प्रश्न क्र. १ :

मॉर्ले-मिंटो सुधारणा कायद्यामागे ब्रिटिशांचा खालीलपकी कोणता उद्देश होता?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्याय :

अ) सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देणे.

ब) भारतीयांचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व वाढवणे.

क) भारतीयांना राजकीय फायदा मिळवून देणे.

ड) वरीलपैकी नाही.

प्रश्न क्र. २ :

विधान अ : १९११ मध्ये भारताच्या राजधानीचे ठिकाण पूर्व भारतामधून पश्चिम भारतात बदलण्यात आले.

स्पष्टीकरण ब : १९११ मध्ये ब्रिटिश सम्राट जॉर्ज पंचम यांचे दिल्लीत आगमनासाठी दिल्ली दरबार भरविण्यात आला होता.

पर्याय :

अ) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

क) विधान अ बरोबर व ब चूक.

ड) विधान अ चूक व ब बरोबर

प्रश्न क्र. ३ :

१९१९ च्या अधिनियमाबाबत खालील विधाने लक्षात घ्या.

१) या कायद्यानुसार भारत सचिवाचे वेतन भारतीय तिजोरीतून देणे बंद झाले.

२) भारत सचिवाच्या साहाय्यासाठी इंडियन हाय कमिशनर पदाची नियुक्ती करण्यात आली.

३) इंडियन हाय कमिशनरला ब्रिटिश सरकारकडून वेतन मिळणार होते.

वरील विधानांपकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत ते सांगा.

पर्याय :

अ) फक्त १ व ३

ब) फक्त २

क) फक्त ३

ड) फक्त २ व १

प्रश्न क्र. ४ :

खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?

१) ‘भारत माता सोसायटी’ नावाची क्रांतिकारी संघटना पंजाब या ठिकाणी कार्यरत होती.

२) भारत माता सोसायटीमध्ये अजित सिंह, लाला हरदयाल व जे. एम. चटर्जी हे क्रांतिकारक होते.

पर्याय :

अ) विधान १ बरोबर

ब) विधान २ बरोबर

क) विधान १ व २ बरोबर

ड) विधान १ व २ चूक

प्रश्न क्र. ५ :

क्रांतिकारकांवर चालविल्या जाणाऱ्या खालील खटल्याचा योग्य क्रम लावा.

१) लाहोर केस

२) नाशिक केस

३) हावडा केस

४) अलीपूर केस

पर्याय :

अ) २, १, ४ व ३

ब) ४, २, ३ व १

क) ३, १, २ व ४

ड) १, २, ३ व ४

प्रश्न क्र. ६

खालीलपकी कोणते विधान चूक आहे?

१ ) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या मराठी ग्रंथांचा इंग्रजी अनुवाद करण्याचे श्रेय शामजी कृष्ण वर्मा या विद्वान क्रांतिकारकाकडे जाते.

२) फ्रान्सच्या किनाऱ्यावर मास्रेलिस बंदराजवळ सावरकरांनी बोटीतून केलेल्या साहसी पण अयशस्वी पलायनाने सर्वत्र खळबळ माजली. ‘पेनिन्शुलर अँड ओरिएंट’ कंपनीच्या मालकीच्या या बोटीचे नाव एम.एम.मोरिआ. असे होते.

पर्याय :

अ) विधान १ चूक

ब) विधान २ चूक

क) विधान १ व २ चूक

ड) विधान १ व २ बरोबर

प्रश्न क्र. ७ :

खालीलपकी कोणत्या कायद्यान्वये केंद्र व प्रांत या दोन्ही स्तरांवर लोकसेवा आयोगाची रचना करण्याची तरतूद करण्यात आली होती?

पर्याय :

अ) पिट्स इंडिया अ‍ॅक्ट

ब) १९१९ चा सुधारणा कायदा

क) १९०९ चा सुधारणा कायदा

ड) १९३५ चा भारत सरकार कायदा

प्रश्न क्र. ८ :

सायमन कमिशन संदर्भात खाली काही विधानं केली आहेत. यांपैकी कोणतं विधान चुकीचं आहे?

१ ) सायमन कमिशनचा रिपोर्ट इ.स. १९२७ मध्ये जाहीर करण्यात आला.

२ ) भारतात या कमिशनविरूद्ध मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली.

३ ) सायमन कमिशनच्या शिफारसींवर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने तीन गोलमेज परिषदेचे आयोजन केले.

पर्याय :

अ) विधान १ चूक

ब) विधान १ आणि २ चूक

क) विधान २ चूक

ड) विधान २ आणि ३ चूक

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) देशातील गव्हाच्या हेक्टरी उत्पादनाचा विचार करता उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम स्थानावर आहे.

