UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवडा.

१) संविधानाच्या कलम ४० मध्ये पंचायत राज स्थापनेविषयी तरतुद आहे.

२) कलम ४० हे न्यायप्रविष्ट आहे.

३) इंदिरा गांधींच्या काळात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी घटनादुरुस्ती विधेयक लोसभेत मंडण्यात आले.

४) वरीलपैकी सर्व योग्य

प्रश्न क्र. २

खालीलपैकी अयोग्य असलेले विधान निवडा.

१) पंचायत राज स्थापन करणारे राजस्थान हे पहिले राज्य होते.

२) ७३ वी घटनदुरुस्ती नुसार पंचायत राज स्थापन करणारे पहिले राज्य मध्यप्रदेश ठरले.

३) वयाची २५ वर्षे पुर्ण केलेली व्यक्ती पंचायतीचा सदस्य होण्यास पात्र असते.

४) संविधानात ७३ व्या दुरुस्ती अधिनियम, १९९२ नुसार भाग IX (९) समाविष्ट करण्यात आला.

प्रश्न क्र. ३

खालीलपैकी योग्य विधान ओळखा?

१) २४ एप्रिल १९९३ तारखेला पंचायत राजची ७३ वी घटनादुरुस्ती लागू झाली.

२) अनुच्छेद २४३-F मध्ये पंचायत निवडणुकीसाठी पात्रतेची तरतूद आहे.

३) अनुच्छेद २४३-K नुसार राज्य निवडणूक आयोग स्थापन केला जातो.

४) बारावी अनुसूची संविधानामध्ये ७३ व्या दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेली आहे.

प्रश्न क्र. ४

तोरखाम आणि चमन सीमा बातम्यांमध्ये होत्या, त्या खालीलपैकी कोणत्या देशाला जोडतात?

अ) भारत-म्यानमार

ब) भारत-बांगलादेश

क) अफगाणिस्तान-पाकिस्तान

ड) अफगाणिस्तान-इराण

प्रश्न क्र. ५

पुढे अकराव्या अनुसूची मधील अनिवार्य तरतुदी दिलेल्या आहेत. त्यापैकी अयोग्य असलेली तरतूद ओळखा.

१) संसदेच्या आणि राज्य विधानमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या विविध स्तरांवर पंचायतींमध्ये प्रतिनिधित्व देणे.

२) पंचायतींमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवणे.

३) पंचायतींच्या निवडणुका लढवण्याचे किमान वय २१ वर्षे असणे.

४) पंचायतींच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी दर पाच वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे.

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३०

प्रश्न क्र. ६

शेरशहा सुरी व्दारे कोणत्या दोन शहरादरम्यान ग्रँड ट्रंक मार्ग बांधण्यात आला होता?

१) दिल्ली ते मद्रास

२) कोलकाता ते पेशावर

३) हावडा ते खडकपूर

४) मुंबई ते ठाणे

प्रश्न क्र. ७

पुढील विधाने लक्षात घ्या आणि योग्य असलेले विधान निवडा.

१) १९४३ मध्ये रस्ते वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नागपूर आराखडा तयार करण्यात आला.

२) १९६१ मध्ये वीस वर्षीय रस्ता योजना तयार करण्यात आली.

३) वीस वर्षांच्या रस्ते योजनेची उद्दिष्टे रस्त्याची घनता १९८१ पर्यंत प्रति १०० चौरस किमी मधे ३२ किमीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट होते.

४) वरीलपैकी सर्व योग्य

प्रश्न क्र. ८

औद्योगिक आजारपण येण्यास कोणत्या बाबी कारणीभूत ठरतात?

१) उत्पादनाचे मूल्य हे विक्री मूल्यापेक्षा जास्त असल्यास औद्योगिक आजारपण येऊ शकते.

२) भांडवलाचा तुटवडा भासणे हे सुद्धा औद्योगिक आजारपणाचे महत्त्वाचे कारण आहे.

३) भांडवलाचा मार्ग वळवणे व उद्योगांमध्ये अपुरे कुशल मनुष्यबळ असणे हे सुद्धा औद्योगिक आजारपणास कारणीभूत ठरते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब

२) ब आणि क

३) फक्त क

४) वरील सर्व

प्रश्न क्र. ९

पुढील विधानांपैकी अयोग्य असलेले विधान निवडा.

१) मॉरिस जोन्स यांनी भारतीय संघराज्य वादाला “बार्गेनिंग फेडरलिझम” असे संबोधले.

२) इव्होर जेनिंग्स यांनी भारतीय संघराज्य प्रणालीचे “एक मजबूत केंद्रीकरण प्रवृत्ती असलेले महासंघ” असे वर्णन केले आहे.

३) ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी भारतीय संघराज्यवादाला “सहकारी संघराज्यवाद” म्हटले आहे.

४) वरीलपैकी सर्व योग्य आहे.

