपाट कमी रुंदीचा वाळू गोटे यांसारख्या भरणाने व्याप्त प्रदेश भांगर म्हणून ओळखला जातो.

ब) अन्नाईमुडी हे दक्षिण भारतातील किंबहुना द्वीपकल्पीय भारतातील सर्वोच्च शिखर पश्चिम घाटाच्या अन्नामलाई या श्रेणीमध्ये वसलेले आहे.

पर्याय :

१ ) विधान अ बरोबर आहे.

२ ) विधान अ व ब बरोबर आहे.

३) विधान ब बरोबर आहे.

4) विधान अ व ब चूक आहे.

प्रश्न क्र. ८

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांमधील गुरुशिखर हे सर्वोच्च शिखर आहे.

ब) सायलेंट व्हॅली हा विवादास्पद प्रकल्प केरळ या राज्यात उभारणे नियोजित होते.

पर्याय :

१) विधान अ बरोबर आहे.

२) विधान अ व ब बरोबर आहे.

३) विधान ब बरोबर आहे.

४) विधान अ व ब चूक आहे.

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणता पर्याय पश्चिम घाटाविषयी अयोग्य आहे.

१) पश्चिम घाट तापी नदीच्या मुखापासून दक्षिणेला केप केमोरिन म्हणजे कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे.

२) उत्तरेकडून दक्षिणेकडे एकूण लांबी सुमारे १६०० किमी आहे.

३) द्विपकल्पीय भारतीय पठाराची पश्चिम कडा म्हणजेच पश्चिम घाट होय.

४) महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्या. महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्यांच्या प्रवाहामुळे पश्चिम घाट विखंडित झालेला आहे.

प्रश्न क्र. १०

धुपगड खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे?

१) सातपुडा

२) निलगिरी

३) सह्याद्री

४) अरवली

प्रश्न क्र. ११

भारतातील एक वालुकामय आणि खारपड क्षेत्र एका वन्य प्राणीप्रजातीला अधिवास पुरवते. या प्राण्यास त्या क्षेत्रात कुठलाही नैसर्गिक भक्षक किंवा शत्रू
नाही. परंतु अधिवासाच्या होणाऱ्या ऱ्हासामुळे हा प्राणी संकटग्रस्त बनला आहे. खालीलपैकी हा प्राणी कोणता असू शकतो.

पर्याय :

अ) भारतीय वन्य म्हैस

ब) भारतीय वन्य बोअर

क) भारतीय वन्य गाढव

ड) भारतीय गॅझेल (कुरंग)

प्रश्न क्र. १२

खालीलपैकी कोणती इन-सितू संवर्धन पद्धती नाही?

पर्याय :

अ) जीवावरण राखीव क्षेत्र

ब) वनस्पतीय उद्यान

क) राष्ट्रीय उद्यान

ड) वन्यजीव अभयारण्य

प्रश्न क्र. १३

खारफुटीची वने किनारपटटीय आपत्तींपासून संरक्षण करणाऱ्या खात्रीलायक सुरक्षा भित्तिका ठरू शकतात, याची जाणीव लोकांना 2004 मधील सुनामी वादळामुळे झाली. खारफुटीची वने कशाप्रकारे सुरक्षा भित्तिका म्हणून कार्य करतात?

पर्याय :

अ) खारफुटी वनांतील दलदली क्षेत्रे, ज्यांमध्ये लोक राहत नाहीत किंवा कार्य करत नाहीत, मानवी वसाहतींना समुद्रापासून अलग करतात.

ब) घट्ट मुळांमध्ये या वनांतील वृक्ष वादळ किंवा लाटांनी उन्मळून पडत नाहीत.

क) खारफुटीच्या वनांतील झाडे उंच आणि घनदाट असल्याने वादळ किंवा सुनामीदरम्यान लोकांना उत्तम निवारा पुरवितात.

ड) खारफुटीची वने लोकांना ज्याची गरज असते अशा अन्न आणि औषधे या दोन्हीही गोष्टी नैसर्गिक आपत्ती दरम्यान पुरवितात.

प्रश्न क्र. १४

निसर्ग व नैसर्गिक संसाधने संवर्धन संघ ((IUCN-International Union for Conservation of Nature & Natural Resources) द्वारा प्रकाशित रेड डाटा बुक्समध्ये कशाचा समावेश असतो?

अ) जैवविविधता हॉटस्पॉट्समधील स्थानविशिष्ट (Emdemic) वनस्पती आणि प्राणी प्रजाती.

ब) संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी प्रजाती.

क) निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी विविध देशांतील संरक्षित क्षेत्रे. योग्य पर्याय निवडा.

पर्याय :

१) अ व ब

२) फक्त ब

३) ब व क

४) फक्त क

प्रश्न क्र. १५

खालील सजीवांचा विचार करा.

अ) जीवाणू

ब) बुरशी

क) पुष्पीय वनस्पती

वरीलपैकी कोणत्या सजीवांच्या काही प्रजाती जैवकीटकनाशके (Biopesticides) म्हणून वापरल्या जातात? योग्य पर्याय निवडा

पर्याय :

१) फक्त अ

२) अ व क

३) ब व क

४) अ, ब आणि क

प्रश्नसंच ५ ची उत्तरं खालील प्रमाणे…

प्रश्न क्र. १- ४
प्रश्न क्र. २- क
प्रश्न क्र. ३- ३
प्रश्न क्र. ४- १
प्रश्न क्र. ५- १
प्रश्न क्र. ६- १
प्रश्न क्र. ७- ३
प्रश्न क्र. ८- २
प्रश्न क्र. ९- ४
प्रश्न क्र. १०- १
प्रश्न क्र. ११- क
प्रश्न क्र. १२- ब
प्रश्न क्र. १३- अ
प्रश्न क्र. १४- २
प्रश्न क्र. १५- ४