Loksatta Test Series : सराव प्रश्न पुढील प्रमाणे…
प्रश्न क्रमांक १
योग्य विधान ओळखा?
अ ) महाराष्ट्र मध्ये एकूण क्षेत्रफळाच्या ७५ टक्के रेगुर आढळते.
ब ) रेगूर मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता या मृदेमध्ये अधिक असते.
क ) या मृदेतील काळा रंग हा टिटॅनिफेरस मॅग्नेटाईटमुळे आलेला आहे.
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब
२) अ आणि क
३) क आणि ब
४) वरीलपैकी सर्व
प्रश्न क्रमांक २
खालील विधानावर विचार करा ?
अ ) जांभ्या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण कमी असते.
ब ) जांभ्या मृदेमध्ये ॲल्युमिनियम चे प्रमाण जास्त असते.
क ) जांभ्या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण जास्त असते.
ड ) जांभ्या मुलींमध्ये ॲल्युमिनियमचे प्रमाण कमी असते.
पर्यायी उत्तरे
१ ) अ आणि ब
२) अ आणि ड
३ ) ब आणि क
४) क आणि ड
प्रश्न क्रमांक ३
योग्य विधान/ने ओळखा ?
अ ) भीमा नदीला उजव्या किनाऱ्यावर इंद्रायणी, भामा आणि मुळा नदी येऊन मिळते.
ब ) भीमा नदीला डाव्या किनाऱ्यावर इंद्रायणी, भामा, मुळा नदी येऊन मिळते.
क ) भीमा नदीला डाव्या किनाऱ्यावर घोड नदी येऊन मिळते.
ड ) भीमा नदीला उजव्या किनाऱ्यावर घोड नदी येऊन मिळते.
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ड
२) अ आणि क
३) ब आणि ड
४) ब आणि क
प्रश्न क्रमांक ४
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा?
अ) ऑगस्ट १९४७ ते सप्टेंबर १९४८ या दरम्यान साम्यवादी पक्षांनी निजाम विरोधी चळवळीत भाग घेतला.
ब) त्यांनी शेतकर्यांचे गनिमी काव्याने लढण्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला.
क) त्यांनी भारतीय लष्कराला पूर्ण पाठिंबा दिला.
ड) १९५१ मध्ये साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली.
प्रश्न क्रमांक ५
योग्य विधान/ ने ओळखा ?
अ ) महानदीचा उगम छत्तीसगडमध्ये रायपूर जिल्ह्यात सिंहवाजवळ दंडकारण्यामध्ये 442 मीटर उंचीवर झालेला आहे.
ब ) भारताच्या छत्तीसगड व ओरिसा राज्यांतून वाहणारी महानदी ही प्रमुख नदी आहे.
पर्यायी उत्तरे
१) अ योग्य
२) ब योग्य
३) अ आणि ब योग्य
४) वरीलपैकी नाही
प्रश्न क्रमांक ६
खालील विधानावर विचार करा.
अ ) शिवनाथ नदी नछत्तीसगडमधील सर्वात महत्त्वाची नदी असून या नदीची एकूण लांबी 290 किमी आहे.
ब ) खारून, अर्पा, तांदुला, लीलागर, अमनेरा, जामुनियन इत्यादी शिवनाथ नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
क ) जांजगीर जिल्ह्यातील सोन लोहारसीजवळ रायपूरच्या सीमेवर शिवनाथ नदी महानदीला जाऊन मिळते.
पर्यायी उत्तरे
१) अ ब आणि क योग्य
२) ब आणि क योग्य
३) अ आणि ब योग्य
४) अ आणि क योग्य
प्रश्न क्रमांक ७
योग्य विधान/ने ओळखा ?
अ) कृष्णराजा सागरा येथे, कावेरीला हेमावती आणि लक्ष्मणतीर्थ या दोन उपनद्या येऊन मिळतात.
ब) कावेरी नदीच्या डाव्या तीरावरील उपनद्या हेमावती, शिमसा उपनद्या येऊन मिळतात.
क) कावेरी नदीच्या उजव्या तीरावरील उपनद्या कबिनी, भवानी उपनद्या येऊन मिळतात.
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ योग्य
२) फक्त ब योग्य
३) फक्त अ आणि ब योग्य
४) वरीलपैकी सर्व
प्रश्न क्रमांक ८
खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?
अ) खिलाफत चळवळीचा मुख्य उद्देश तुर्कस्तानची खिलाफत पुनर्स्थापित करणे हा होता.
ब) १९२० मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत खिलाफत चळवळ विलीन झाली.
क) संपूर्ण चळवळ खलिफ हा जगभरातील मुस्लिमांचा धार्मिक प्रमुख आहे या मुस्लिम समजुतीवर आधारित होता.
