सागर भस्मे

दगडी कोळसा हा प्रामुख्याने वनस्पतीतील कार्बनी पदार्थांपासून बनलेला आहे. लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या वनस्पती व त्यांचे भाग गाळाखाली पुरले गेल्याने दगडी कोळशाची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर तालुक्यामध्ये आहेत. तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या ठिकाणी कोळशाचे साठे आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, भद्रावती, वरोरा आणि घुगुस येथे; तर यवतमाळ जिल्ह्यातील राजूर स्टेशन, वणी, मोरगाव, दिग्रस येथे कोळशाचे साठे आढळतात. नागपूर जिल्ह्यात सावनेर, कामठी, उमरेड व पाटणासावंगी; तर वर्धा नदीच्या खोऱ्यात बल्लारपूर, दुर्गापूर आणि वणी येथे कोळशाचे साठे आढळतात.

How to Apply for PM Awas Yojana
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थी घर बांधण्यासाठी जागेसंदर्भात आहेत नियम, जाणून घ्या
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
A fire broke out at a building in Goregaon Mumbai print news
गोरेगाव येथील इमारतीला भीषण आग; दिवाळीत मुंबईत आगीचे सत्र सुरुच
issue of air and noise pollution increase in Thane during Diwali
ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
GST Collection in October 2024
GST Collection in October 2024: जीएसटी संकलन ऑक्टोबरमध्ये १.८७ कोटींवर, सहामाही उच्चांकी स्तर

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : पृथ्वीच्या अंतरंगांची रचना

औष्णिक विद्युत प्रकल्प

औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पामध्ये उष्णतेच्या सहाय्याने पाण्याची वाफ बनविली जाते व त्या वाफेचा वापर जनित्रामध्ये वीज निर्मितीसाठी होतो. महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प हे नाशिक जिल्ह्यात एकलहरे, जळगाव जिल्ह्यात फेकरी, बीड जिल्ह्यात परळी, अकोला जिल्ह्यात पारस, ठाणे जिल्ह्यात चोला, नागपूर जिल्ह्यात कोराडी व खापरखेडा, चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गापूर व बल्लारपूर, मुंबई उपनगर जिल्ह्यात तुर्भे, पालघर जिल्ह्यात डहाणू येथे आहेत.

खनिज तेल व नैसर्गिक वायू

भारतामध्ये १९५६ साली तेल व नैसर्गिक वायू आयोगाची स्थापना करण्यात आली, तर १९६३ साली खनिज तेल व रसायने मंत्रालय सुरू करण्यात आले. १९६४–६७ च्या दरम्यान मुंबईच्या पश्चिमेस १७६ किमी अंतर अरबी समुद्रात मुंबई हाय येथे खनिज तेल क्षेत्राचा शोध लागला. ३ फेब्रुवारी १९७४ रोजी जपान येथील सागर सम्राटाच्या मदतीने (तराफा जहाज) येथे पहिली तेलविहीर खोदण्यात आली. या क्षेत्रामध्ये भारतातील एकूण खनिज तेलाच्या ५० टक्के खनिज तेलाचे उत्पादन घेतले जाते. रायगड जिल्ह्यातील उरण येथील औष्णिक विद्युत केंद्रात नैसर्गिक वायूद्वारे औष्णिक वीज निर्माण केली जाते.

अणुउर्जा प्रकल्प

तारापूर अणु विद्युत प्रकल्प हा भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प असून १९६९ मध्ये या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईच्या उत्तरेस १०० किमी. अंतरावर स्थित आहे. ट्रॉम्बे (BARC) येथे सहा अणुभट्ट्या उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी अप्सरा ऑगस्ट १९५६ मध्ये ग्रेट ब्रिटनच्या मदतीने उभारण्यात आली. ही भारतातील पहिली अणुभट्टी होती. सायरस अणुभट्टी जुलै १९६० मध्ये कॅनडाच्या मदतीने उभारण्यात आली. झर्लिना अणुभट्टी जानेवारी १९६९ मध्ये पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाने उभारण्यात आली. पूर्णिमा आणि पूर्णिमा २ या अणुभट्ट्या जुलै १९६९ मध्ये भारतीय तंत्रज्ञानाने उभारण्यात आल्या, तर ध्रुव ही अणुभट्टी ऑगस्ट १९८५ मध्ये भारतीय तंत्रज्ञानाने उभारण्यात आली.

तारापूर अणुऊर्जा केंद्र अमेरिकेच्या मदतीने मुंबई जवळ १९६९ साली उभारण्यात आले होते. उमरेड अणु विद्युत केंद्र नियोजित असून ते नागपूर जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीला जगामध्ये अणुऊर्जेची निर्मिती आणि वापर फ्रान्समध्ये केला जात आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : भूखंडवहन आणि भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत

अपरंपरागत ऊर्जा साधने

सौरऊर्जेची निर्मिती फोटोसेलचा वापर करून केली जाते आणि त्यानंतर सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. महाराष्ट्रमध्ये साक्री येथे एकूण १५० मेगावॅट क्षमतेच्या महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी झाली असून, या प्रकल्पातून १२५ मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. पवनऊर्जा निर्मिती ही वाऱ्याच्या झोताचा वापर करून केली जाते. पवनऊर्जा निर्मितीसाठी १५ मीटर प्रति सेंटीमीटर वारा उत्तम समजला जातो, तर २५ मी/से हा वारा प्रतिकूल समजला जातो. १९९७ पासून पवनऊर्जा निर्मितीला सांगली येथे सुरुवात झाली. लहान पवन चक्क्यांना ३ ते ७ मी/से, तर मोठ्या पवन चक्क्यांना ७ मी/से पेक्षा जास्त वेगाचा वारा अनुकूल असतो. महाराष्ट्रामध्ये पवनऊर्जा प्रकल्प सातारा, अहमदनगर, सिंधूदुर्ग, नाशिक या जिल्ह्यांत उभारण्यात आले आहेत.

जलविद्युत प्रकल्प

जलविद्युत केंद्रामध्ये उंचीवर साठविलेल्या पाण्याच्या स्थितिज ऊर्जेचा वापर वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रमधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असलेला कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यातील पाटणा तालुक्यात हेळवाक जवळ उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची विद्युत निर्मिती क्षमता १९२० मेगावॅट असून, या प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या जलाशयास ‘शिवसागर’ नाव देण्यात आले आहे. जायकवाडी हा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीवर उभारण्यात आला आहे. त्याची क्षमता १२ मेगावॅट आहे. या जलविद्युत प्रकल्पामुळे नाथसागर जलाशयाची निर्मिती झाली आहे. भिरा, भिवपुरी व खोपोली हा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात टाटा बीज मंडळाद्वारे उभारण्यात आला. यांची क्षमता अनुक्रमे भिरा १५० मेगावॅट व भिवपुरी-खोपोली ७२ मेगावॅट आहे. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात दक्षिण पूर्णा नदीवर उभारण्यात आलेला आहे. त्याची क्षमता ५० मेगावॅट आहे.