UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न क्र. १

भारताच्या भूगर्भ रचानेबद्दल योग्य विधान निवडा.

१) भारतातली द्रविड रॉक सिस्टम पॅलेओझोइक काळातील आहे.

२) भारतातील सर्वोत्कृष्ट विकसित सागरी प्रणालींपैकी द्रविड रॉक सिस्टम आहे.

३) जुरासिक खडक प्रणाली त्याच्या निर्मिती दरम्यान अनेक हवामान बदल दर्शवते.

४) वरील सर्व

प्रश्न क्र. २

डेक्कन ट्रॅप बद्दल चुकीचे विधान निवडा.

१) ज्वालामुखीच्या उद्रेकाने द्वीपकल्पीय भारताचा एक विस्तीर्ण भाग व्यापून टाकला, त्याला डेक्कन ट्रॅप असे म्हणतात.

२) तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये डेक्कन ट्रॅप आढळतो.

३) प्रामुख्याने कच्छ, सौराष्ट्र, महाराष्ट्र, माळवा पठार आणि उत्तर कर्नाटकचा भागात डेक्कन ट्रॅप आढळतो.

४) वरील सर्व योग्य

प्रश्न क्र. ३

भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात पुढे काही विधाने दिलेली आहेत त्यापैकी बिनचूक असलेले विधान निवडा.

१) एकल हस्तांतरणीय मताद्वारे समानुपातिक प्रतिनिधित्वाच्या प्रणालीनुसार (Proportional representation by single transferable vote), निर्वाचक मंडळाद्वारे भारतातील राष्ट्रपतीची निवड होते.

२) भारताचा राष्ट्रपती हा लोकांचा प्रतिनिधी असून तो प्रत्यक्षपणे निवडला जातो.

३) कलम ६१ नुसार राष्ट्रपती वर महाभियोग चालवला जातो.

४) ज्या तारखेला राष्ट्रपती निवडून येतील त्या दिवसापासून पदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १

२) फक्त १ व ३

३) फक्त २ व ४

४) सर्व १, २, ३ व ४

प्रश्न क्र. ४

खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

१) राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार घटनेच्या कलम ५३ मध्ये निहित आहे.

२) राष्ट्रपतीला कलम ७२ नुसार दयेचा अधिकार घटनेने प्रदान केलेला आहे.

३) राष्ट्रपतीला कलम २१३ नुसार अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे.

४) वरीलपैकी सर्व योग्य.

प्रश्न क्र. ५

पर्वतीय शेळी ( निलगिरी तहर ) संदर्भात खालीलपैकी किती विधानं योग्य आहेत?

१) हा प्राणी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे असुरक्षित प्रजाती म्हणून वर्गीकृत केला आहे.

२) हा प्राणी भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील अनुसूची I मध्ये सूचीबद्ध आहे.

३) हा प्राणी मुख्यता पश्चिम घाटात आढळतो.

४) या प्राण्याला स्थानिक भाषेत वैराडू असं म्हणतात.

पर्यायी उत्तरे :

अ) फक्त १

ब) फक्त २

क) फक्त ३

ड) वरील सर्व

प्रश्न क्र. ६

आशिया खंडातील वैशिष्ट्यांबद्दल खाली काही विधाने दिलेली आहेत. या विधानांपैकी अयोग्य असलेले विधान ओळखा.

१) आशिया खंडाने पृथ्वीच्या सुमारे ३० टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे.

२) आशिया खंडातील १६२० मीटरचा बाई काल सरोवर हा जगातील सर्वात खोल सरोवर आहे.

३) उरल पर्वतरांगा आशिया खंडाला युरोप खंडापासून विभाजित करतात.

४) वरीलपैकी सर्व योग्य

प्रश्न क्र. ७

खालील विधाने लक्षात घ्या.

१) आशिया खंडात जगातील एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या वास्तव्य करते.

२) जगातील सर्वात लोकसंख्या असलेले देश जसे की चीन, भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश, अमेरिका व ब्राझील हे अशा खंडात आहेत.

योग्य पर्याय निवडा.

१) १ फक्त

२) २ फक्त

३) १ व २ दोन्ही

४) १ व २ दोन्हीं नाहीत

प्रश्न क्र. ८

उपराष्ट्रपती पात्रतेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अचूक नाही?

१) कलम ६६ मध्ये उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी पात्रता नमूद आहे.

२) उपराष्ट्रपती होण्यासाठी व्यक्तीने वयाची २५ वर्षे पूर्ण केली असावी.

३) ती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावी.

४) वरीलपैकी सर्व योग्य

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

१) भारतीय उपराष्ट्रपती पुन्हा उपराष्ट्रपती पदावर निवडणुकीसाठी पात्र असतो.

२) कलम ७१ मध्ये असलेल्या तरतुदी नुसार उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित शंका आणि विवादांचे निर्णय घेण्याचा अधिकार उच्च न्यायालयाचा आहे.

३) उपराष्ट्रपती हे लोकसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य पार पाडतात.

४) वरीलपैकी एकही नाही.

प्रश्न क्र. १०

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या विषयी चुकीचे विधान निवडा.

१) नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची तरतूद घटनेच्या कलम १४८ ते १५१ या चार कलमांमध्ये केलेली आहे.

२) भारताच्या कॅगची नियुक्ती राष्ट्रपती द्वारे केली जाते.

३) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला असणारे अधिकार सेवा व शर्ती नियंत्रक व महालेखापरीक्षकाला लागू असतात.

४) वरीलपैकी एकही अयोग्य नाही.

प्रश्न क्र. ११

पुढील विधाने विचारात घ्या :

१) भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक फक्त नियंत्रक म्हणून कार्य पार पडतो तर महालेखा परीक्षकाच्या कर्तव्य पासून त्याला वंचित करण्यात आले आहे.

२) अशा खासगी कंपन्या ज्यांना भारताच्या संचित निधीतून पुरवठा केला जातो त्यांचा हिशोब ठेवण्याचा अधिकार नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १ बरोबर

२) फक्त २ बरोबर

३) १ व २ दोन्ही बरोबर

४) १ व २ दोन्ही बरोबर नाहीत

वरील प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे :

प्रश्न क्र. १ – १
प्रश्न क्र. २ – ४
प्रश्न क्र. ३- २
प्रश्न क्र. ४- ३
प्रश्न क्र. ५- ३
प्रश्न क्र. ६-४
प्रश्न क्र. ७-३
प्रश्न क्र. ८- २
प्रश्न क्र. ९- १
प्रश्न क्र. १०- ३
प्रश्न क्र. ११- ३

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc loksatta test series polity current affairs history geography ecomics envoirnment arts and culture question set 30 spb
Show comments