पर्यायी उत्तरं
१) अ आणि क
२) ब आणि क
३) फक्त क
४) वरील सर्व
प्रश्न क्रमांक ९
खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा?
अ) लाला लजपत राय ‘लायन ऑफ पंजाब’ म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वदेशी चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ब) लाला लाजपत राय यांनी १९१६ मध्ये अमेरिकेत इंडियन होम रूल लीगची स्थापना केली.
क) राजद्रोहाच्या कारणावरून लाला लाजपत राय यांना मंडाले येथे हद्दपार करण्यात आले.
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब
२) क आणि ब
३) फक अ
४) सर्व बरोबर
प्रश्न क्रमांक १०
खालील पैकी योग्य विधान/ने ओळखा?
अ) स्वदेशी चळवळ ही एक राजकीय आणि आर्थिक चळवळ होती.
ब) स्वदेशी चळवळीदरम्यान कापड गिरण्या, बँका, होजरी, टॅनरी, रासायनिक कामे आणि विमा कंपन्या स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
क) बंगालच्या फाळणीला होत असलेला विरोध शिगेला असताना काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कलकत्ता येथे झाले. या अधिवेशनाची अध्यक्षता दादाभाई नौरोजी यांनी केली.
पर्यायी उत्तरं
१) अ आणि ब
२) अ आणि क
३) फक्क क
४) वरील सर्व
प्रश्न क्रमांक ११
खालील घटनांचा क्रम लावा.
अ) स्वदेशी चळवळ
ब) खिलाफत चळवळ
क) सविनय कायदेभंग चळवळ
ड) चलेजाव चळवळ
पर्यायी उत्तरे
१) (अ), (ब), (ड), (क)
२) (ब), (क), (ड), (अ)
३) (ड), (ब), (अ), (क)
४) (अ), (ब), (क), (ड)
प्रश्न क्रमांक १२
वर्ष १९४० संबंधी खालील घटनांचा क्रम लावा
१) लॉर्ड लिनलिथगो ऑगस्ट ऑफर
२) लाहोर सत्रात मुस्लीम लीग कडून पाकिस्तानच्या वेगळ्या राज्याची मागणी.
३) काँग्रेस कडून स्वतंत्र सत्याग्रह आंदोलनाच्या सुरुवातीचे निर्णय.
पर्यायी उत्तरं
१) १-२-३
२) २-३-१
३) ३-१-२
४) ३-२-१
प्रश्न क्रमांक १३
भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत ब्रिटिशांच्या धोरणांमध्ये बदल झाले, कारण
अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर.
ब) भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण.
क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम.
पर्यायी उत्तरं
१) अ आणि ब फक्त
२) ब आणि क फक्त
३) अ आणि क फक्त
४) अ, ब आणि क
प्रश्न क्रमांक १४
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा
अ) पहिल्या अंतरिम राष्ट्रीय सरकारची घोषणा २४ ऑगस्ट, १९४६ रोजी झाली होती.
ब) २ ऑक्टोबर, १९४६ रोजी नेहरूंच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारचा शपथविधी झाला.
क) २६ ऑक्टोबर, १९४६ रोजी वेव्हेल यांनी मुस्लीम लीगला अंतरिम सरकारमध्ये आणले.
ड) संविधान सभेच्या ९ डिसेंबर, १९४६ रोजी भरलेल्या पहिल्या बैठकीला मुस्लीम लीग हजर नव्हती.
प्रश्न क्रमांक १५
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा?
अ) इंग्रज इंडियन नॅशनल आर्मी व तिच्या पुढार्यांच्या अतिशय विरोधात होते.
ब) इंग्रजांनी त्यांच्या प्रमुख ३ अधिकार्यांवर : गुरुबक्षसिंग धिल्लो, शाह नवाझ खान व पी. के. सेहगल यांच्यावर लाल किल्ला दिल्ली येथे इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास्तव केस चालविली.
क ) त्या सर्वांवर गुन्हा साबीत केला.
ड) त्याप्रमाणे त्या तिघांना शिक्षा झाली.
प्रश्नसंच १३ ची उत्तरं पुढीलप्रमाणे….
प्रश्न क्र. १ – ४
प्रश्न क्र. २ – १
प्रश्न क्र. ३ – २
प्रश्न क्र. ४ – ३
प्रश्न क्र. ५ – ३
प्रश्न क्र. ६ – १
प्रश्न क्र. ७ – १
प्रश्न क्र. ८ – ४
प्रश्न क्र. ९ – ४
प्रश्न क्र. १० – ४
प्रश्न क्र. ११ – ४
प्रश्न क्र. १२ – ४
प्रश्न क्र. १३ – २
प्रश्न क्र. १४ – ४
प्रश्न क्र. १५ – ४