Loksatta Test Series : सराव प्रश्न पुढील प्रमाणे…

प्रश्न क्र. १

खालील विधाने विचारात घ्या.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

अ ) सातमाळा-अजिंठा डोंगररांगेमुळे गोदावरी आणि तापी या नद्यांचे खोरे वेगळे झालेले आहे.

ब ) सातमाळा- अजिंठा डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेले आहे.

क ) सातमाळा- अजिंठा डोंगररांगांची सुरवात नाशिक जिल्ह्याच्या वायव्य भागामध्ये सह्याद्रीच्या मुख्य समूहात होते.

पर्यायी उत्तरे :

१ ) अ आणि ब योग्य
२) ब आणि क योग्य
३) अ आणि क योग्य
४) वरीलपैकी सर्व बरोबर

प्रश्न क्र. २

योग्य विधाने /ने ओळखा ?

अ ) शंभूमहादेव डोंगररांगेमुळे भीमा आणि कृष्णा नद्यांचे खोरे वेगळी झालेले आहे.

ब ) शंभू महादेव डोंगररांगाचे स्थान हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांगाच्या दक्षिणेला येते.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब योग्य
४) वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. ३

योग्य विधान/ने ओळखा?

अ) बुराई नदी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री व सिंदखेडराजा या तीन तालुक्यामधून वाहते.

ब) चंद्रभागा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील गाळण डोंगर रांगेत होते.

क) पांजरा नदीचा उगम अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्यांमध्ये होते.

पर्यायी उत्तरं

१)अ आणि ब योग्य
२) फक्त अ योग्य
३) फक्त ब योग्य
४) अ,ब आणि क

प्रश्न क्र. ४

योग्य विधान/ने ओळखा?

अ ) वर्धा नदीचा उगम मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत झाला आहे.

ब ) वर्धा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात १९६८ मध्ये ईसापुर जवळ ईसापुर धरण बांधण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

१)फक्त अ
२)फक्त ब
३)अ आणि ब योग्य
४)वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. ५

योग्य विधाने ओळखा?

अ ) कोकण किनारपट्टीचा हा सह्याद्री पर्वताकडील पायथागतचा भाग म्हणजे वलाटी होय.

ब ) कोकणाचा पश्चिमेकडील अरबी समुद्राकडील भाग म्हणजे खलाटी होय.

क ) कोकण किनारपट्टीचा हा सह्याद्री पर्वताकडील पायथागतचा भाग म्हणजे खलाटी होय.

ड ) कोकणाचा पश्चिमेकडील अरबी समुद्राकडील भाग म्हणजे वलाटी होय.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) क आणि ड
३) ब आणि क
४) अ आणि ड

प्रश्न क्र. ६

योग्य विधान/ने ओळखा .

अ ) कोकणातील उल्हास नदीची एकूण लांबी 130 किमी आहे.

ब ) कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी वैतरणा नदी आहे.

क )वैतरणा नदीची एकूण लांबी 124 किलोमीटर आहे.

पर्यायी उत्तरं

१) अ आणि ब
२) अ आणि क
३) ब आणि क
४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ७

योग्य विधाने ओळखा?

अ) सावित्री नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे झालेला आहे.

ब ) या नदीची एकूण लांबी ११० किलोमीटर आहे.

क ) जगबुडी नदी ही सावित्री नदीची प्रमुख उपनदी आहे.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) अ आणि क
३) ब आणि क
४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ८

खालील विधानावर विचार करा.

अ ) चोरणा, मुरबी, घोरपडी, घुमरी, कुंभेरी, या भातसा नदीच्या उपनद्या आहेत‌.

ब ) भातसा नदी वसईच्या खाडीतून अरबी समुद्राला मिळते.

क ) भातसा नदीचा उगम महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कसारा घाटात घाटणदेवी येथे होतो.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) अ आणि क
३) ब आणि क
४) रीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ९

योग्य विधान ओळखा ?

अ ) महाराष्ट्राच्या वनाचे क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २५% आहे.

ब ) महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनाचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे.

क ) महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाचे प्रमाण सोलापूर जिल्ह्यात आहे.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १०

योग्य विधाने ओळखा ?

