प्रश्न क्र. 1

खालील कोणत्या समूहातील प्राणी धोकाग्रस्त (Endangered) बनलेले आहेत?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्याय :

अ) माळढोक पक्षी, कस्तुरी हरीण, रेड पांडा, वन्य गाढव

ब) काश्मिर स्टॅग, चितळ, निलबल, माळढोक पक्षी

क) हिम चित्ता, स्वॅम्प हरिण, ऱ्हिस माकड, सारस (बगळा)

ड) लायन टेल्ड वानर, निलबल, हनुमान माकड, चितळ

प्रश्न क्र. २

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) ऑप्टिकल फायबर हे विकिकरण या तत्त्वावर कार्य करते.

ब) समुद्रसपाटीपासून उंच राहणारे लोक उकळता चहा पितात, कारण वातावरणाचा दाब कमी असल्याने चहाचा उत्कलनिबदू कमी असतो.

पर्याय :

1) अ विधान बरोबर आहे.

2) ब विधान बरोबर आहे.

3) अ व ब विधान चूक आहे.

4) अ व ब विधान बरोबर आहे.

प्रश्न क्र. ३

निकट दृष्टीचा मनुष्य –

पर्याय :

अ) दूरच्या व जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकतो.

ब) दूरच्या व जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही.

क) दूरच्या वस्तू पाहू शकतो, परंतु जवळच्या वस्तू पाहू शकत नाही.

ड) यापैकी नाही.

प्रश्न क्र. ४

बर्फ वितळताना खालीलपैकी काय घडते?

पर्याय :

अ) वितळताना त्याचे आकारमान व तापमान वाढते.

ब) वितळताना त्याचे आकारमान व तापमान कमी होते.

क) वितळताना त्याचे आकारमान कमी होते व तापमान कायम राहते.

ड) वितळताना त्याचे आकारमान कायम राहते व
तापमान कमी राहते.

प्रश्न क्र. ५

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी द्रवाचा चटकन पसरण्याचा गुणधर्म उपयोगी पडतो.

ब) फळे कापताना कापायच्या सुरीला धार लावणे आवश्यक असते, कारण सुरीवर लावलेले बळ अधिक क्षेत्रफळावर कार्य करते.

पर्याय :

1) अ विधान बरोबर आहे.

2) ब विधान बरोबर आहे.

3) अ व ब विधान चूक आहे.

4) अ व ब विधान बरोबर आहे.

प्रश्न क्र. ६

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) कॅरम खेळण्यापूर्वी कॅरम बोर्डवर बोरिक पावडर टाकतात, कारण त्यामुळे कॅरम बोर्ड स्ट्राइकर व सोंगटय़ा यांच्या मधील घर्षण कमीतकमी राखण्यात येते.

ब) बल जेव्हा बलगाडी ओढतो तेव्हा गाडी पुढे जाते, कारण बलाकडून बलगाडीवर बल प्रयुक्त होते.

पर्याय :

१) अ विधान बरोबर आहे.

२) ब विधान बरोबर आहे.

३) अ व ब विधान चूक आहे.

४) अ व ब विधान बरोबर आहे.

प्रश्न क्र. ७

दोलकाची लांबी कमी केल्यास दोलनकाल –

पर्याय :

१) कमी होतो.

२) जास्त होतो.

३) तेवढाच राहतो.

4) दुप्पट होतो.

प्रश्न क्र. 8

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अ) सी.एन.जी.चा वापर वाहन इंधन म्हणून केला जातो.

ब) नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट फरिदाबाद येथे आहे.

पर्याय :

1) अ विधान चूक आहे.

2) ब विधान चूक आहे.

3) अ व ब विधान चूक आहे.

4) अ व ब विधान बरोबर आहे.

प्रश्न क्र. ९

भारतात पेट्रोलमध्ये किती प्रमाणात इथेनॉल मिसळण्याची परवानगी देण्यात आली आहे?

पर्याय :

1) ५%

2) १०%

3) १२%

4) १५%

प्रश्न क्र. १०

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) अणुबॉम्बचे कार्य अनियंत्रित शृंखला अभिक्रियेद्वारे चालते.

ब) अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईड किंवा जडपाणी यांचा संचलक म्हणून वापर करतात.

पर्याय :

1) अ विधान बरोबर आहे.

2) ब विधान बरोबर आहे.

3) अ व ब विधान बरोबर आहे.

4) अ व ब विधान चूक आहे.

प्रश्न क्र. ११

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) तामिळनाडूमध्ये कुडांकुलम येथे स्थापन केली जात असलेली अणुभट्टी ही ‘प्रेशराइज्ड वॉटर रिअ‍ॅक्टर’ या प्रकारची आहे.

ब) फास्ट ब्रिडर रिअ‍ॅक्टरमध्ये इंधन म्हणून प्ल्युटोनियम – २३९ तर शीतक म्हणून द्रवरूप सोडियम वापरले जाते.

पर्याय :

१) अ विधान बरोबर आहे.

२) ब विधान बरोबर आहे.

३) अ व ब विधान बरोबर आहे.

४) अ व ब विधान चूक आहे.

प्रश्न क्र. १२

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

पर्याय :

१) अणुशक्ती आयोगाची स्थापना– १९४८

२) अणुऊर्जा खात्याची स्थापना – १९५४

३) न्यूक्लिअर फ्युअल कॉम्प्लेक्स – हैदराबाद

४) हायड्रोजन बॉम्ब- केंद्रीय विखंडनावर आधारित

प्रश्न क्र. १३

‘इन्सॅट’ उपग्रह कोणत्या कक्षेत भम्रण करतात?

पर्याय :

१) अंडाकृती व विषववृत्तीय

२) वर्तुळाकार व विषववृत्तीय

३) अंडाकृती व ध्रुवीय

४) वर्तुळाकार व ध्रुवीय

प्रश्न क्र. १४

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) ‘आयआरएस’ उपग्रह हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० ते १२०० कि.मी. एवढ्या अंतरावर सोडले जातात.

ब) ‘इन्सॅट’ हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३६ हजार कि. मी. अंतरावर सोडले जातात.

पर्याय :

१) अ विधान बरोबर आहे.

२) ब विधान बरोबर आहे.

३) अ व ब विधान बरोबर आहे.

४) अ व ब विधान चूक आहे.

प्रश्न क्र. १५

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

पर्याय :

१) पिनाक – रॉकेट प्रेक्षपक

२) अर्जुन – लढाऊ रणगाडा

३) लक्ष्य – वैमानिकरहित विमान

४) सारथ – कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र

प्रश्नसंच ६ ची उत्तरं पुढीलप्रमाणे….

प्रश्न क्र. १ – ब
प्रश्न क्र. २- १
प्रश्न क्र. ३- ड
प्रश्न क्र. ४- क
प्रश्न क्र. ५ – ३
प्रश्न क्र. ६ – १
प्रश्न क्र. ७ – १
प्रश्न क्र. ८ – ४
प्रश्न क्र. ९ – १
प्रश्न क्र. १० – ३
प्रश्न क्र. ११ – ३
प्रश्न क्र. १२- ४
प्रश्न क्र. १३ – २
प्रश्न क्र. १४- ३
प्रश्न क्र. १५- ४

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc loksatta test series history polity geography ecomics question set 6 spb
Show comments