प्रश्न क्र. १०

भारतीय संघराज्य प्रणालीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याचा समावेश संघराज्य वैशिष्ट्यामध्ये होत नाही तो पर्याय निवडा.

१) द्विसदनी विधानमंडळाची तरतूद

२) अलिखित संविधान

३) राज्यघटनेची सर्वोच्चता

४) दुहेरी नागरिकत्व

प्रश्न क्र. ११

पुढील विधाने विचारात घ्या. असत्य असलेले विधान निवडा.

१) नागपूर योजनेत कार्यात्मक आधारावर रस्त्यांचे चार श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.

२) राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग (SPWD) द्वारे बांधलेले आणि देखभाल केलेले मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखले जातात.

३) एकूण रस्त्यांच्या लांबीमध्ये राष्ट्रीय महामार्गांची टक्केवारी १९५१ मधील ४.९५ टक्क्यांवरून २०१७ मध्ये २ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.

४) राष्ट्रीय महामार्ग भारताच्या रस्त्यांच्या वाहतुकीच्या जवळपास ४० टक्के वाहतूक करतात.

प्रश्न क्र. १२

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

१) उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी सर्वात जास्त आहे.

२) आंतरराष्ट्रीय रस्त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून वित्तपुरवठा केला जातो.

३) सेतू भारतम कार्यक्रम २०१५ मध्ये सुरू करण्यात आला.

४) भारतमाला प्रकल्प २०१६ मध्ये सुरू करण्यात आला.

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३१

प्रश्न क्र. १३

पुढील विधाने विचारात घेऊन बिनचूक नसलेले विधान निवडा.

१) राज्य महामार्ग भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबीच्या सुमारे ३.५ टक्के आहेत.

२) गुजरातमध्ये सर्वाधिक लांबीचे राज्य महामार्ग आहेत.

३) मिझोराम, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी डोंगराळ भागातील राज्यांमध्ये प्रत्येकी पाचशे किमीपेक्षा कमी लांबी असलेले राज्य महामार्ग आहेत.

४) वरीलपैकी एकही योग्य नाही.

प्रश्न क्र. १४

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

१) जिल्ह्याच्या इतर ठिकाणांसोबत जिल्हा मुख्यालयाला जोडतात त्यांना शहरी रस्ते म्हणतात.

२) नगरपालिका, लष्करी छावणी, बंदर किंवा रेल्वे प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्त्याला जिल्हा रस्ता म्हणतात.

३) बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) बोर्डाची स्थापना मे १९६० मध्ये करण्यात आली.

४) केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) द्वारे हिमाचल प्रदेशातील मनाली आणि लडाखमधील लेहसह चंदीगडला जोडणारा जगातील सर्वात उंच रस्ता तयार केला आहे.

प्रश्न क्र. १५

भारताच्या महान्यायवादी बाबत योग्य विधान/ने निवडा.

१) महान्यायवादी बाबत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ७६ मध्ये तरतूद केलेली आहे.

२) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असलेली व्यक्ती भारताचा महान्यायवादी होण्यास पात्र ठरतो.

३) संविधानाच्या कलम १७७ अंतर्गत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या कोणत्याही संदर्भामध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे आणि भारत सरकारला आवश्यक आहे.

४) अनुच्छेद १०५(४) मध्ये, भारताच्या महान्यायवादीला संसदेच्या सदस्यासारखाच विशेषाधिकारांचा हक्क प्रदान केलेले आहे.

पर्यायी उत्तरे –

१) फक्त १, २ आणि ३

२) फक्त १, ३ आणि ४

३) फक्त १ आणि ४

४) वरील सर्व

प्रश्न क्र. १६

पुढील विधानांचे लक्षपूर्वक वाचन करा. दिलेल्या विधानांपैकी अयोग्य असलेले विधान निवडा.

१) संविधानातील कलम १६५ नूसार, प्रत्येक राज्याकडे राज्यासाठी एक महाधिवक्ता असेल (अॅडव्होकेट-जनरल) असे नमूद केले आहे.

२) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७७ मध्ये महाधिवक्ता पदाची कार्ये आणि कर्तव्ये दिलेली आहेत.

३) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तीला महाधिवक्ता म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

४) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत किंवा समितीत महाधिवक्ताला मतदानाचा अधिकार आहे.

वरील प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न क्र. १ – १
प्रश्न क्र. २ -३
प्रश्न क्र. ३-४
प्रश्न क्र. ४-३
प्रश्न क्र. ५-१
प्रश्न क्र. ६-२
प्रश्न क्र. ७-४
प्रश्न क्र. ८-४
प्रश्न क्र. ९-४
प्रश्न क्र. १०-४
प्रश्न क्र. ११-२
प्रश्न क्र. १२-१
प्रश्न क्र. १३-२
प्रश्न क्र. १४-३
प्रश्न क्र. १५-३
प्रश्न क्र. १६-४

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.