अ ) उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये उप उष्णकटिबंधीय सदाहरित वनापेक्षा पर्जन्याचे प्रमाण कमी आहे.

ब ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पायथ्यालगत आढळतात.

क ) उप उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये पर्जन्याचे प्रमाण 250 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) अ आणि क
३) ब आणि क
४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. ११

खालील विधानांचा विचार करा

अ) भारतीय संविधानातील अनुच्छेद ३६८ अंतर्गत घटनादुरुस्ती केली जाते.

ब) घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या परवानगीची आवश्यकता असते.

क) घटनादुरुस्ती विधेयक सादर केल्यानंतर ते स्वतंत्रपणे दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने संमत होणे गरजेचे असते.

वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब
२) अ आणि क
३) फक्त क
४) आणि अ

प्रश्न क्र. १२

अ) घटनादुरुस्ती विधेयक जर संघराज्यात्मक संरचनेशी संबंधित असेल, तर ते विधेयक पारित करण्यासाठी विशेष बहुताची आवश्यक असते.

ब) घटनादुरुस्ती विधेयक राज्यांच्या संमतीसाठी मांडले असता, राज्य विधिमंडळाने ते किती कालमर्यादेत पारित करावे, याचा कोणताही उल्लेख राज्यघटनेत नाही.

क) घटनादुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी करणे राष्ट्रपतींसाठी बंधनकारक असते. असे विधेयक राष्ट्रपती रोखून धरू शकत नाहीत किंवा परत ते पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवता येत नाही.

वरील पैकी योग्य विधान/ने ओळखा?

पर्यायी उत्तरे

अ) अ आणि ब
ब) ब आणि क
क) फक्क अ
ब ) फक्त क

प्रश्न क्र. १३

अ) चलनवाढ आटोक्यात आणायची असेल, तर त्याकरिता अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी करणे अत्यंत आवश्यक असते.

ब) सरकारचे उत्पन्न कमी असतानाही जेव्हा शासन जास्तीचा खर्च करते, तेव्हा राजकोषीय तूट उद्भवते. राजकोषीय तूट कमी करणे म्हणजे चलनवाढीवरील राजकोषीय उपाय होय.

क) चलनघट म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू व सेवांच्या साधारण किमतींमधील पातळीत घट होणे.

वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) फक्त ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १४

मनी लाँडरिंग संदर्भात खालील विधानांचा विचार करा?

अ) मनी लाँडरिंग हा शब्द प्रथम अमेरिकेत वापरला गेला.

ब) बनावट कंपन्या तयार करणे हा मनी लाँडरिंग एक मार्ग आहे.

क) मनी लाँडरिंग म्हणजे बेकायदा पैसा कायदेशीर करणे आणि वापरात आणणे.

वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे?

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब
२) क आणि अ
३) फक्त ब
४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १५

अ) ‘एंजेलचा नियम’च्या नियमानुसार जसजसे कौटुंबिक उत्पन्न वाढत जाते, तसतशी प्राथमिक वस्तूंवरील म्हणजेच अन्नवस्तूंवरील खर्चांची टक्केवारीही कमी कमी होत असते.

ब) हलक्या, निकृष्ट व कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे ‘जिफेन वस्तू’ होय.

क) ज्या वस्तूंना मागणी व पुरवठ्याचा नियम लागू होत नाही‌, अशा काही वस्तूंना ‘जिफेन वस्तू’ म्हटले जाते.

वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत?

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब
२) क आणि ब
३) फक्त अ
४) वरीलपैकी सर्व


वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे

प्रश्न क्र. १ – ३
प्रश्न क्र. २ – ३
प्रश्न क्र. ३ – २
प्रश्न क्र. ४ – १
प्रश्न क्र. ५ – १
प्रश्न क्र. ६ – २
प्रश्न क्र. ७ – १
प्रश्न क्र. ८ – २
प्रश्न क्र. ९ – २
प्रश्न क्र. १० -३
प्रश्न क्र. ११ -२
प्रश्न क्र. १२ -२
प्रश्न क्र. १३ -४
प्रश्न क्र. १४ -४
प्रश्न क्र. १५ -४