ब) भारतीय पोलीस सेवेतील उच्च अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे आहे.

पर्याय :

१ ) विधान अ बरोबर आहे.

२) विधान अ व ब बरोबर आहे.

३) विधान ब बरोबर आहे.

४) विधान अ व ब चूक आहे.

प्रश्न क्र. १०

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) विजयंता रणगाडा व शक्तिमान ट्रक हे बोकारो येथे तयार होतात.

ब) भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ जुब्बर हट्टी हे उत्तरांचल या ठिकाणी आहे.

पर्याय :

1) विधान अ बरोबर आहे.

2) विधान अ व ब बरोबर आहे.

3) विधान ब बरोबर आहे.

4) विधान अ व ब चूक आहे.

प्रश्न क्र. ११

खालीलपैकी कोणती नदी हिमाचल प्रदेशातून वाहत नाही.

पर्याय :

1) बियास

2) रावी

3) सतलज

4) श्योक

प्रश्न क्र. १२

खारफुटीची वने किनारपटटीय आपत्तींपासून संरक्षण करणाऱ्या खात्रीलायक सुरक्षा भित्तिका ठरू शकतात, याची जाणीव लोकांना 2004 मधील सुनामी वादळामुळे झाली. खारफुटीची वने कशाप्रकारे सुरक्षा भित्तिका म्हणून कार्य करतात?

पर्याय :

अ) खारफुटी वनांतील दलदली क्षेत्रे, ज्यांमध्ये लोक राहत नाहीत किंवा कार्य करत नाहीत, मानवी वसाहतींना समुद्रापासून अलग करतात.

ब) घट्ट मुळांमध्ये या वनांतील वृक्ष वादळ किंवा लाटांनी उन्मळून पडत नाहीत.

क) खारफुटीच्या वनांतील झाडे उंच आणि घनदाट असल्याने वादळ किंवा सुनामीदरम्यान लोकांना उत्तम निवारा पुरवितात.

ड) खारफुटीची वने लोकांना ज्याची गरज असते अशा अन्न आणि औषधे या दोन्हीही गोष्टी नैसर्गिक आपत्ती दरम्यान पुरवितात.

प्रश्न क्र. १३

निसर्ग व नैसर्गिक संसाधने संवर्धन संघ ((IUCN-International Union for Conservation of Nature & Natural Resources) द्वारा प्रकाशित रेड डाटा बुक्समध्ये कशाचा समावेश असतो?

अ) जैवविविधता हॉटस्पॉट्समधील स्थानविशिष्ट (Emdemic) वनस्पती आणि प्राणी प्रजाती.

ब) संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी प्रजाती.

क) निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी विविध देशांतील संरक्षित क्षेत्रे. योग्य पर्याय निवडा.

पर्याय :

१) अ व ब

२) फक्त ब

३) ब व क

४) फक्त क

प्रश्न क्र. १४

खालील सजीवांचा विचार करा.

अ) जीवाणू

ब) बुरशी

क) पुष्पीय वनस्पती

वरीलपैकी कोणत्या सजीवांच्या काही प्रजाती जैवकीटकनाशके (Biopesticides) म्हणून वापरल्या जातात? योग्य पर्याय निवडा

पर्याय :

१) फक्त अ

२) अ व क

३) ब व क

४) अ, ब आणि क

प्रश्न क्र. १५

ओझोन अवक्षय घडविणाऱ्या क्लोरोप-लुरो कार्बनचा वापर कशासाठी होतो?

अ) प्लास्टिक फोम उत्पादन

ब) ट्यूबलेस टायर उत्पादन

क) काही इलेक्ट्रॉनिक्स भाग स्वच्छ करण्यासाठी

ड) एअरोसोल कॅन्समध्ये प्रेशरायिझग एजंट म्हणून

वरीलपैकी योग्य पर्याय निवडा

पर्याय :

अ) अ आणि क

ब) फक्त ब

क) अ, क आणि ड

ड) वरीलपैकी सर्व

वरील प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे…

प्रश्न क्र. १- अ
प्रश्न क्र. २- ड
प्रश्न क्र ३ – क
प्रश्न क्र ४- क
प्रश्न क्र. ५- ब
प्रश्न क्र ६- क
प्रश्न क्र ७- ड
प्रश्न क्र ८ – अ
प्रश्न क्र. ९ – ब
प्रश्न क्र. १० – क
प्रश्न क्र.११– अ
प्रश्न क्र. १२- अ
प्रश्न क्र. १३- २
प्रश्न क्र. १४- ४
प्रश्न क्र. १५- क

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc loksatta test series polity ecomics geography history question set 9 spb